

गुजरातच्या सूरतमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार
महिलेच्या नवऱ्यानेच तिला मित्रांकडे सोपवलं
या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली
या घटनेमुळे गुजरात हादरले
गुजरातमध्ये विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. पीडित महिलेच्या नवऱ्यानेच तिला मित्रांकडे सोपवलं होतं. त्यानंतर नवरा आणि त्याच्या ३ मित्रांनी या महिलेवर आळीपाळीने बलात्कार केला. या घटनेमुळे गुजरात हादरले. पोलिसांनी या प्रकरणी तिघांना अटक केली असून एकाचा शोध सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातच्या सूरत जिल्ह्यातील कापोदरा परिसरात ही धक्कादायक घटना घडली. एका तरुणाने दारूच्या नशेमध्ये क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. त्याने मित्रांना घरी बोलावले आणि त्यांच्यासोबत दारू प्यायली. त्यानंतर त्याने आपल्या बायकोला ३ मित्रांच्या हवाली केलं. त्यानंतर आरोपी नवरा आणि त्याच्या मित्रांनी महिलेवर बलात्कार केला. या घटनेनंतर आरोपींनी महिलेला जीवे मारण्याची धमकी दिली.
पोलिसांनी सांगितले की, अमरेलीतील बगासरा येथे राहणाऱ्या तरुणीने सूरतच्या कपोदरा येथे राहणाऱ्या तरुणासोबत प्रेमविवाह केला होता. दोघेही लक्ष्मणनगर सोसायटीजवळ भाड्याने घर घेऊन राहत होते. या महिलेचा नवरा हिरे पॉलिशचे काम करतो. त्याचे ३ मित्र नेहमी त्याच्या घरी यायचे. मे २०२५ मध्ये एक दिवस महिलेच्या नवऱ्याने घरी दारू पार्टीचे आयोजन केले होते. त्याचे मित्र घरी आले होते.
दारूच्या नशेत असलेल्या नवऱ्याने आणि त्याच्या मित्रांनी महिलेवर हल्ला आणि छळ करण्याचा प्रयत्न केला. महिलेच्या नवऱ्याने आणि त्याच्या मित्रांनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. त्यानंतर महिलेच्या नवऱ्याने दिला धमकी दिली. जर तू कुणाला सांगितले तर तुझी हत्या करून मृतदेह अशा ठिकाणी टाकेल की कुणालाही सापडणार नाही, अशी धमकी त्याने दिली.
या घटनेनंतर महिलेचा नवरा आणि त्याचे मित्र तिला त्रास देत होते. मित्रांसोबत शरीरसंबंध ठेवण्यासाठी या महिलेचा नवरा तिच्यावर सतत दबाव टाकत होता. या छळाला कंटाळून महिलेने पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी ३ आरोपींना अटक केली. एक आरोपी फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे गुजरातमध्ये खळबळ उडाली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.