Crime: भाजप नेत्याची निर्घृण हत्या, मॉर्निंग वॉकला जाताना चाकूने ५० ते ६० वेळा वार करत संपवलं

Uttar Pradesh BJP Leader Killed: उत्तर प्रदेशमध्ये भाजप नेत्याची भररस्त्यात निर्घृण हत्या करण्यात आली. मॉर्निंग वॉकला गेले असता त्यांच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात भाजप नेत्याचा जागीच मृत्यू झाला.
Crime: भाजप नेत्याची निर्घृण हत्या, मॉर्निंग वॉकला जाताना चाकूने ५० ते ६० वेळा वार करत संपवलं
BJP Leader Killed Saam Tv
Published On

Summary:

  • उत्तर प्रदेशमध्ये भाजप नेत्याची निर्घृण हत्या

  • धारदार चाकूने ५० ते ६० वेळा वार करत संपवलं

  • मॉर्निक वॉकला गेले असता झाला हल्ला

  • उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ

उत्तर प्रदेशमध्ये भाजप नेत्याची निर्घृण हत्या करण्यात आली. गोरखपुरमधील चिलुआताल पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बरगदवामध्ये मगंळवारी सकाळी ही घटना घडली. भाजप नेता राजकुमार चौहान यांच्यावर चाकूने सपासप वार करत संपवण्यात आले. त्यांच्यावर धारदार चाकूने ५० ते ६० वेळा वार करण्यात आले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या भाजप नेत्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे उत्तर प्रदेश हादरले आहे.

प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, भाजप नेता राजकुमार चौहान मार्निंग वॉक करत होते. त्याचवेळी त्याठिकाणी आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर चाकूने सपासप वार केले. हा हल्ला इतका भयंकर होता की भाजप नेत्याने जागीच प्राण सोडले. या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी भाजप नेत्याचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.

Crime: भाजप नेत्याची निर्घृण हत्या, मॉर्निंग वॉकला जाताना चाकूने ५० ते ६० वेळा वार करत संपवलं
Crime News: सुट्टी नाकारल्याने सुरक्षारक्षकाचं डोकं सटकलं; बँक मॅनेजरच्या छाती घातली गोळी

फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी धाव घेतली असून त्यांनी पुरावे गोळा करण्यास सुरूवात केली. पोलिसांनी सांगितले की, राजकुमार चौहान मंगळवारी सकाळी बरगदवा क्षेत्रामध्ये नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी आले होते. त्याठिकाणी आधीच लपून बसलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला. हल्लेखोर खूपच क्रूर होते असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. त्यांनी राजकुमार चौहान यांच्यावर हल्ला केला. भाजप नेत्याच्या शरीरात ५० ते ६० वेळा वार करण्यात आले. जास्त रक्तस्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.

Crime: भाजप नेत्याची निर्घृण हत्या, मॉर्निंग वॉकला जाताना चाकूने ५० ते ६० वेळा वार करत संपवलं
Crime News : संतापजनक! घरात घुसून तरुणीवर दोन वेळा बलात्कार; कुटुंबाला संपवण्याची धमकी

पोलिसांनी या प्रकरणी हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. भाजप नेत्याच्या हत्येमागचे कारण अस्पष्ट आहे. पोलिस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे. घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिस सतर्क झाले आहेत.

Crime: भाजप नेत्याची निर्घृण हत्या, मॉर्निंग वॉकला जाताना चाकूने ५० ते ६० वेळा वार करत संपवलं
Mumbai Crime: मुंबई हादरली! मनसे कार्यकर्त्याकडून तरुणाची हत्या, भररस्त्यात धारदार शस्त्राने सपासप वार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com