Ahmednagar Crime: मुलीची छेड काढल्याने जमावाकडून चोप; चार महिलांच्या खुनाचा आरोप असलेल्या अण्णा वैद्यचा हल्ल्यात मृत्यू

Akole News : अण्णा वैद्य याच्यावर विविध प्रकारच्या गुन्ह्यांसह चार महिलांचा खून केल्याचा आरोप आहे. खुनाच्या पहिल्या खटल्यात संगमनेर न्यायालयात त्याला झालेली जन्मठेप उच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवली होती
Ahmednagar Crime
Ahmednagar CrimeSaam tv
Published On

सचिन बनसोडे 

अकोले (अहमदनगर) : चार महिलांच्या खून प्रकरणात शिक्षा भोगलेला आणि काही गुन्ह्यांत निर्दोष मुक्त झालेला आरोपीने १० डिसेंबरला सायंकाळी एका अल्पवयीन मुलीची छेडछाड केल्याने (Crime News) संतप्त जमावाने त्याला चोप दिला. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले (Akole) तालुक्यातील सुगाव येथील मच्छिंद्र उर्फ अण्णा वैद्य (वय ५८) याचा जमावाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. (Live Marathi News)

Ahmednagar Crime
Kalyan Crime: दर्शनासाठी जाणाऱ्या महिलेचा विनयभंग करत मंगळसूत्र हिसकावले; आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

चार महिलांचा खून करून त्यांना शेतात पुरून ठेवल्याचा आरोप अण्णा वैद्य याच्यावर होता. संगमनेर (Ahmednagar) येथील ताराबाई राऊत या ४५ वर्षीय महिलेचा खून करून पुरावा नष्ट केल्याच्या आरोपावरून संगमनेरच्या न्यायालयाने वैद्य याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. विद्युत मोटार केबल चोरी प्रकरणात गावकऱ्यांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर हे साखळी खून प्रकरण उजेडात आले होते. या प्रकरणात त्याला जन्मठेप देखील झाली होती. उच्च न्यायालयात नंतर त्याची निर्दोष मुक्तता झाल्यावर तो सुगाव येथे राहत होता.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Ahmednagar Crime
Jalgaon Crime: जुना वाद मिटविण्यासाठी बोलावून केलाघात; जळगावात तरुणाची हत्या

दरम्यान रविवारी सायंकाळी अल्पवयीन मुलीची त्याने छेड काढली. त्यामुळे संतप्त जमावाने त्यास मारहाण केली. तसेच पोलिसांत फिर्याद दिली. या प्रकरणी अकोले पोलिसांत पोक्सो, अॅट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल होत असताना त्याला उपचारासाठी रात्री संगमनेर येथे हलवण्यात आले होते. त्यावेळी डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाला असल्याचे घोषित केले.

Ahmednagar Crime
Onion Crop: कांदा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव; वातावरण बदलाचा परिणाम

चार महिलांच्या खुनाचा आरोप
अण्णा वैद्य याच्यावर विविध प्रकारच्या गुन्ह्यांसह चार महिलांचा खून केल्याचा आरोप आहे. खुनाच्या पहिल्या खटल्यात संगमनेर न्यायालयात त्याला झालेली जन्मठेप उच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवली होती. त्यानंतर काही महिन्यांत दुसऱ्या खुनाच्या खटल्यातून संगमनेरच्या न्यायालयाने त्याची निर्दोष सुटका केली. तर तिसऱ्या प्रकरणात त्याला पुन्हा जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती आणि एका महिलेच्या खुनाचा खटला प्रलंबित असल्याचे सांगण्यात येतंय. हे सिरियल किलिंग राज्यभर गाजले होते. मात्र काल जमावाच्या हल्ल्यात अण्णा वैद्य याचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com