Bharat Nagpal Killing Case: भारत नागपाल हत्याकांड प्रकरण; दोषींना फाशीची शिक्षा द्या! नागपाल यांच्या न्यायासाठी हजारो नागरिकांचा कॅण्डल मार्च

Bharat Nagpal Killing Case: चंद्रपूर जिल्ह्याच्या बांबर्डा येथे वर्धा जिल्ह्याच्या पुलगावं येथील उद्योजक भारत नागपाल यांची हत्या झाली होती. हत्येतील दोषींना कठोर शिक्षा द्यावी या मागणीसाठी नागरिकांनी कॅण्डल मार्च काढला.
Bharat Nagpal Killing Case:
Citizens hold candlelight march in Pulgaon demanding strict punishment for the accused in the Bharat Nagpal murder case.saam
Published On
Summary
  • उद्योजक भारत नागपाल यांच्या हत्येनंतर पुलगावमध्ये संतापाची लाट.

  • आरोपींना फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी हजारो नागरिकांचा कॅण्डल मार्च.

  • शहरातील सर्वपक्षीय नागरिक आणि नेते आंदोलनात सहभागी.

चेतन व्यास, साम प्रतिनिधी

वर्धा जिल्ह्याच्या पुलगांव येथील उद्योजक भारत नागपाल याची चंद्रपूर जिल्ह्याच्या बांबर्डा येथे निर्घृण हत्या करण्यात आली होती.या घटनेनंतर संपूर्ण जिल्ह्यात खळबळ माजली आहे. आपल्या वडिलांना न्याय मिळावा याकरिता दोन वर्षाचा चिमुकला प्रशासनाला कठोर कारवाईची मागणी करत आहे. दुसरीकडे आज पुलगावं शहरात हजारो महिलांसाह नागरिकांनी रस्त्यावर हातात मेणबत्या घेत या घटनेचा निषेध नोंदविला आहे.

Bharat Nagpal Killing Case:
Crime News: मुंब्रा फायरिंग प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; एका तासात आरोपी जेरबंद

पुलगांव नगरपालिकेसमोर या कॅण्डल मार्चला सुरवात झाली. शहराच्या मुख्य मार्गाने होत पुन्हा नगरपालिकेसमोर या कॅण्डल मार्चचे समारोप झाले या कॅण्डल मार्च मध्ये पुलगांव शहरातील सर्वपक्षीय नागरिकांची उपस्थिती होती. यासंह आमदार राजेश बकाने, भाजपा जिल्हाध्यक्ष संजय गाते,नगराध्यक्ष कविता ब्राम्हणकर यांच्यासह पालिकेतील सर्व पक्षीय नगरसेवक उपस्थित होते. नागपाल हे भाजपा पुलगावचे महामंत्री होते यासंह त्यांच्या आई या पुलगांव नगरपालिकेच्या नगरसेवक आहेत. नागपाल हत्याकांडतील बारा आरोपीना वरोरा पोलिसांनी अटक केली आहे.

Bharat Nagpal Killing Case:
Bomb Threat Call: धक्कादायक! नांदेड बस स्थानक बॉम्बने उडवण्याची धमकी

प्रकरणाचा तपास सीआयडी कडे सोपवून आरोपीना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी सगळीकडे होत आहे सोबतच प्रकरण जलदगती न्यायालयात चालवावे अशी मागणी आता जोर धरत आहे. भारत नागपाल यांची हत्या नंतर संपूर्ण पंजाबी समाजाने सुद्धा रोष व्यक्त करत निषेध केला आहे.वर्धा जिल्ह्यासह विदर्भातील अनेक शहरामध्ये पंजाबी समाजाने या घटनेचा निषेध करत कडक कारवाईची मागणी केली आहे. आज पुलगावच्या कॅण्डल मार्च मध्ये पूर्ण पंजाबी समाज उपस्थित होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com