Moong vs Chana Sprouts: मूग की चणा स्प्राउट्स, वजन कमी करण्यासाठी सकाळी नाश्त्याला काय खावे?

Shruti Vilas Kadam

मूग स्प्राउट्समध्ये कमी कॅलरीज

मूग स्प्राउट्समध्ये कॅलरीज कमी आणि फायबरचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी मूग सकाळी नाश्त्याला नक्की खा.

Moong Beans | pinterest

चणा स्प्राउट्समध्ये प्रोटीन जास्त

चण्याच्या मोडांमध्ये प्रोटीन आणि फायबर भरपूर असते. त्यामुळे स्नायूंचे आरोग्य चांगले राहते आणि शरीराला एनर्जी मिळण्यास मदत होते.

Chana Chaat

पोट जास्त वेळ भरलेले राहते

मूग आणि चणा या दोन्ही स्प्राउट्समध्ये फायबर असते. त्यामुळे वारंवार भूक लागण्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होते.

Green Moong Salad

वजन कमी करण्यासाठी मूग फायदेशीर

हलका आणि तुलनेने कमी कॅलरी असलेला पर्याय हवा असल्यास मूग स्प्राउट्स खाणे फायदेशीर ठरू शकते.

Health Benefits Of Moong Sprouts | Yandex

चण्यामुळे मिळते भरपूर एनर्जी

चणा स्प्राउट्समध्ये प्रोटीन, फायबर आणि इतर पोषक घटक असतात. त्यामुळे व्यायाम करणाऱ्या व्यक्तींसाठी हा चांगला पर्याय ठरू शकतो.

Chana Koliwada

पचनशक्तीनुसार निवडा पर्याय

मूग स्प्राउट्स तुलनेने हलके असतात. चणा स्प्राउट्स काही लोकांना पचायला जड जाऊ शकतात. त्यामुळे सुरुवातीला कमी प्रमाणात खावेत.

दोन्हींचा आहारात करा समावेश

वजन कमी करण्यासाठी फक्त एकाच प्रकारचे स्प्राउट्स खाण्याची गरज नाही. मूग आणि चणा आलटून-पालटून खा. संतुलित आहार आणि नियमित व्यायाम केल्यास वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकते.

Chana Chaat Recipe | Google

डिस्क्लेमर

ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. साम टीव्ही या माहितीची पूर्ण सत्यता किंवा अचूकतेची हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Moong Dal | GOOGLE

Coconut Burfi Recipe: दिवाळीला घरच्या घरी बनवा मऊ आणि स्वादिष्ट नारळाची वडी; वाचा सोपी रेसिपी

Coconut Burfi Recipe | Saam Tv
येथे क्लिक करा