LPG Shortage : नेत्याच्या हॉटेलमध्ये आढळले तब्बल ८८ LPG सिलिंडर, पोलिसांनी ५ जणांविरोधात केली कारवाई

Uttar Pradesh LPG Cylinder Shortage News : उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षाचे नेते सोनू कन्नौजिया यांच्या हॉटेलमधून ८८ गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले आहेत. गॅसचा काळाबाजार केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
LPG Shortage : नेत्याच्या हॉटेलमध्ये आढळले तब्बल ८८ LPG सिलिंडर, पोलिसांनी ५ जणांविरोधात केली कारवाई
Uttar Pradesh SP Leader Sonu Kannaujia Gas Cylinder Black MarketingSaam Tv
Published On
Summary
  • सपा नेते सोनू कन्नौजिया यांच्यावर गॅस काळाबाजाराचा आरोप

  • लखनऊतील रिसॉर्टवर छाप्यात ८८ गॅस सिलिंडर जप्त

  • जीवनावश्यक वस्तू कायद्याखाली गुन्हा दाखल

  • पोलिसांकडून पुढील तपास सुरू

Uttar Pradesh SP Leader Sonu Kannaujia Gas Cylinder Black Marketing समाजवादी पक्षाचे नेते सोनू कन्नौजिया यांच्याविरुद्ध गॅसचा काळाबाजार केल्याच्या आरोपाखाली एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सोनू कन्नौजिया त्यांच्या रिसॉर्टमध्ये लपवलेले ८८ सिलिंडर विकण्याची तयारी करत होते. ही गॅस एजन्सी सोनू कन्नौजिया यांच्या पत्नीच्या नावावर आहे. लखनऊमधील काकोरी पोलिस ठाण्यात सपा नेत्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून जगात अमेरिका, इस्राईल,इराण यांच्यामध्ये युद्ध सुरु आहे. या युद्धात अनेक तेल साठे आणि खाणींवर हल्ले करून उध्वस्त करण्यात आले. तसेच तेलाची निर्यात थांबवली गेली असून आता याची झळ भारताला देखील बसली आहे. भारतात गॅस पुरवठ्यात तुटवडा जाणवू लागला आहे. त्यामुळे घाबरून नागरिकांनी सिलेंडरचा साठा करण्यास सुरुवात केली आहे. अशातच उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षाचे नेते सोनू कन्नौजिया यांच्या हॉटेलमध्ये ८८ गॅस सिलिंडर आढळून आले आहेत.

LPG Shortage : नेत्याच्या हॉटेलमध्ये आढळले तब्बल ८८ LPG सिलिंडर, पोलिसांनी ५ जणांविरोधात केली कारवाई
Pune : हुंड्यासाठी छळ! पुण्यात आणखी एका वैष्णवीचा बळी, लग्नानंतर अवघ्या ८ महिन्यातच मृत्युला कवटाळले

याप्रकरणी काळाबाजार करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली एका गॅस एजन्सीच्या मालक आणि व्यवस्थापकासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. जिल्हा पुरवठा विभागाने केलेल्या छाप्यानंतर, काकोरी पोलिस ठाण्यात जीवनावश्यक वस्तू कायदा, १९५५ च्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला.

LPG Shortage : नेत्याच्या हॉटेलमध्ये आढळले तब्बल ८८ LPG सिलिंडर, पोलिसांनी ५ जणांविरोधात केली कारवाई
Mumbai : 'बुलाती है मगर जाने का नहीं' पुरुषांना जाळ्यात ओढायच्या, कॅफेत नेऊन भलतंच करायच्या, मुंबईतील धक्कादायक प्रकार समोर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ मार्च रोजी, एका गुप्त माहितीच्या आधारे, जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील संयुक्त पथकाने काकोरी परिसरातील मोहन रोडजवळील अभिनंदन रिसॉर्ट कॉम्प्लेक्सवर छापा टाकला. छाप्यादरम्यान अधिकाऱ्यांना रिसॉर्ट परिसरात उभ्या असलेल्या एका ट्रकमध्ये भरलेले स्वयंपाकाचे गॅस सिलिंडर आढळले. अधिकाऱ्यांनी वाहनातून १४.२ किलो क्षमतेचे ६५ रिकामे घरगुती गॅस सिलिंडर, नऊ भरलेले सिलिंडर आणि सहा किलो क्षमतेचे १४ रिकामे सिलिंडर जप्त केले. हे सिलिंडर कोणत्याही परवानगीशिवाय आणि कोणत्याही वैध रिफिल व्हाउचर किंवा संबंधित कागदपत्रांशिवाय रिसॉर्ट परिसरात आणण्यात आले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com