अजितदादांना मुख्यमंत्री करण्यासाठी एकत्र का आले नाही? राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून आमदाराचा जोरदार हल्लाबोल|VIDEO

Ajit Pawar Chief Minister Question Maharashtra Politics: अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावरून नव्या चर्चा सुरू झाल्या आहेत. अजितदादांना मुख्यमंत्री करण्यासाठी एकत्र का आले नाही, असा सवाल आमदार सुनील शेळके यांनी उपस्थित केला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर आता राष्ट्रवादीच्या विलीनि‍करणाच्या चर्चांनी जोर धरला आहे. यावर दोन्ही गटाकडून वेगवेगळे दावे प्रतिदावे केले जात आहे. यावरच माजी मंत्री माणिकराव कोकाटे आणि आमदार सुनील शेळके यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माणिकराव कोकाटे म्हणाले, मला एक समजत नाहीये. विलिनीकरणाबाबत का चर्चा करत आहेत. हा प्रश्न कौटुंबिक आहे.

त्यात काय चर्चा झाली याबाबत आम्हाला माहीत नाही. ती आम्हाला माहिती मिळत नाही. तोपर्यंत आम्ही काही बोलणार नाही. ही जी चर्चा आहे. ती वहिनींसोबत दादांनी केली असेल. आम्हाला काही माहीत नाही. सगळे वहिनींसोबत चर्चा करतील आणि त्या जो निर्णय घेतील तो आम्हाला सगळ्यांना मान्य असेल. असे माणिकराव कोकाटे म्हणाले.

तर मावळचे आमदार सुनील शेळके म्हणाले,आताच चर्चा का केल्या जात आहेत. आमच्या बैठका होत होत्या तेव्हा कधीच अजितदादांनी आम्हाला विलनीकरण संदर्भात माहिती दिली नाही. दादा जाऊन 5 दिवस झाले. थोडे दिवस जाऊ द्या ना. एवढी घाई कोणासाठी आणि कशाला? अचानक या चर्चा कशा आल्या? अजितदादांना मुख्यमंत्री करण्यासाठी एकत्र का आले नाहीत असा सवाल ही त्यांनी विचारला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com