भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेला १० डिसेंबरपासून सुरूवात झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. आता दुसरा सामना १२ डिसेंबर रोजी खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात विजय मिळवून भारतीय संघ मालिकेत आघाडी घेईन, अशी आशा क्रीडाप्रेमींना आहे. मात्र, त्याआधीच टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
टीम इंडियाचा (Team India) स्टार गोलंदाज दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतून बाहेर झाल्याचं सांगण्यात येत आहे. तो दक्षिण आफ्रिकेत पोहचलाच नसल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे कोच व्ही.व्ही. एस लक्ष्मणसह कर्णधार सूर्यकुमार यादवचं टेन्शन वाढलं आहे.
हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून दीपक चहर आहे. आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी दीपक चहरची निवड करण्यात आली होती. मात्र, कौटुंबिक कारणामुळे दीपक हा टीम इंडियासोबत दक्षिण आफ्रिकेला गेला नव्हता.
दीपक पहिल्या सामन्याआधीच टीम इंडियासोबत जोडला जाईल, असं सांगितलं जात होतं मात्र, अजूनही तो दक्षिण आफ्रिकेत दाखल झालेला नाही. आता तो मालिकेतून माघार घेणार असल्याची माहिती आहे. आफ्रिकेच्या खेळपट्टीवर वेगवाग गोलंदाजांना चांगला स्वींग मिळतो.
दीपक चहरमध्ये चेंडू स्वींग करण्याची ताकद आहे. अशातच त्याने ऐनवेळी मालिकेतून माघार घेतल्याने टीम इंडियासाठी ही वाईट बातमी असेल. दरम्यान, बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले, की दीपक चहरच्या वडिलांची तब्येत खूपच खराब आहे.
"त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. त्यामुळे दीपकने काही दिवस आमच्याकडे सुट्टी मागितली होती. मात्र, अद्यापही तो संघासोबत जोडला नाही. दीपकच्या वडिलांची प्रकृती जोपर्यंत स्थिर होत नाही, तोपर्यंत आम्ही त्याला जबरदस्ती करणार नाही, त्याला मालिकेतून माघार घेण्याचा पर्याय उपलब्ध आहे", असंही बीसीसीआयने म्हटलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.