Manikrao Kokate
माणिकराव कोकाटे हे सिन्नर मतदारसंघातील ज्येष्ठ मराठी राजकारणी आहेत. त्यांनी शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर विधानसभेवर निवडून येण्याचा अनुभव घेतला आहे. २०१४ मध्ये त्यांनी नाशिक लोकसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढवली. त्यांच्या कन्या सीमंतिनी कोकाटे या नाशिक जिल्हा परिषदेच्या सदस्य आहेत.