Kalyan Crime: दर्शनासाठी जाणाऱ्या महिलेचा विनयभंग करत मंगळसूत्र हिसकावले; आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Kalyan News : ऑक्टोबर महिन्यात ही घटना घडली. या प्रकरणी टिळकनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीचा शोध सुरु केला होता
Kalyan Crime
Kalyan CrimeSaam tv
Published On

अभिजित देशमुख

कल्याण : कल्याण होम बाबा टेकडी परिसरात दर्ग्यावर दर्शनासाठी गेलेल्या महिलेवर अतिप्रसंग करण्याचा (Kalyan) प्रयत्न करत तिचे मंगळसूत्र हिसकावून एकजण पसार झाला. ऑक्टोबर महिन्यात ही घटना घडली होती. महिलेले दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी संबंधितांचा शोध सुरु दिला होता. यानंतर आरोपीला टिळक नगर (Police) पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अमीर शेख असं या आरोपीचे नाव असून तो सराईत गुन्हेगार आहे. (Breaking Marathi News)

Kalyan Crime
Maval News : बंधाऱ्यावरून कार चालविणे आले अंगाशी; कार कोसळली इंद्रायणी नदीत

कल्याणच्या होमबाबा टेकडीवरील दर्गा दर्शनासाठी जात असताना एका महिलेवर अतिप्रसंग करण्याच्या प्रयत्न करण्यात आला. महिलेने आरडाओरड करत प्रतिकार केल्याने (Crime News) नराधम तिचे मंगळसूत्र घेऊन पसार झाला. ऑक्टोबर महिन्यात ही घटना घडली. या प्रकरणी  टिळकनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीचा शोध सुरु केला होता. डीसीपी सचिन गुंजाळ, एसीपी सुनील कुराडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गीते यांच्या मार्गदर्शनाखाली टिळक नगर पोलिसांच्या पथकाने या आरोपीचा शोध सुरू केला. आरोपीची ओळख पटवली असता आरोपी अमीर शेख असल्याचे समजले. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Kalyan Crime
Onion Export Ban: कांदा निर्यात बंदीमुळे २०० कंटेनर कांदा पडून; व्यापारी- शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

बदलापूर परिसरातून अटक 

अमीरच्या शोधासाठी पथके तयार करण्यात आली. तब्बल दोन महिने आरोपी आमिर शेख हा पोलिसांना चकवा देत होता. अमीर हा काही दिवस अजमेरला लपुन बसला होता. टिळकनगर पोलिसांचे पथक अजेमरला गेले. मात्र तेथून अमीर निसटला. त्यानंतर पोलीस त्याच्या मागावर होते. अखेर अमीर बदलापूर येथे येणार असल्याची माहिती टिळक नगर पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे टिळकनगर पोलिसांच्या पथकाने बदलापूर परिसरात सापळा रचत आमिरला अटक केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com