Pune Crime: कॉलेजबाहेर रक्तरंजित थरार, विद्यार्थिनीवर कोयत्याने वार करत तरुणाची आत्महत्या; पुणे हादरले

Pune Police: पुण्यामध्ये एकतर्फी प्रेमातून भयंकर घटना घडली. कोयत्याने तरुणीवर सपासप वार करण्यात आले. हल्ल्यानंतर आरोपी तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली आहे.
Pune Crime: कॉलेजबाहेर रक्तरंजित थरार, विद्यार्थिनीवर कोयत्याने वार करत तरुणाची आत्महत्या; पुणे हादरले
Pune Crime Saam Tv
Published On

Summary -

  • जुन्नरमध्ये विद्यार्थिनीवर कोयत्याने हल्ला

  • एकतर्फी प्रेमातून तरुणाने हा हल्ला केल्याची माहिती

  • हल्ल्यानंतर आरोपीने गळफास घेऊन आत्महत्या केली

  • जखमी विद्यार्थिनीवर रुग्णालयात उपचार सुरू

रोहिदास गाडगे, जुन्नर

पुण्यामध्ये एकतर्फी प्रेमातून कॉलेजबाहेर रक्तरंजित थरार झाला. तरुणाने विद्यार्थिनीवर कोयत्याने सपासप वार केले. त्यानंतर या तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यात घडली. तरुणीने लग्नाला नकार दिल्यामुळे तरुणाने हे भयंकर कृत्य केले. या घनटेमुळे पुणे हादरले. या हेल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, महेश डामसे असं आरोपी आणि आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव होते. महेशचे एका तरुणीवर प्रेम होते. मात्र ती लग्नाला होकार देत नव्हती. या रागातून त्याने तरुणीवर हल्ला करण्याचा कट रचला. ही तरुणी जुन्नरमधील एका वसतीगृहात राहत होती. ती वसतिगृहातून महाविद्यालयात जाण्यासाठी निघाली होती. तेव्हा सरकारी रुग्णालयाच्या मागे महेशने तिला गाठले आणि कोयत्याने तिच्या डोक्यावर-चेहऱ्यावर सपासप वार केले.

Pune Crime: कॉलेजबाहेर रक्तरंजित थरार, विद्यार्थिनीवर कोयत्याने वार करत तरुणाची आत्महत्या; पुणे हादरले
Pune Crime : पुण्यातील धक्कादायक घटना, गॅस सिलिंडरच्या टाकीने ठेचून हत्या, कारण वाचून थक्क व्हाल

बुधवारी सकाळी घडलेल्या या धक्कादायक घटनेत तरुणी गंभीर जखमी झाली. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तरुणीवर हल्ला केल्यानंतर आरोपी महेश घटनास्थळावरून फरार झाला होता. जुन्नर पोलिसांनी महेशविरोधात गुन्हा दाखल करत त्याचा शोध सुरु केला होता. आज सकाळी एका टेकडीवर महेशची गाडी आढळून आली. त्या परिसरात पोलिसांनी महेशचा शोध घेतला असता एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला.

Pune Crime: कॉलेजबाहेर रक्तरंजित थरार, विद्यार्थिनीवर कोयत्याने वार करत तरुणाची आत्महत्या; पुणे हादरले
Crime: घरी जाणाऱ्या विद्यार्थिनीचं कारमधून अपरहण, गुंगीचे औषध देऊन बलात्कार

जुन्नर पोलिसांनी महेशचा शोध घेत असताना सीसीटीव्ही फुटेज तपासले. सीसीटीव्हीमध्ये त्या परिसरात तो एकटाच गेल्याचं दिसून आलं त्यामुळं ही आत्महत्या असल्याचं दिसून येत आहे. एकतर्फी प्रेमातून घडलेल्या या घटनेनं जुन्नर तालुका हादरून गेला आहे. या घटनेचा तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेनंतर निवासी वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Pune Crime: कॉलेजबाहेर रक्तरंजित थरार, विद्यार्थिनीवर कोयत्याने वार करत तरुणाची आत्महत्या; पुणे हादरले
Crime: किरकोळ वादातून भयंकर हत्याकांड, तलवारीने सपासप वार करत तरुणाने बायको अन् मुलाला संपवलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com