Navi Mumbai Crime: माचिस दिली नाही म्हणून केली निर्घृण हत्या; धक्कादायक घटनेनं नवी मुंबईत खळबळ

Navi Mumbai Crime News: मोहम्मदने प्रसादच्या डोक्यात दगडाचा मारा करुन त्यांची हत्या केली. याप्रकरणी तुर्भे पोलिसांनी आरोपी मोहम्मद आलीला अटक करत खुनाचा गुन्हा दाखल केलाय.
Navi Mumbai Crime
Navi Mumbai CrimeSaam TV
Published On

सिद्धेश म्हात्रे

Crime News:

नवी मुंबईसह काल राज्यभरात गुन्हेगारीच्या अनेक घटना समोर आल्यात. शुल्लक कारणावरून थेट हत्या करण्यात आलीये. नवी मुंबईतील (New Mumbai) तुर्भे नाका या ठिकाणी एका कंपनीच्या गेटवर सुरक्षा रक्षकाची नोकरी करणाऱ्या इसमाची शुल्लक कारणावरून हत्या करण्यात आलीय.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Navi Mumbai Crime
Ahmednagar Crime: मुलीची छेड काढल्याने जमावाकडून चोप; चार महिलांच्या खुनाचा आरोप असलेल्या अण्णा वैद्यचा हल्ल्यात मृत्यू

आरोपी मोहम्मदने सिगारेट पेटविण्यासाठी प्रसाद भानुशाली याच्याकडे माचीस आहे का? असे विचारले. त्यावर त्याच्याकडे माचीस नसल्याचे सांगत प्रसादने नकार दिला. यावरून मोहम्मद आणि प्रसाद यांच्यात वाद झाला. यामध्ये मोहम्मदने प्रसादच्या डोक्यात दगडाचा मारा करुन त्यांची हत्या केली. याप्रकरणी तुर्भे पोलिसांनी आरोपी मोहम्मद आलीला अटक करत खुनाचा गुन्हा दाखल केलाय.

पिंपळगाव जोंगा धरणात ५५ वर्षीय अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला

जुन्नर (Junnar) तालुक्यातही अशीच खळबळजनक घटना घडली आहे. पिंपळगाव जोंगा येथील धरणात ५५ वर्षीय अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळलाय. पिंपळगाव जोगा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आढळुन आलेल्या मृतदेहाच्या डोक्याला केस नसल्याचे समजले आहे.

पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह सध्या ताब्यात घेतला असून त्याची ओळख अद्याप पटलेली नाही. सदर व्यक्तीची आत्महत्या आहे की घातपात याबाबत संभ्रम असून ओतुर पोलीसांकडून मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे.

अज्ञात इसमाचा खून करुण मृतदेह फेकला राष्ट्रिय महामार्गावर

भंडारा जिल्ह्यात गुन्हेगारी थांबता थांबत नाही. भंडारा -नागपूर राष्ट्रिय महामार्गावर कवडशी फाट्यावर अज्ञात इसमाचा खून करुन मृतदेह रस्त्यावर फेकण्यात आलाय. ही घटना मध्यरात्री 2 च्या सुमारास घडली. जवाहरनगर पोलिसांना याबाबत माहिती मिळताच पोलीस निरीक्षक आपल्या टीमसोबत घटनास्थळी पोहले. पंचनामा करून त्यांनी मृतदेह शविच्छेदनासाठी सामान्य रुग्णालयात पाठवला असून फरार आरोपीचा पोलिस शोध घेत आहेत.

Navi Mumbai Crime
Kalyan Crime: दर्शनासाठी जाणाऱ्या महिलेचा विनयभंग करत मंगळसूत्र हिसकावले; आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com