Maharashtra Politics: भाजप- शिंदेसेनेत अजूनही धुसफूस? एकनाथ शिंदे PM मोदींच्या भेटीला

Eknath Shinde Delhi Visit Update: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान ते पीएम मोदींची भेट घेण्याची शक्यता आहे. राज्यात अधिवेशन सुरू असताना शिंदे दिल्ली दौऱ्यावर गेल्यामुळे चर्चांना उधाण आले.
Maharashtra Politics: भाजप- शिंदेसेनेत अजूनही धुसफूस? एकनाथ शिंदे PM मोदींच्या भेटीला
PM Modi - Eknath shindeSaam Digital
Published On

Summary:

  • उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर

  • एकनाथ शिंदे पीएम मोदी यांची भेट घेण्याची शक्यता

  • भाजप-शिंदेसेनामध्ये पुन्हा तणाव निर्माण झाल्याची चर्चा

  • जागा वाटपावरून महायुतीत मतभेद

राज्याच्या राजकारणात पुन्हा मोठी राजकीय घडामोड घडण्याची शक्यता आहे. भाजप आणि शिवसेना शिंदे गटामध्ये अजूनही धुसफूस सुरू असल्याची चर्चा सुरू आहे. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोडून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ते भेट घेण्याची शक्यता आहे. त्याचसोबत ते भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची देखील भेट घेणार असल्याचे बोलले जात आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. ते भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची भेट घेणार आहेत. यावेळी ते तीन निवडणुकांचा अहवाल देण्याची शक्यता आहे. या दौऱ्यादरम्यान जागावाटप आणि मित्रपक्षांमधील समन्वयावर ते चर्चा करणार असल्याचे सांगितले जात आहे. राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेश सुरू असताना एकनाथ शिंदे हे दिल्लीला गेले असल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा होऊ लागली आहे. जागा वाटपाचा तिढा सोडवणे आणि मंत्रिमंडळ विस्ताराबाबत ते या दौऱ्यादरम्यान चर्चा करणार असल्याचे बोलले जात आहे.

Maharashtra Politics: भाजप- शिंदेसेनेत अजूनही धुसफूस? एकनाथ शिंदे PM मोदींच्या भेटीला
KDMC Politics : ठाकरे सेनेचा धक्कादायक निर्णय! नवनिर्वाचित नगरसेवकाची पक्षातून हकालपट्टी

दिल्ली दौऱ्यावर असलेल्या एकनाथ शिंदे यांनी सोमवारी रात्री दिल्लीमध्ये अधिवेशनात सहभागी होणाऱ्या सर्व शिवसेना खासदारांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी सर्व खासदारांना संसदेत पक्षाची भूमिका काय असावी याबाबत मार्गदर्शन केले. दिल्ली दौऱ्यादरम्यान ते पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार असल्याचे सांगितले जात आहे. तसंच ते सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेल्या न्यायालयीन लढाईचा आढावा घेण्यासाठी वकिलांची देखील भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Maharashtra Politics: भाजप- शिंदेसेनेत अजूनही धुसफूस? एकनाथ शिंदे PM मोदींच्या भेटीला
Poilitical Crisis News : पक्ष कार्यालय अजित पवार गटाचच Hasan Mushrif यांचे विधान

दरम्यान, महापालिका निवडणुकीमध्ये महायुतीमधील भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांना खूप चांगले यश मिळाले. राज्यातील बऱ्याच महापालिकांवर महायुतीची सत्ता आली. यामधील काही महापालिकांवर भाजपचा महापौर झाला तर काही ठिकाणी शिंदेसेनेचा महापौर झाला. महापालिका निवडणुकीनंतर झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये देखील महायुतीला चांगले यश मिळाले. या निवडणुकीतही भाजप आणि शिंदेसेना दोन्ही पक्षांना चांगले यश मिळाले. दोन्ही निवडणुकीत चांगले यश मिळवून देखील शिवसेना- भाजपमध्ये भिनसलं असल्याचे दिसून आले. निकालानंतर अनेक ठिकाणी आपल्याला सत्तेपासून दूर ठेवलं गेल्याचा आरोप केला गेला. आता शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावर भाजप-शिंदेसेनेत अजूनही धुसफूस सुरू असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Maharashtra Politics: भाजप- शिंदेसेनेत अजूनही धुसफूस? एकनाथ शिंदे PM मोदींच्या भेटीला
Maharashtra Politics: राज्यसभेच्या निवडणुकीदरम्यान काँग्रेसनं टाकला डाव; भाजपच्या अनेक नेत्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com