मोठी बातमी! जामखेडमध्ये हॉटेलवर अंदाधुंद गोळीबार; मालक रोहित पवारांच्या पायात घुसली गोळी

Firing at Jamkhed Hotel: जामखेड-बीड रोडवरील हॉटेल कावेरीमध्ये टोळीने गोळीबार केलाय. या हल्ल्यात हॉटेल मालक रोहित पवार जखमी झालेत. हॉटेल मालक रोहित पवार यांच्या पायाला गोळी लागली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Firing at Jamkhed Hotel
Police presence outside Hotel Kaveri in Jamkhed after midnight firing incident.saamtv
Published On
Summary
  • जामखेड–बीड रोडवरील हॉटेल कावेरीवर मध्यरात्री अंदाधुंद गोळीबार

  • ७ ते ८ जणांच्या टोळीने आधी तोडफोड करून नंतर गोळीबार केला.

  • हॉटेल मालक रोहित अनिल पवार यांच्या पायाला गोळी लागून ते गंभीर जखमी.

सुशिल थोरात, साम प्रतिनिधी

जामखेड-बीड रोडवरील हॉटेल कावेरी येथे बुधवारी मध्यरात्री घडलेल्या थरारक घटनेने परिसर हादरून गेला. सात ते आठ जणांच्या संशयित टोळीने हॉटेलवर अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात हॉटेल मालक रोहित अनिल पवार हे गंभीर जखमी झालेत.

Firing at Jamkhed Hotel
भाडं मागायला गेली, भाडेकरूंनी घरमालकिणीसोबत असं काही केलं की सगळेच हादरले, बेडरूममध्ये...

टोळक्यानं आधी रोहित अनिल पवार यांच्या हॉटेलची तोडफोड करत अंदाधुंद गोळीबार केला. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या गोळीबारात हॉटेल मालक रोहित अनिल पवार हे गंभीर जखमी झालेत. त्यांच्या पायात गोळी लागल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना तात्काळ अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस हल्लेखोरांच्या मागावर आहेत. गोळीबाराचे नेमके कारण काय याचा पोलीस तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितनुसार, न्यू कावेरी हॉटेलचे मालक रोहीत अनिल पवार हे आपल्या हॉटेलच्या समोर उभे होते. त्यावेळी एक स्विफ्ट कार आली, त्या कारमधून ५ ते ७ जण उतरले. त्यातील ३ जणांकडे गावठी कट्टा होता आणि त्यांनी गोळीबार सुरू केला. त्यावेळी मालक रोहित पवार आपला जीव वाचवण्यासाठी हॉटेलमागे पळाले.

Firing at Jamkhed Hotel
पुन्हा संतोष देशमुखांसारखी हत्या, संभाजीनगरात माजी सरपंचाचा खून, ११ जणांनी लोखंडी रॉड अन् लाठ्या-काठ्यांनी मारले

त्यावेळी त्यांच्या पायाला एक गोळी लागली होती. काही अंतर पळाल्यानंतर ते अंधारात लपून बसले. त्यानंतर काहीजण परत हॉटेलला आले त्यांनी हॉटेलची तोडफोड केली. त्यानंतर हॉटेल मालक रोहित पवार यांच्या कारची देखील तोडफोड केली. याप्रकरणात एका आरोपीला ताब्यात घेतलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com