Silent Health Warning: सकाळी उठताच थकवा आणि पोट फुगल्यासारखे वाटतेय? दुर्लक्ष करू नका, असू शकतो 'हा' आजार

Shruti Vilas Kadam

सकाळी उठल्यावरही थकवा जाणवतो

रात्री पुरेशी झोप घेऊनही सकाळी थकवा जाणवत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. फॅटी लिव्हरचा त्रास असलेल्या काही लोकांनाही सतत थकवा जाणवतो.

FATTY LIVER SYMPTOMS | Google

पोट फुगणे आणि गॅस होते

सकाळी उठल्यावर किंवा जेवणानंतर पोट फुगल्यासारखे वाटते का? पोटात गॅस होणे आणि जडपणा जाणवणे असा त्रास होत असेल, तर त्यामागे अनेक कारणे असू शकतात.

FATTY LIVER SYMPTOMS | Google

सतत अशक्तपणा जाणवतो

थोडेसं काम केलं तरी लवकर थकवा येत असेल, दिवसभर सुस्ती वाटत असेल आणि शरीरात ताकद नसल्यासारखे वाटत असेल, तर हे फॅटी लिव्हरचे लक्षण असू शकते.

FATTY LIVER SYMPTOMS | Google

पोटाच्या उजव्या बाजूला दुखते

पोटाच्या उजव्या बाजूला बरगड्यांच्या खाली दुखत असेल किंवा जडपणा जाणवत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. लिव्हरच्या समस्येमुळेही असा त्रास होऊ शकतो.

FATTY LIVER SYMPTOMS | pintrest

डोळे आणि त्वचा पिवळी दिसते

डोळ्यांचा पांढरा भाग किंवा त्वचा पिवळी दिसत असेल, तर हे कावीळचे लक्षण असू शकते. लिव्हरला गंभीर त्रास झाल्यास असे होऊ शकते. असे दिसल्यास लगेच डॉक्टरांकडे जा.

Liver Damage Symptoms

पोट आणि पायांना सूज येणे

पोट फुगण्यासोबतच पायांनाही सूज येत असेल, तर हे लिव्हरच्या गंभीर समस्येचे लक्षण असू शकते. अशा वेळी शरीरात पाणी साचू शकते. त्यामुळे तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या.

FATTY LIVER SYMPTOMS | saam tv

आहार करा बदल

फॅटी लिव्हरचा धोका कमी करण्यासाठी रोजच्या खाण्यापिण्याकडे लक्ष द्या. रोज ३० ते ४५ मिनिटे चालण्याची सवय लावा. आहारात हिरव्या भाज्या आणि ताजी फळे खा. बदाम, अक्रोड, जवस आणि चिया सीड्स खाण्याचा आहारात समावेश करा. जंक फूड, मैदा आणि जास्त साखर असलेले पदार्थ कमी खा.

fatty liver symptoms after eating | Google

डिस्क्लेमर

ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. साम टीव्ही या माहितीची पूर्ण सत्यता किंवा अचूकतेची हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

FATTY LIVER SYMPTOMS | Saam Tv

Moong vs Chana Sprouts: मूग की चणा स्प्राउट्स, वजन कमी करण्यासाठी सकाळी नाश्त्याला काय खावे?

Moong vs Chana Sprouts | Saam Tv
येथे क्लिक करा