Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंची विकेट पडली; आता नंदुरबारचा पालकमंत्री कोण? या ५ मंत्र्यांची नावं चर्चेत

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटे यांना शिक्षा झाल्यानंतर नंदुरबारचे पुढील पालकमंत्री कोण असतील यावर चर्चा सुरू झाल्या आहेत. यासाठी पाच नेत्यांची नावे शर्यतीत आहेत. यातील दोन जणांकडे आधीच पालकमंत्रीपदाची जबाबदारी आहे.
Maharashtra Politics
Former minister Manikrao Kokate after resigning amid court conviction; political buzz over Nandurbar guardian minister post.saam tv
Published On
Summary
  • शासकीय सदनिका गैरव्यवहार प्रकरणात माणिकराव कोकाटे दोषी ठरले.

  • नाशिक जिल्हा न्यायालयाने कोकाटेंना दोन वर्षांची शिक्षा सुनावली.

  • अजित पवारांनी कोकाटेंचा मंत्रीपदाचा राजीनामा स्वीकारला.

शासकीय सदनिकेसाठी बनावट कागदपत्रे सादर केल्याप्रकरणी मंत्री माणिकराव कोकाटे दोषी आढळले आहेत. या प्रकरणात नाशिक जिल्हा न्यायालयाने मंत्री माणिकराव कोकाटे दोन वर्षांची शिक्षा सुनावली,त्यानंतर त्यांना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागालय. अजित पवार यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला असून त्यांच्याकडील क्रीडा आणि अल्पसंख्याक विकास ही दोन्ही खाती रात्री काढून घेण्यात आली होती. कोकाटे हे क्रीडामंत्रीसह नंदुरबारचे पालकमंत्री होते. आता त्यांच्या राजीनाम्यानंतर जर त्यांना शिक्षा झाली तर नंदुरबारचा पालकमंत्री कोण होणार याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत.

Maharashtra Politics
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंच्या भावाच्या जागेत १४५ कोटींचं ड्रग्ज सापडलं, अंधारेंचा आरोप, प्रकाश शिंदे म्हणाले....

नाशिक जिल्हा कोर्टाने कोकाटे यांना दोषी ठरवत दोन वर्षाची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर मंत्री माणिकराव कोकाटे यांनी जिल्हा न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला स्थगिती देण्यात यावी यासाठी उच्च न्यायालयात याजिका दाखल केली होती. पंरतु उच्च न्यायालयाने त्वरीत सुनावणी करण्यास नकार दिला. जर उच्च न्यायालयाने त्यांना शिक्षा सुनावली तर त्यांची तुरुंगात जावे लागेल.

Maharashtra Politics
मोठी बातमी! जामखेडमध्ये हॉटेलवर अंदाधुंद गोळीबार; मालक रोहित पवारांच्या पायात घुसली गोळी

याचदरम्यान माणिकराव कोकाटे यांच्यानंतर नंदुरबारचा पालकमंत्री कोण होणार याबाबत चर्चा सुरू झालीय. राज्यातील जिल्ह्याचे पालकमंत्री नियुक्त करण्यात येत होते तेव्हा महायुतीमध्ये रणकंदन माजलं होतं. माणिकाराव कोकाटे हे मुळात नाशिक जिल्ह्यातून येतात. पालकमंत्री नेमण्यात आलं होतं तेव्हा त्यांचा जिल्हा बदलण्यात आला. त्यांना नंदुरबारचं पालकमंत्रीपद देण्यात आलं.

Maharashtra Politics
Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंचं काय होणार? कोकाटे वादाच्या चक्रव्युहात?

आता सदनिका हडपण्याप्रकरणा दोषी आढळल्यानंतर कोकाटेंना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर आता नंदुरबारचा पालकमंत्री कोण होणार यांची चर्चा सुरू झालीय. यात पाच मंत्र्याची नावे शर्यतीत आहेत. यात छगन भुजबळ ( राष्ट्रवादी ), सना मलिक ( राष्ट्रवादी ), जयकुमार रावल ( भाजप ), गुलाबराव पाटील ( शिवसेना ), डॉ विजयकुमार गावित ( भाजप ).

यातील जयकुमार रावल, गुलाबराव पाटील यांच्याकडे आधीच पालकमंत्री पद आहे. जयकुमार रावल धुळे तर गुलाबराव पाटील जळगावचे पालकमंत्री आहेत. त्यामुळे उर्वरित तीन नेत्यांचा नुंदरबार्या पालकमंत्रीबाबत विचार केला जाऊ शकतो. यातील सर्वाधिक चर्चा छगन भुजबळ यांच्या नावाची आहे. छगन भुजबळ यांना नाशिकचं पालकमंत्री हवं होतं. परंतु त्यावर भाजपनं दावा ठोकल्यानं भुजबळ नाराजी झाले होते. त्यामुळे कदाचित यावेळी छगन भुजबळ यांची नंदुरबारचे पालकमंत्री म्हणून वर्णी लागू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com