

मुंबईच्या टिळकनगरमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना घडली आहे. दोन नराधमांनी मुलीला झुडपात नेऊन सामूहिक अत्याचार केला. पोलिसांनी दोघांवर अत्याचाराचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे. अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीच्या जबाबाच्या आधारे दोन आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
टिळक नगर पोलीस ठाण्यात या प्रकरणाची नोंद करण्यात आली असून आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडितेच्या जबाबावरून तातडीने कारवाई करून आरोपींना अटक करण्यात आली. या प्रकरणात पोलिसांनी पुरावे गोळा करण्याचं काम सुरू केलंय.
अटक केलेल्या दोन्ही आरोपींना उद्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली असून मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी आश्वासन दिलंय की, या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.
या घटनेमुळे समाजात महिलांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. नागरिकांनी पोलिसांकडे अधिक दक्षता घेण्याची मागणी केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.