

अभिजीत सोनवणे, इगतपुरी, नाशिक | साम टीव्ही
राज्यात महिला आणि मुलींवरील अत्याचाराच्या घटना हा चिंतेचा विषय ठरला असतानाच, नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीमध्ये एका तरुणीवर चार वर्षांपूर्वी दोन वेळा बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी संबंधित तरुणीनं इगतपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या घटनेची गंभीर दखल घेऊन पोलिसांनी तात्काळ संशयित आरोपीवर गुन्हा नोंदवला आहे.
राज्यातील काही भागांत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेचा मुद्दा अतिशय गंभीर झाला आहे. बीडमध्ये एका विवाहितेचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केले. त्यानंतर चावडीवर नेऊन बांधल्याची अत्यंत संतापजनक घटना घडलेली असतानाच, नाशिकच्या इगतपुरीत तरुणीवर अत्याचार झाल्याची घटना उघड झाली आहे.
पीडित तरुणीने या प्रकरणी इगतपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, २०२२ मध्ये पीडिता अल्पवयीन होती. त्यावेळी तिच्यावर अत्याचार करण्यात आला होता. मैत्री करून विश्वास संपादन केल्यानंतर धर्म लपवून फसवणूक केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. लग्नासाठी धर्मांतरण करण्यात यावा यासाठी दबाव टाकल्याचा उल्लेखही तक्रारीत करण्यात आला आहे.
पीडित मुलगी ही सध्या १९ वर्षांची असून, २०२२ मध्ये ती अल्पवयीन असताना तिच्यावर अत्याचार करण्यात आला होता. इगतपुरीच्या एका मंदिर परिसरात बोलावून पीडितेला धमकावल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. कुटुंबाला संपवण्याची धमकी देत अत्याचार केल्याचे आरोप पीडितेने केला आहे.
पीडित तरुणीने इगतपुरी पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, आरोपीने घरात घुसून दोन वेळा बलात्कार केला. धर्मांतरासाठी वारंवार दबाव टाकला, असा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या प्रकरणी संशयित आरोपीविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. भारतीय न्याय संहिता, 2023 मधील कलम 64 (2) (d), 329 (2), 351(2) अन्वये तसेच पॉक्सो अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा अधिक तपास सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.