मावळ : कुंडमळ्यावर पर्यटनासाठी अनेकजण येत असतात. आकर्षण असलेल्या या धबधब्यावर (Maval) नाहक स्टंटबाजी केली जाते. असाच स्टंट करत कुंडमळ्यावर धाडस करत नदी ओलांडण्याचे धाडस जीवावर बेतले असते. नदी ओलांडत असताना कारवरील नियंत्रण सुटून कार थेट नदीच्या (Accident) डोहात जाऊन पडली. (Live Marathi News)
मावळातील पर्यटकांचे आकर्षण असलेला कुंडमळा धबधबा लोकप्रिय आहे. याच कुंडमळ्यावरील कोल्हापूर बंधाराऱ्यावरून धोकादायक पद्धतीने वाहन चालवताना चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने चारचाकी गाडी इंद्रायणी नदीच्या डोहात पडली. कुंड मळ्यावरून नको ते धाडस करून नदी ओलांडत होता. त्याचवेळी ही घटना घडली. घटनास्थळी मोठी क्रेन आणून या गाडीला बाहेर काढण्यात आले.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
दोघे बचावले
डोहात पडलेल्या गाडीत दोन प्रवासी होते; सुदैवाने ते बचावले आहेत. ही गाडी पिंपरी येथील एका पर्यटकाची होती. दरम्यान प्रशासनाच्या वतीने वारंवार आवाहन करून देखील वाहन चालक धोकादायक प्रवास करीत आहे. मात्र अशा पद्धतीने धोकादायक बंधाऱ्यावरून प्रवास केला; तर जिवावरही बेतू शकते. त्यामुळे अशा पद्धतीने प्रवास करू नये; असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून कार्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.