Nashik Crime  Saam Tv
महाराष्ट्र

Nashik Crime: मोठी बातमी! बलात्कार प्रकरणात नाशिकच्या ‘कॅप्टन’ला अटक, नामांकित महिला आणि सेलिब्रिटींचे ५८ व्हिडिओ जप्त

Self Proclaimed Captain Ashok Kharat Arrested: नाशिक पोलिसांनी कॅप्टन अशोक खरातला अटक केली. महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणात ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. या घटनेमुळे नाशिकमध्ये खळबळ उडाली.

Priya More

Summary -

  • नाशिकमध्ये बलात्कार प्रकरणी कॅप्टन अशोक खरातला अटक

  • नाशिक क्राइम ब्रांचची मोठी कारवाई

  • या कारवाईमध्ये ५८ व्हिडिओ जप्त करण्यात आले

  • सेलिब्रिटी संबंधित व्हिडिओंचा पोलिसांकडून तपास सुरू

  • अशोक खरात राजकीय नेत्यांचे भविष्य सांगतो

अभिजीत सोनवणे, नाशिक

नाशिकमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. बलात्कार प्रकरणात नाशिक पोलिसांनी एका स्वघोषित कॅप्टन आणि ज्योतिषाला अटक केली. अशोक खरात असं या ज्योतिषाचे नाव असून तो अनेक मोठ्या राजकीय नेत्यांचे भविष्य सांगतो. नाशिक पोलिसाच्या क्राइम ब्रांच युनिटने बलात्काराच्या गंभीर गुन्ह्यामध्ये त्याला बेड्या ठोकल्या. या कारवाईमुळे नाशिकसह राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकमध्ये बलात्कार प्रकरणातील आरोपी अशोक खरात उर्फ ‘स्वघोषित कॅप्टन’ला अटक करण्यात आली. नाशिकच्या क्राइम ब्रांचने ही मोठी कारवाई केली. अशोक खरातविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांनी तब्बल ५८ व्हिडिओ जप्त केल्याची माहिती समोर आली आहे. हे व्हिडीओ काही नामांकित महिला आणि सेलिब्रिटी संबंधित असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

पोलिसांकडून जप्त करण्यात आलेल्या व्हिडिओंची सखोल तपासणी सुरू असून त्यामधून आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास नाशिक क्राइम ब्रांच करत आहे. अशोक खरातवर ३५ वर्षांच्या महिलेने बलात्काराचा आरोप केला आहे. याप्रकरणी नाशिकच्या सरकारवाडा पोलिस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी ही अटकेची कारवाई केली आहे.

असे सांगितले जात आहे की, अशोक खरात हा मर्चंट नेव्हीतील निवृत्त अधिकारी आहे. नेव्हीमधून निवृत्त झाल्यानंतर तो सध्या शिवनिका ट्रस्टचे नेतृत्व करत आहे. त्याने विश्वशास्त्राच्या क्षेत्राला आपली पुढील कारकीर्द म्हणून पुढे चालू ठेवले असल्याचे सांगितले जात आहे. अशोक खरातचे अनेक राजकीय नेत्यांशी खूप चांगलेच संबंध आहेत. अनेक राजकीय नेत्यांचे आणि नामांकित व्यक्तींचे तो भविष्य सांगतो. शिवनिका ट्रस्टच्या वेबसाईटवरील माहितीनुसार, अशोक खरातने मर्चंट नेव्हीमध्ये २२ वर्षे काम केले. १५४ देशांचे दौरे त्याने पूर्ण केले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rupee vs Dollar : रुपयाची 'शतकाकडे' वाटचाल? डॉलरच्या तुलनेत भारतीय चलन गटागंळ्या का घेतेय? वाचा ५ कारणे

Heart attack: तुमच्या दररोजच्या या ४ सवयींमुळे येतो हार्ट अटॅक, वेळीच लक्ष द्या

NEET पेपरफूटी प्रकरणात सर्वात मोठी कारवाई! RCC कोचिंग क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगांवकरांना CBI ने ठोकल्या बेड्या

Maharashtra News Live Update: NEET पेपर फुटीप्रकरणी RCC क्लासचे शिवराज मोटेगावकर यांना अटक

Hair Cut: नवदीचा 'बॉब' हेअरकट पुन्हा ट्रेंडमध्ये; पाहा तुमच्या चेहऱ्यानुसार कोणता कट दिसेल परफेक्ट

SCROLL FOR NEXT