Mumbai Crime: मुंबई हादरली! मनसे कार्यकर्त्याकडून तरुणाची हत्या, भररस्त्यात धारदार शस्त्राने सपासप वार

cab driver attack biker fatal incident Mumbai: मुंबईमध्ये मनसे कार्यकर्त्याने दुचाकीस्वाराची हत्या केली. दुचाकीला कारने पाठीमागून धडक दिल्याने वाद झाला होता. या वादानंतर मनसे कार्यकर्त्यासह एकाने तरुणाची हत्या केली.
Mumbai Crime: मुंबई हादरली! मनसे कार्यकर्त्याकडून तरुणाची हत्या, भररस्त्यात धारदार शस्त्राने सपासप वार
Mumbai Crime Saam Tv
Published On

Summary -

  • मुंबईमध्ये दिवसाढवळ्या तरुणाची हत्या

  • मनसे कार्यकर्त्याने केली दुचाकीस्वाराची हत्या

  • गोरेगावच्या बांगुरनगर परिसरातील घटना

  • दोन आरोपींना पोलिसांनी केली अटक

संजय गडदे, मुंबई

मुंबईमध्ये किरकोळ वादातून २७ वर्षांच्या तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. गोरेगावच्या बांगुरनगर परिसरात ही घटना घडली. दुचाकीला कारने पाठीमागून धडक दिली. यावरून कॅबचालक आणि दुचाकीस्वार यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. यावेळी कॅबचालक आणि प्रवाशाने दुचाकीस्वाराला मारहाण केली आणि त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना शनिवारी सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास बांगुरनगरमध्ये घडली. शरीफ अन्सारी (२७ वर्षे) मालवणी बॅक रोडवरून गोरेगावकडे दुचाकीवरून जात होता. यावेळी त्याच्या दुचाकीला मागून आलेल्या कॅबने धडक दिली. यावेळी कॅबमध्ये चालक सत्येंद्र गुप्ता (२८ वर्षे) आणि प्रवासी सुनील पाल (२७ वर्षे) होते. दुचाकीला धडक दिल्यामुळे संतप्त झालेल्या शरीफ अन्सारीने कॅब अडवून हेल्मेटने कारवर हल्ला केला.

Mumbai Crime: मुंबई हादरली! मनसे कार्यकर्त्याकडून तरुणाची हत्या, भररस्त्यात धारदार शस्त्राने सपासप वार
Mumbai Crime: मुंबई हादरली! भांडुपमध्ये शाळकरी मुलाची मित्रांकडून हत्या, आधी संपवलं नंतर तलावात फेकलं

त्यानंतर कॅब चालक आणि शरीफ अन्सारी यांचा वाद सुरू झाला. सुरूवातीला शाब्दीक बाचाबाची झाली त्यानंतर हाणामारी झाली. यावेळी कॅब चालक सत्येंद्र गुप्ता आणि प्रवासी सुनील पाल यांनी धारदार शस्त्राने शरीफ अन्सारीवर हल्ला केला. या हल्ल्यात शरीफ गंभीर जखमी झाला. स्थानिकांनी त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेलं. पण डॉक्टरांनी उपचारापूर्वी त्याला मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच बांगूर नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला.

Mumbai Crime: मुंबई हादरली! मनसे कार्यकर्त्याकडून तरुणाची हत्या, भररस्त्यात धारदार शस्त्राने सपासप वार
Navi Mumbai Crime: माचिस दिली नाही म्हणून केली निर्घृण हत्या; धक्कादायक घटनेनं नवी मुंबईत खळबळ

बांगुरनगर पोलिसांनी अवघ्या काही तासांतच दोन्ही आरोपींना गोरेगाव परिसरातून अटक केली. पोलिस तपासात आरोपी सत्येंद्र गुप्ता हा मनसेचा कार्यकर्ता असल्याचे समोर आले असून तो ओला कॅब चालक म्हणून काम करत होता. तर दुसरा आरोपी सुनील पाल हा वॉटर पंप मेकॅनिक असून कामानिमित्त अंधेरीकडे जात होता. सत्येंद्र गुप्ताकडे धारदार शस्त्र कुठून आले आणि या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का? याचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

Mumbai Crime: मुंबई हादरली! मनसे कार्यकर्त्याकडून तरुणाची हत्या, भररस्त्यात धारदार शस्त्राने सपासप वार
Mumbai Crime: मुंबई हादरली! नवऱ्याकडून बायकोची हत्या, व्हिडीओ कॉल करत मुलाला दाखवला मृतदेह

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com