भाडं मागायला गेली, भाडेकरूंनी घरमालकिणीसोबत असं काही केलं की सगळेच हादरले, बेडरूममध्ये...

Ghaziabad high-profile society murder case : उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये भाडे वादातून धक्कादायक हत्या उघडकीस आली आहे. भाडे वसूल करण्यासाठी गेलेल्या घरमालकिणीची भाडेकरू दाम्पत्याने निर्घृण हत्या करून मृतदेह बेडखाली लपवला.
Ghaziabad
Ghaziabad
Published On

घराच्या रेंटचे पैसे भाडेकरूला मागायला जाणं घर मालकिणीच्या जीवावर बेतलेय. उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधील एका हायप्रोफाईल सोसायटीमध्ये ही घटना घडली. या प्रकरणात पोलिसांनी दाम्पत्याला अटक केली आहे. त्या नवरा-बायकोने पोलिसांसमोर गुन्हा कबूल केलाय. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. भाडेकरू दाम्पत्याने घरमालकिणील कसं मारलं, याची माहिती दिल्याचे व्हिडिओत दिसतेय.भाडे वसूल करण्यासाठी गेलेल्या मालकणीची भाडेकरू जोडप्याने निर्घृण हत्या केली. हत्येनंतर आरोपीने मृतदेहाचे तुकडे केले. लाल रंगाच्या सुटकेसमध्ये भरले आणि बेडखाली लपवले. पोलिस तपासात या हत्येबाबत धक्कादायक खुलासे झाले आहेत. पोलिासंनी सीसीटीव्हीच्या अधारे याचा उलगडा केलाय.

मृत महिलेचे नाव दीपशिखा शर्मा असे आहे. अजय गुप्ता आणि त्याची पत्नी आकृती गुप्ता अशी आरोपीची नावे आहेत. दीपशिखा शर्मा या पती उमेश शर्मासोबत सोसायटीच्या फ्लॅट एम-१०५ मध्ये राहत होती. त्याच सोसायटीमध्ये दीपशिखाचा आणखी एक फ्लॅट होता. त्यांनी हा फ्लॅट जुलै २०२५ पासून अजय गुप्ता आणि त्यांची पत्नीला रेंटवर दिला होता. मागील सहा महिन्यांपासून आकृती गुप्ता यांना भाड्याने दिला होता. मागील सहा महिन्यापासून त्यांनी रूमचे रेंट दिले नव्हते.

Ghaziabad
भाजपचा डाव काँग्रेसच्या जिव्हारी, २ माजी आमदारांनी घेतलं कमळ, शेकडो समर्थकांनी सोडली साथ

१७ डिसेंबर रोजी दीपशिखा शर्मा अजय गुप्ता याच्याकडे थकलेले भाडे वसूल करण्यासाठी गेली. तिने जाताना मोलकरणीला आपण भाडे वसूल करूनच येणार आहे, तोपर्यंत श्वानाची काळजी घेण्याचे सांगितले होते. काही तासानंतरही दीपशिखा परत आली नाही, त्यावेळी मोलकरणीला संशय आला. त्यानंतर सोसायटीचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यामध्ये दीपशिखा भाडेकरूंच्या फ्लॅटमध्ये प्रवेश करत असल्याचे दिसून आले. पण ती त्या फ्लॅटमधून बाहेर आल्याचे दिसलेच नाही. त्यामुळे भाडेकरूवर संशय बळावला. मोलकरणीने तात्काळ याबाबत दीपशिखाच्या पतीला माहिती दिली. त्यानंतर ती भाडेकरूच्या फ्लॅटमध्ये चौकशी करण्यासाठी गेली. आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत होते, पण मोलकरणीने हुशारीने त्यांना रोखले. याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. नंदग्राम पोलिसांनी घटनास्थळी येऊन शोध घेतला. दीपशिखा शर्माचा मृतदेह तुकडे केलेल्या अवस्थेत बेडखाली असलेल्या लाल सुटकेसमधून सापडला. पोलिासंनी खाकी दाखवताच आरोपींनी गुन्हा कबूल केला. भाड्याच्या वादातून अजय गुप्ता आणि आकृती गुप्ता यांनी दीपशिखाची हत्या केल्याचे उघड झाले.

Ghaziabad
Accidents : पुण्यात भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू, जालना अन् बुलडाण्यात भयंकर दुर्घटना, राज्यात ७ जण ठार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com