Onion Crop: कांदा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव; वातावरण बदलाचा परिणाम

Dhule News : अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आता रब्बी हंगामाँवर देखील परिणाम होण्याचे चित्र निर्माण झाले आहे
Onion Crop
Onion CropSaam tv
Published On

धुळे : धुळ्यात हवामान बदलाचा फटका कांदा पिकाला बसताना दिसून येत आहे. कांदा पिकावर (Dhule) आता करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे कांदा (Onion) पिकाचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली असून शेतकरी संकटात सापडला आहे. (Maharashtra News)

Onion Crop
Kalyan Crime: दर्शनासाठी जाणाऱ्या महिलेचा विनयभंग करत मंगळसूत्र हिसकावले; आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आता रब्बी हंगामाँवर देखील परिणाम होण्याचे (Farmer) चित्र निर्माण झाले आहे. आता थंडीची चाहूल लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून हवामानामध्ये सातत्याने बदल होत असल्याने याचा परिणाम शेती पिकावर होत असून कांदा पिकावर (Onion Crop) करपा रोकाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे आता कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत सापडला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Onion Crop
Jalgaon Crime: जुना वाद मिटविण्यासाठी बोलावून केलाघात; जळगावात तरुणाची हत्या

सकाळी धुके दुपारी उन्हाचा चटका 

वातावरणात आता बदल जाणवून येत आहे. थंडी पडत असल्याने त्याचा गहूसाठी फायदा होणार आहे. मात्र सकाळी पडणारे धुके आणि त्यानंतर दुपारी जाणवणारा उन्हाचा कडाका यामुळे कांदा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. वातावरणातील हा बदल पिकांसाठी हानिकारक ठरत आहे. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com