Beed Crime : बाहेर खेचलं, उचलून आपटलं; शिक्षणासाठी वेटरचं काम करणाऱ्या तरुणाला टोळक्याची निर्दयी मारहाण

Beed crime news : बीडमधील गुंडगिरी ठेचून काढण्याचं आव्हान आता पोलिसांसमोर आहे. एका टोळक्यानं क्षुल्लक कारणावरून वेटरचं काम करून शिक्षण घेणाऱ्या निष्पाप तरुणाला निर्दयीपणे मारहाण केल्याची घटना घडलीय.
बीडमध्ये पुन्हा गुंडगिरी, वेटर तरुणाला टोळक्यानं बेशुद्ध पडेपर्यंत मारले
beed crime gang assault on student at juice centresaam tv
Published On

योगेश काशिद, बीड | साम टीव्ही न्यूज

महाराष्ट्रातील बीडमधील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न 'हाताबाहेर' गेल्याचं चित्र सध्या दिसून येत आहे. गुंडांच्या टोळ्यांनी धुडगूस घातला असून, सर्वसामान्यांमध्ये दहशतीचं वातावरण आहे. एका तरुणाला निर्दयी मारहाण केल्याची घटना घडल्यानं बीड पुन्हा चर्चेत आलं आहे. क्षुल्लक कारणावरून एका टोळक्यानं तरुणाला बेदम मारहाण केली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

क्षुल्लक कारणावरून बीडच्या तेलगाव येथे ज्यूस सेंटरमध्ये वेटरचं काम करणाऱ्या तरुणाला टोळक्यानं अमानुष मारहाण केली. ही धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सागर विजय जाधव असं मारहाण झालेल्या तरुणाचं नाव आहे.

तेलगाव येथील त्रिमूर्ती ज्युस सेंटरमध्ये रिकामे ग्लास जिन्यावरून खाली घेऊन येत असताना पायरीवरून बाजूला हो असं बोलला म्हणून राग आलेल्या तीन ते चार जणांनी त्याला बेदम मारहाण केली.

सुरुवातीला दोन-तीन जण सेंटरमधून बाहेर निघाले. त्यातील एक जण बाजूलाच थांबला. त्यानं या तरुणाला बाहेर खेचले. पायरीवरून खाली ओढून त्याला मारहाण केली. तोपर्यंत बाहेर गेलेला एक जण धावून आला. त्यानं रागाच्या भरात तरुणाला उचललं आणि जमिनीवर आपटलं. या मारहाणीत तरुण जखमी झाला. त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

बीडमध्ये पुन्हा गुंडगिरी, वेटर तरुणाला टोळक्यानं बेशुद्ध पडेपर्यंत मारले
Pune Crime: कॉलेजबाहेर रक्तरंजित थरार, विद्यार्थिनीवर कोयत्याने वार करत तरुणाची आत्महत्या; पुणे हादरले

जखमी तरुण हा बीड तेलगावच्या हायस्कूलमध्ये शिक्षण घेतो. शिक्षण घेता घेता तो उदरनिर्वाहासाठी एका ज्यूस सेंटरमध्ये वेटरचे काम करत आहे. अत्यंत गरीब कुटुंबातून कष्ट करून शिक्षण घेणाऱ्या या तरुणाला अशा प्रकारे निर्दयी मारहाण केल्यानं हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेनं बीडमधील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. परिसरात या टोळ्यांची प्रचंड दहशत आहे. संबंधितांवर गुन्हा दाखल करून तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. वृत्त प्रसिद्ध होईपर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती, असे सांगण्यात येत आहे.

बीडमध्ये पुन्हा गुंडगिरी, वेटर तरुणाला टोळक्यानं बेशुद्ध पडेपर्यंत मारले
Crime News : धक्कादायक! तीन दिवस बंदिस्त केलं, निर्जनस्थळी नेऊन १५ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com