Breaking News: राजकारणात खळबळ! खासदाराला पोलिसांकडून अटक, पार्टीमध्ये ड्रग्ज घेताना पकडलं

MP Among 11 Detained in Drug Party Raid: खासदारासह ११ जणांना पोलिसांनी अटक केली. यामध्ये माजी आमदाराचा देखील समावेश आहे. या सर्वांना ड्रग्ज पार्टी करताना पोलिसांनी पकडलं. या घटनेमुळे राजकारणात खळबळ उडाली आहे.
Breaking News: राजकारणात खळबळ! खासदाराला पोलिसांकडून अटक, पार्टीमध्ये ड्रग्ज घेताना पकडलं
MP Among 11 Detained in Drug Party RaidSaam Tv
Published On

Summary:

  • हैदराबाद मोइनाबाद फार्महाऊसवर ड्रग्ज पार्टीवर पोलिसांचा छापा

  • ड्रग्ज पार्टी प्रकरणात खासदारासह ११ जणांना पोलिसांनी अटक केली

  • रोहित रेड्डी यांच्या फार्महाऊसवर पोलिसांची कारवाई

  • ड्रग्ज सेवन प्रकरणामुळे तेलंगणात राजकीय खळबळ

आंध्र प्रदेशातल्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. आंध्र प्रदेशमध्ये खासदाराला पोलिसांनी अटक केली. तेलुगु देसम पार्टीचे खासदार पुट्टा महेश कुमार आणि भारत राष्ट्र समितीचे माजी आमदार पायलट रोहित रेड्डी यांच्यासह ११ जणांना पोलिसांनी अटक केली. हैदराबादच्या मोइनाबादमधील एका फार्म हाऊसवर ड्रग्जचे सेवन करताना या सर्वांना पोलिसांनी पकडलं. या घटनेनंतर खासदार आणि अन्य सात जणांना चौकशी करून सोडण्यात आले. या घटनेमुळे आंध्रप्रदेशमध्ये खळबळ उडाली आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, खासदार महेश कुमार, माजी आमदार रोहित रेड्डी आणि आणखी चार जणांची ड्रग्जचे सेवन केल्याप्रकरणी तपासणी करण्यात आली. तपासणी अहवालामध्ये यामधील अनेकांनी ड्रग्ज घेतल्याचे स्पष्ट झाले. मोईनाबाद येथील रोहित रेड्डी यांच्या मालकीच्या फार्महाऊसवर ड्रग्जचे सेवन केले जात असल्याची माहिती तेलंगणा पोलिसांना मिळाली होती. या विश्वसनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी रोहित रेड्डी यांच्या फार्म हाऊसवर छापा टाकला. याठिकाणी खासदार आणि माजी आमदारासह अनेक जण ड्रग्ज घेत असल्याचे आढळून आले.

Breaking News: राजकारणात खळबळ! खासदाराला पोलिसांकडून अटक, पार्टीमध्ये ड्रग्ज घेताना पकडलं
Crime: १७ वर्षीय मुलाकडून ३ अल्पवयीन मुलींवर बलात्कार, व्हिडीओ काढून ब्लॅकमेल; १ पीडिता गरोदर

पोलिसांनी अटक केलेल्यांमधील एका व्यावसायिकाने पार्टीदरम्यान रिव्हॉल्व्हरमधून हवेत तीन गोळ्या झाडल्याचा आरोप आहे. त्याने पोलिसांच्या टीमवर एक गोळी झाडली. गोळीबार करणारी व्यक्ती दारूच्या नशेत होत असे सांगितले जात आहे. घटनास्थळावरून पोलिसांनी एक रिव्हॉल्व्हर, एक काडतूस जप्त केले. या प्रकरणी रोहित रेड्डी आणि एका व्यावसायिकासह ३ जणांना पोलिसांनी अटक केली. त्यांना कोर्टात हजर करण्यात आले असता कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली.

Breaking News: राजकारणात खळबळ! खासदाराला पोलिसांकडून अटक, पार्टीमध्ये ड्रग्ज घेताना पकडलं
Pune Crime: कॉलेजबाहेर रक्तरंजित थरार! पुण्यात विद्यार्थ्यावर जीवघेणा हल्ला, कोयता डोक्यात घुसला; थरकाप उडवणारा VIDEO

खासदार महेश कुमार आणि इतर सात जणांना पोलिस ठाण्यात जामीन मंजूर करण्यात आला आणि नोटीस बजावल्यानंतर रविवारी संध्याकाळी त्यांची सुटका करण्यात आली. महेश कुमार ड्रग्जच्या नशेत असल्याचे वृत्त आहे. फार्महाऊसवर उपस्थितीत असलेल्या ११ जणांच्या लघवीची तपासणी करण्यात आली. तर रोहित शेट्टीसह पाच जणांनी ड्रग्ज घेतले असल्याचे स्पष्ट झाले. तर खासदाराच्या तपासणी अहवालामध्ये ड्रग्ज घेतलं नसल्याची माहिती समोर आली.

Breaking News: राजकारणात खळबळ! खासदाराला पोलिसांकडून अटक, पार्टीमध्ये ड्रग्ज घेताना पकडलं
Beed Crime: जमीन-ट्रॅक्टरसाठी नातं विसरला; जन्मदात्यासह बहीण आणि मेहुण्याला लोखंडी पाईपनं बेदम मारहाण

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com