Crime: किरकोळ वादातून भयंकर हत्याकांड, तलवारीने सपासप वार करत तरुणाने बायको अन् मुलाला संपवलं

Rajasthan Crime: राजस्थानमध्ये एका तरुणाने किरकोळ वादातून बायको आणि मुलाची निर्घृण हत्या केली. दोघांवर तलवारीने सपासप वार करत तरुणाने संपवलं. या घटनेमुळे राजस्थानमध्ये खळबळ उडाली.
Crime: पुणे हादरले! कॉलेजबाहेर विद्यार्थिनीवर जीवघेणा हल्ला, कोयत्याने सपासप वार
Student Attacked with Sickle Outside CollegeSaam tv
Published On

Summary:

  • जयपूरमध्ये तलवारीने पत्नी आणि मुलाची हत्या

  • कौटुंबिक वादातून राजस्थानमध्ये दुहेरी हत्याकांड

  • जयपूर ग्रामीण भागात घडली धक्कादायक घटना

  • पत्नी आणि मुलाच्या हत्येनंतर आरोपीला पोलिसांनी अटक

राजस्थानमध्ये मन सुन्न करणारी घटना घडली. एका तरुणाने बायको आणि चिमुकल्या मुलाची तलवारीने सपासप वार करत हत्या केली. ही घटना राजधानी जयपूरच्या दूदूमधील बिचून गावात घडली. घरगुती वादातून तरुणाने हे भयंकर कृत्य केले. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली. आई आणि चिमुकल्याच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

गुरूवारी पहाटे हे भयंकर हत्याकांड घडलं. आरोपी तरुणाचे बायकोसोबत काही कारणावरून वाद झाला. दोघांमध्ये बराच वेळ भांडण सुरू होते. हा वाद इतका विकोपाला गेला की आरोपी तरुणाने रागाच्या भरात आधी बायकोवर सपासप वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा जागीच मृत्यू झाला. आरोपीने आपल्या चिमुकल्या मुलाला देखील सोडले नाही. त्याने मुलाची गळा चिरून हत्या केली. या घटनेमुळे घरातील सर्व सदस्यांना मोठा धक्का बसला.

Crime: पुणे हादरले! कॉलेजबाहेर विद्यार्थिनीवर जीवघेणा हल्ला, कोयत्याने सपासप वार
Pune Crime : पुण्यातील धक्कादायक घटना, गॅस सिलिंडरच्या टाकीने ठेचून हत्या, कारण वाचून थक्क व्हाल

या घटनेनंतर गावात खळबळ उडाली. गावकऱ्यांनी मुखमपुरा पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोघांचे मृतेदह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. त्यानंतर पोलिसांनी संपूर्ण परिसराला घेराव घालत आरोपीला ताब्यात घेतलं. सध्या पोलिसांकडून आरोपीची चौकशी सुरू आहे.

Crime: पुणे हादरले! कॉलेजबाहेर विद्यार्थिनीवर जीवघेणा हल्ला, कोयत्याने सपासप वार
Nashik Crime : नाशिकमध्ये नदीत आढळलेल्या मृतदेहाचं गुढ समोर; पत्नीने भाऊ आणि प्रियकराच्या मदतीने रचला कट

सुरुवातीच्या तपासात असे दिसून आले आहे की, नवरा- बायकोमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून घरगुती वाद सुरू होता. या तणावामुळे दोघांमध्ये वारंवार भांडणे होत होती. या वादाचे शेवटी या भयानक घटनेत रूपांतर झाले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी फॉरेन्सिक सायन्स लॅबमधील एका टीमला बोलावून घेतलं. या टीमने घटनास्थळावरून अनेक महत्त्वाचे पुरावे गोळा केले असून तपासणी केली जात आहे. घटनेमागील सत्य उलगडण्यासाठी पोलिस जवळपासच्या रहिवाशांची आणि कुटुंबातील सदस्यांचीही चौकशी करत आहेत.

Crime: पुणे हादरले! कॉलेजबाहेर विद्यार्थिनीवर जीवघेणा हल्ला, कोयत्याने सपासप वार
Crime: पुणे हादरले! कॉलेजबाहेर विद्यार्थिनीवर जीवघेणा हल्ला, कोयत्याने सपासप वार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com