

पुणे शहरात कोयता गँग आणि सराईत गुन्हेगारांनी धुमाकूळ घातलाय. वाघोलीनंतर पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरातील एका १९ वर्षीय तरुणावर कोयता हल्ला झाला असून त्यात त्याचा मृत्यू झालाय. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
सिंहगड रस्ता परिसरातील आनंद नगर चौक परिसरात 19 वर्षीय तरुणाची हत्या झाली आहे. पूर्व वैमानस्यातून ही हत्या झाली असून चार ते पाच जणांच्या टोळीने त्याच्यावर हल्ला केला. मृत तरुण धायरी भागातील रहिवासी असून करण काशीद नाव असल्याचे प्राथमिक माहितीत समोर आले आहे. पूर्वी तो माणिक बागेतील अमृता नगर परिसरात राहत होता गेल्या दोन-तीन महिन्यापासून धायरीत वास्तव्यास आहे. अधिक तपास सिंहगड पोलीस करत आहेत.
करण गिरीश काशीद असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. सोमवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास करण हा सिंहगड रस्त्यावरील आनंदनगर येथील संतोष हॉल परिसरात थांबला होता. यावेळी दोन ते तीन हल्लेखोर त्या ठिकाणी आले. काही समजण्याच्या आतच त्यांनी आपल्याजवळील लोखंडी हत्याराने करणवर हल्ला चढवला. हल्लेखोरांनी करणच्या शरीरावर वर्मी घाव घातल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.