Mumbai Crime: मुंबई हादरली! भांडुपमध्ये शाळकरी मुलाची मित्रांकडून हत्या, आधी संपवलं नंतर तलावात फेकलं
Summary -
भांडूपमध्ये १४ वर्षांच्या शाळकरी मुलाची हत्या
शाळेतील ३ मित्रांनीच केली हत्या
हत्या करून मृतदेह तलावात फेकला
पोलिसांनी आरोपींना घेतलं ताब्यात
मयूर राणे, मुंबई
मुंबईतल्या भांडूपमध्ये हत्याकांडाची भयंकर घटना घडली. आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांच्याच शाळेतील मित्राची हत्या केली. भांडूपच्या तुळशेत पाड्यात ही घटना घडली. सिद्धार्थ लोंढे (वय १४ वर्षे) असे हत्या करण्यात आलेल्या मुलाचे नाव होते. तरुणाचा मृतदेहतलावात सापडला होता. सुरूवातीला तो पोहताना तलावात बुडाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला होता. पण शवविच्छेदन अहवालातून हत्या झाल्याचे उघड झाले. या प्रकरणी पोलिसांनी सिद्धार्थ लोंढेच्या ३ मित्रांना ताब्यात घेतले.
भांडुप पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुळशेत पाडा परिसरात सिद्धार्थ लोंढे राहत होता. २२ फेब्रुवारीला दुपारी ३ वाजताच्या सुमारास तो खेळायला जातो सांगून घराबाहेर पडला. रात्री उशिरापर्यंत सिद्धार्थ घरी न आल्याने पालकांनी शोधाशोध सुरू केली. मात्र सिद्धार्थ कुठेच न सापडल्याने अखेर पालकांनी भांडुप पोलिस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करत शोध सुरू केला. मुलुंड पोलिसांच्या हद्दीमध्ये विहार तलावाजवळ २३ फेब्रुवारीला सिद्धार्थचा मृतदेह सापडला.
भांडुपमधील मुले विहार तलावात पोहण्यासाठी जातात त्यानुसार सिद्धार्थ पोहण्यासाठी गेला असता बुडाला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. त्यामुळे पोलिसांनी प्रथम अपमृत्यूची नोंद केली. याचदरम्यान सिद्धार्थचा शवविच्छेदन अहवाल समोर आला. त्यात सिद्धार्थच्या फुफ्फुस आणि पोटात पाणी नसल्याचे नमूद करण्यात आले होते. त्याचबरोबर डोक्याच्या मागील बाजूस दुखापत आणि अंतर्गत रक्तस्राव झाल्याचेही अहवालात नमूद होते. यावरून पोलिसांनी नव्याने तपास सुरू केला.
सिद्धार्थला त्याच्या एका मित्रासोबत शेवटचे पाहिल्याची माहिती काही प्रत्यक्षदर्शीनी दिली. त्यानुसार या मित्राला ताब्यात घेऊन चौकशी केली असता आम्ही चौघे पोहायला गेलो होतो. त्यावेळेस सिद्धार्थ बुडाल्याचे तो सांगू लागला. इतर दोन मित्रांनीही चौकशीत हेच सांगितले. शवविच्छेदन अहवालानुसार हत्येचा संशय असल्याने पोलिसांनी तिघांची स्वतंत्रपणे चौकशी केली असता अखेर त्यांनी सिद्धार्थला मारून तलावात टाकल्याचे कबुल केले. सिद्धार्थ आमच्यावर कायम दादागिरी करायचा. त्याला इंगा दाखविण्यासाठी तलावाजवळ बोलावून मारहाण केली. मारहाणीत काठीचा मार डोक्यावर बसल्याने तो बेशुद्ध पडला होता. त्यानंतर त्याला तलावाट टाकण्यात आल्याचे आरोपींनी सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

