Crime News: सुट्टी नाकारल्याने सुरक्षारक्षकाचं डोकं सटकलं; बँक मॅनेजरच्या छाती घातली गोळी

Bank Manager Shot Dead Inside Branch : गाजियाबादच्या लोणी बॉर्डर भागात एका सुरक्षा रक्षकाने पंजाब अँड सिंध बँकेच्या मॅनेजरची हत्या केली. रजा देत नसल्यानं सुरक्षारक्षकाने मॅनेजरची हत्या केली असल्याचं सांगितलं जात आहे.
Bank Manager Shot Dead Inside Branch :
GHAZIABAD BANK SHOOTING: SECURITY GUARD KILLS MANAGER AFTER LEAVE DISPUTEsaam tv
Published On
Summary
  • रजा नाकारल्यामुळे त्याने संतापाच्या भरात गोळीबार केला

  • आरोपी फरार असून पोलिसांकडून शोधमोहीम सुरू.

  • उपचारादरम्यान मॅनेजरचा मृत्यू

उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यातील लोनी बॉर्डर पोलीस ठाणे हद्दीत धक्कादायक घटना घडली. सुट्टी नाकारल्यानं एका सुरक्षारक्षकाने आपल्या मॅनेजरचा जीव घेतला आहे. येथील पंजाब अँड सिंध बँकेच्या शाखेत तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकाने बँक मॅनेजरवर गोळी झाडून त्यांची हत्या केली. गोळीबारानंतर आरोपी रक्षक घटनास्थळावरून फरार झाला आहे.

Bank Manager Shot Dead Inside Branch :
Pune Crime: वाघोलीनंतर आता सिंहगडमध्ये कोयता हल्ला; कोयत्यानं सपासप वार करत १९ वर्षीय तरुणाचा घेतला जीव

हाती आलेल्या माहितीनुसार सुरक्षारक्षक बहुतेकवेळा कोणालाही न कळवता रजा घेत असायचा. आज बँक मॅनेजरने त्याला रजा देण्यास नकार दिला होता, त्याचा राग आल्यानंतर सुरक्षारक्षकाने मँनेजरवर गोळी झाडली. बलराम नगर येथील पंजाब अँड सिंध बँकेच्या शाखेत घडली. रवींद्र हुड्डा, असं सुरक्षारक्षकाचे नाव आहे. तर अभिषेक शर्मा असं मॅनेजरचे नाव आहे. रवींद्र हुड्डा हा बँक मॅनेजरचा केबिनमध्ये गेला आणि आपल्या बंदुकीतून थेट मॅनेजरच्या छातीत गोळी घातली.

Bank Manager Shot Dead Inside Branch :
Nagpur Crime: पोलिसांचा अजब न्याय! तक्रार देणाऱ्याच्याच कानफटीत मारली; कानाचा पडदाच फाटला

गोळीबाराचा आवाज ऐकताच बँकेत काम करणारे इतर कर्मचारी घाबरून गेले. मात्र कोणाला काही कळण्याआधीच आरोपी रक्षक रवींद्र हुड्डा तेथून पळून गेला होता. गोळी लागल्याने गंभीर जखमी झालेल्या मॅनेजर अभिषेक शर्मा यांना इतर कर्मचाऱ्यांनी रुग्णालयात नेले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

लोणी बॉर्डर पोलीस स्टेशन परिसरातील बलराम नगर कॉलनीच्या मुख्य रस्त्यावर पंजाब अँड सिंध बँकेची शाखा आहे. मूळ बिहारमधील पाटणा येथील लखीपूर येथील ३५ वर्षीय अभिषेक कुमार दिल्ली ९९ सोसायटीमध्ये राहत होते. तो लोणीतील बलराम नगर कॉलनी येथील पंजाब अँड सिंध बँकेच्या शाखेचा मॅनेजर होता.

बागपत जिल्ह्यातील रहिवासी रवींद्र हुड्डा हा बँकेच्या शाखेत सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी करत होता. आरोपी सुरक्षा रक्षक रवींद्र हुड्डा हा बागपत जिल्ह्याचा रहिवासी आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याचे आणि बँक मॅनेजरसोबत रजेवरून वाद होत होते. सोमवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास सुरक्षा रक्षक बँकेत गेला, तेव्हा त्याच्याकडे परवानाधारक बंदूक होती. तो बंदूक घेऊनच मॅनेजरच्या केबिनमध्ये गेला होता. रजेवरून मॅनेजर आणि सुरक्षारक्षक यांच्या चर्चा सुरू होती, तेव्हा ब्रॅच मॅनेजरनं त्याला रजा देण्यास नकार दिला. तेव्हा संतापलेल्या गार्डने बँक व्यवस्थापकाच्या छातीत गोळी झाडली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com