Crime: बायकोचं अनैतिक संबंध असल्याचा नवऱ्याला संशय, भेटायला बोलावून तरुणाला जागीच संपवलं; ठाणे हादरले

Thane Crime: ठाण्यामध्ये बायकोच्या अनैतिक संबंधाच्या संशयावरून एका व्यक्तीने तरुणाची निर्घृण हत्या केली. हतोड्याने डोक्यावर वार करण्यात आले. पोलिसांनी आरोपीला अटक केली.
Thane Crime: बायकोचं अनैतिक संबंध असल्याचा नवऱ्याला संशय, भेटायला बोलावून तरुणाला जागीच संपवलं; ठाणे हादरले
Thane Crime News Saam tv
Published On

Summary:

  • बायकोसोबत अनैतिक संबंधाच्या संशयातून तरुणाची हत्या

  • दारू पिण्याच्या बहाण्याने बोलावून हातोड्याने हत्या

  • ठाण्याच्या दायघर परिसरातील भातशेतात मृतदेह आढळला

  • ठाणे पोलिसांनी काही तासांत आरोपीला अटक केली

बायकोच्या चारित्र्यावर संशय घेत नवऱ्याने एका तरुणाची निर्घृण हत्या केल्याची घटना ठाण्यात घडली. रोजंदारीवर काम करणाऱ्या व्यक्तीने वेटरची हत्या केली. डोक्यामध्ये हातोडा घालून वेटरला संपवण्यात आले. ही घटना ठाण्याच्या शिळ-दायघर परिसरात घडली. पोलिसांनी या घटनेच्या अवघ्या ४ तासांतच आरोपीला अटक केली. पोलिस सध्या आरोपीची चौकशी करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रकाश बिसा असं हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव होते. तो मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी होता. प्रकाश नवी मुंबईतील महापेमध्ये वेटर म्हणून काम करत होता. त्याचा मृतदेह दायघर परिसरातील पिंपरी गावात भाताच्या शेतात आढळून आला. त्याची हत्या करण्यात आली होती. डोक्यावर गंभीर जखमा होत्या. पोलिसांनी त्याचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयामध्ये पाठवला.

Thane Crime: बायकोचं अनैतिक संबंध असल्याचा नवऱ्याला संशय, भेटायला बोलावून तरुणाला जागीच संपवलं; ठाणे हादरले
Crime: किरकोळ वादातून भयंकर हत्याकांड, तलवारीने सपासप वार करत तरुणाने बायको अन् मुलाला संपवलं

८ मार्च ते १० मार्च रोजी सकाळी प्रकाश बिसा बेपत्ता झाला होता. हॉटेल मालकाने पोलिसांशी संपर्क केला त्यानंतर हे भयंकर हत्याकांड प्रकरण उघड झाले. हॉटेल मालकाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी बेपत्ता प्रकाशबाबत तक्रार नोंदवून घेत तपास सुरू केला. पोलिसांनी हत्या झालेल्या ठिकाणाजवळील सीसीटीव्ही फूटेज तपासले. तसंच स्थानिकांनी दिलेली माहितीच्या आधारे पोलिसांनी अवघ्या काही तासांमध्येच आरोपीला अटक केली.

Thane Crime: बायकोचं अनैतिक संबंध असल्याचा नवऱ्याला संशय, भेटायला बोलावून तरुणाला जागीच संपवलं; ठाणे हादरले
Beed Crime : बाहेर खेचलं, उचलून आपटलं; शिक्षणासाठी वेटरचं काम करणाऱ्या तरुणाला टोळक्याची निर्दयी मारहाण

याप्रकरणी पोलिसांनी शिळगावमध्ये राहणाऱ्या रामराव जाधव यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं. रामरावने हत्येची कबुली दिली. त्याने पोलिसांना सांगितले की, वेटर प्रकाश बिसाचे त्याच्या बायकोसोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय होता. याच रागातून त्याने प्रकाशची हत्या केली. प्रकाशला त्याने दारु पिण्याच्या बहाण्याने बोलावले. त्यानंतर दोघे भातशेतात गेले. त्याचठिकाणी रामरावमे हातोड्याने प्रकाशच्या डोक्यावर वार करत त्याची हत्या केली.

Thane Crime: बायकोचं अनैतिक संबंध असल्याचा नवऱ्याला संशय, भेटायला बोलावून तरुणाला जागीच संपवलं; ठाणे हादरले
Kalyan Crime : 'मी माझ्या बायकोला मारून आलो'; हैवान नवऱ्यानं ९ वर्षांच्या मुलासमोरच बायकोचा जीव घेतला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com