Navi Mumbai: गणिताचं उत्तर चुकल्याने शिक्षिका संतापली; विद्यार्थिनीला लाकडी बांबूने मारहाण, पोलिसांत गुन्हा

Kopar Khairane News: गृहपाठाला दिलेल्या गणिताचे उत्तर चुकल्याने नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला एका शिक्षिकेने लाकडी बांबूने मारहाण केली आहे.
student beating Student for failing maths answer incident in Ghansoli navi mumbai
student beating Student for failing maths answer incident in Ghansoli navi mumbaiSaam TV
Published On

सिद्धेश म्हात्रे, साम टीव्ही | ११ डिसेंबर २०२३

Teacher beat Student in Ghansoli

गृहपाठाला दिलेल्या गणिताचे उत्तर चुकल्याने नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला एका शिक्षिकेने लाकडी बांबूने मारहाण केली आहे. नवी मुंबईतील घणसोली परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी पीडित विद्यार्थिनीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी शिक्षिकेवर गुन्हा दाखल केला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

student beating Student for failing maths answer incident in Ghansoli navi mumbai
Wardha News: पोहण्याचा मोह जीवावर बेतला, एकाला वाचवण्याच्या नादात दुसराही बुडाला; वर्ध्यातील दुर्दैवी घटना!

शकीला अन्सारी, असं गुन्हा दाखल झालेल्या शिक्षिकेचं नाव आहे. या घटनेनं परिसरातून संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, पीडित विद्यार्थिनी घणसोली परिसरात राहते. ती सेक्टर ५ मध्ये असलेल्या सना या खासगी कोचिंग क्लासमध्ये शिकवणीला जाते.

दरम्यान, क्लासच्या शिक्षिका (Teacher) शकीला अन्सारी यांनी ट्यूशनमधील विद्यार्थ्यांना गृहपाठ दिला होता. त्यामध्ये काही विद्यार्थ्यांचा गृहपाठ पूर्ण झाला नव्हता. तर काहींची उत्तरे चुकली होती. पीडित मुलीचे देखील गणिताचे उत्तर चुकले होते.

यावरून शकीला यांना राग अनावर झाला. त्यांनी पीडितेला बांबू व लाकडी फळीने बेदम मारहाण केली. यामध्ये पीडितेच्या अंगावर ठिकठिकाणी सूज आली. दरम्यान, घरी गेल्यानंतर पीडित मुलीने हा प्रकार आपल्या आई-वडिलांना सांगितला.

मुलीच्या अंगावरील जखमा पाहून आई-वडिलांनी तातडीने पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी शनिवारी संध्याकाळी कोपर खैरणे पोलिसांनी शिक्षिका शकीला अन्सारी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

student beating Student for failing maths answer incident in Ghansoli navi mumbai
IND vs SA T20 Series: टीम इंडियाला सर्वात मोठा धक्का, द. आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतून स्टार खेळाडू बाहेर?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com