Mumbai Crime: मुंबई हादरली! नवऱ्याकडून बायकोची हत्या, व्हिडीओ कॉल करत मुलाला दाखवला मृतदेह

Man Kills Wife Over Black Magic Suspicion: मुंबईतल्या धारावीमध्ये एका व्यक्तीने बायकोची हत्या केली. गळा दावून आणि बाटलीने हल्ला करत त्याने बायकोला जागीच संपवलं. त्यानंतर मुलाला व्हिडीओ कॉल करत मृतदेह दाखवला.
Mumbai Crime: मुंबई हादरली! नवऱ्याकडून बायकोची हत्या, व्हिडीओ कॉल करत मुलाला दाखवला मृतदेह
Mumbai Crime Saam Tv
Published On

Summary:

  • धारावीमध्ये काळी जादूच्या संशयातून बायकोची हत्या

  • बायकोचा मृतदेह मुलाला व्हिडीओ कॉलवर दाखवला

  • आरोपीने गळा दाबून बायकोची हत्या केली

  • धारावी पोलिसांनी आरोपीला अटक केली

संजय गडदे, मुंबई

नवऱ्याने बायकोची हत्या केल्याची धक्कादायक घटना मुंबईत घडली. मुंबईतल्या धारावी परिसरात ही घटना घडली असून यामुळे एकच खळबळ उडाली. काळी जादू केल्याच्या संशयातून नवऱ्याने हे भयंकर कृत्य केले. बायकोची हत्या केल्यानंतर आरोपीने व्हिडीओ कॉल करत मुलाला मृतदेह दाखवला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अमृत सोलंकी (५८ वर्षे ) असं आरोपीचे नाव आहे. तर सूरजबेन सोलंकी असं हत्या झालेल्या महिलेचे नाव होते. अमृत सोलंकी धारावीमध्ये बायकोसोबत राहतो. तर त्याचा मुलगा शिवराम सोलंकी (३३ वर्षे) मुलुंडमध्ये राहतो. शुक्रवारी दुपारी आरोपी अमृतने बायकोची हत्या केली. काळी जादू केल्याच्या संशयावरून त्याने गळा दाबून बायकोला संपवलं. त्याने बायकोवर बाटलीने देखील हल्ला केला होता. त्यानंतर त्याने मुलाला व्हिडीओ कॉल करत आईचा मृतदेह दाखवला.

Mumbai Crime: मुंबई हादरली! नवऱ्याकडून बायकोची हत्या, व्हिडीओ कॉल करत मुलाला दाखवला मृतदेह
Pune Crime: कॉलेजबाहेर रक्तरंजित थरार, विद्यार्थिनीवर कोयत्याने वार करत तरुणाची आत्महत्या; पुणे हादरले

आईला काही तरी झाले त्यामुळे घाबरून अमृतचा मुलगा शिवराम मुलुंडवरून धारावीतील घरी आला. त्यावेळी घराचा दरवाजा आतून बंद होता. त्यामुळे त्याने वडिलांना फोन केला पण त्यांनी उचलला नाही. त्यानंतर शिवरामने घटनेची माहिती पोलिसांना दिली. धारावी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घराचा दरवाजा तोडला. त्यांनी महिलेचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. या प्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत अमृत सोलंकीला अटक केली. पोलिस पुढील तपास करत आहेत.

Mumbai Crime: मुंबई हादरली! नवऱ्याकडून बायकोची हत्या, व्हिडीओ कॉल करत मुलाला दाखवला मृतदेह
Crime: बायकोचं अनैतिक संबंध असल्याचा नवऱ्याला संशय, भेटायला बोलावून तरुणाला जागीच संपवलं; ठाणे हादरले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com