Maharashtra Politics: नगराध्यक्षपदाच्या भाजप उमेदवाराच्या मुलीला मारहाण, बोगस मतदान केल्याचा आरोप; VIDEO समोर

BJP Leaders Daughter Beaten: नांदेडच्या धर्माबादमध्ये नगराध्यक्षपदाच्या भाजप उमेदवाराच्या मुलीला मारहाण करण्यात आली. बोगस मतदानाचा आरोप करत त्यांना मारहाण करण्यात आली. याचा व्हिडीओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे.
Maharashtra Politics: नगराध्यक्षपदाच्या भाजप उमेदवाराच्या मुलीला मारहाण, बोगस मतदान केल्याचा आरोप; VIDEO समोर
BJP Leaders Daughter BeatenSaam Tv
Published On

Summary -

  • नांदेडच्या धर्माबादमध्ये मतदान केंद्रावर जोरदार राडा

  • भाजप नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराच्या मुलीला मारहाण

  • बोगस मतदानाचा आरोप करत केली मारहाण

  • तेलंगणातील मतदार आणल्याची चर्चा

  • मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल

संजय सूर्यवंशी, नांदेड

नांदेड जिल्हयातील धर्माबादमध्ये एका मतदान केंद्रावर जोरदार राडा झाला. प्रभाग क्रमांक १ मधील फुलेनगर येथील मतदान केंद्रात बोगस मतदान करत असल्याचा आरोप करत एका महिलेला आणि एका पुरुषाला मारहाण करण्यात आली. रचीता गौड जंगमपल्ली असे पीडित महिलेचे नाव आहे. मारहाण करण्यात आलेल्या रचीता या भाजपाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सुनिता गौड जंगमपल्ली यांची मुलगी आहेत.

रचीता या धर्माबाद येथील मतदार असून त्यांनी मतदान देखील केले. मात्र मतदान केंद्रात राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण केली. मतदान केल्यानंतर राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी त्यांना मुख्य रस्त्यावर आणून मारहाण केली. यावेळी अन्य एका पुरुषाला देखील मारहाण करण्यात आली. विशेष म्हणजे मतदान केंद्रामध्ये पोलिस कर्मचारी उपस्थित होते. पोलिसांसमोर मारहाण होत असताना पोलिस मात्र बघ्याची भूमिका घेत होते असा आरोप रचीता यांनी केला.

Maharashtra Politics: नगराध्यक्षपदाच्या भाजप उमेदवाराच्या मुलीला मारहाण, बोगस मतदान केल्याचा आरोप; VIDEO समोर
Maharashtra Politics: राजकारणात पुन्हा उलटफेर; अजित पवार 'ते' मंत्रिपद सोडणार? काय आहे कारण?

त्यानंतर घटनास्थळावर आलेल्या पोलिसांनी जमावावर सौम्य लाठीमार केला. यावेळी वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांना मज्जाव करत पोलिसांनी पत्रकारांना देखील धक्काबक्की केली. दरम्यान रचिता गौड जंगमपल्ली यांनी या प्रकरणी तक्रार दिली असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी संगितले.

Maharashtra Politics: नगराध्यक्षपदाच्या भाजप उमेदवाराच्या मुलीला मारहाण, बोगस मतदान केल्याचा आरोप; VIDEO समोर
Maharashtra Politics: अंबरनाथमध्ये EVM आणणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे बोगस आयडी कार्ड, शिवसेना-काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक

धर्माबादमध्ये मतदान केंद्रावर बोगस मतदान केल्याचा आरोप करण्यात आला आहे. काही महिलांनी पकडण्यात आले. यावेळी बोगस मतदारांची पळापळ झाली. तेलंगणातील मतदार आणून धर्माबादमध्ये मतदान केल्याचा गंभीर आरोप केला जात आहे. बोगस मतदान करणाऱ्या महिलेला धर्माबाद मधल्या स्थानिक महिला उमेदवारांनी चोप दिला.

दरम्यान, सकाळी मतदान सुरू झाल्यानंतर धर्माबादमध्ये एका आमदाराने आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मतदारांना डांबून ठेवण्याचा प्रकार उघडकीस आला होता. इनानी मंगल कार्यालयात जवळपास हजार ते दीड हजार मतदारांना डांबून ठेवण्यात आले होते. मतदारांना पैशाचे आमिष दाखवून, दाबून ठेवल्याचा आरोप नागरिकांनी केला.

Maharashtra Politics: नगराध्यक्षपदाच्या भाजप उमेदवाराच्या मुलीला मारहाण, बोगस मतदान केल्याचा आरोप; VIDEO समोर
Maharashtra Politics: पुण्यात मोठा राजकीय भूकंप, पालिका निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, बडा नेता भाजपच्या वाटेवर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com