Worst Drinks for Kidney: किडनीला आतून पोखरतात हे 5 ड्रिंक्स; चवीच्या नादात आरोग्याचं नुकसान करू नका

Drinks harmful for kidneys: किडनी शरीरातील घातक पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते. मात्र सॉफ्ट ड्रिंक्स, मद्यपान, एनर्जी ड्रिंक्स, पॅकबंद ज्यूस आणि चहा-कॉफीचे अतिसेवन किडनीच्या आरोग्यावर परिणाम करू शकते. किडनी निरोगी ठेवण्यासाठी कोणत्या पेयांचे सेवन मर्यादित ठेवावे, जाणून घ्या.
Worst Drinks for Kidney
Worst Drinks for Kidneysaam tv
Published On: 

आपल्या शरीरातील किडनी म्हणजे एक प्रकारची फिल्टर मशीनच आहे. शरीरात तयार होणारे घातक पदार्थ बाहेर टाकण्याचं काम किडनी करते. याशिवाय शरीरातील पाण्याचं प्रमाण योग्य ठेवणं आणि शरीराचं आरोग्य चांगलं राखण्यातही किडनी महत्त्वाची भूमिका बजावते. त्यामुळे किडनी निरोगी ठेवण्यासाठी आपल्या खाण्या-पिण्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे.

परंतु अनेकदा आपण नकळत अशा काही ड्रिंक्सचं सेवन करतो ज्याचा किडनीवर वाईट परिणाम होऊ शकतो. काही वेळा आवड म्हणून तर काही वेळा सवय म्हणून आपण ही पेयं पितो. पण किडनीचं आरोग्य जपायचं असेल तर कोणत्या ५ ड्रिंक्सचं सेवन टाळायला हवं, ते जाणून घेऊया.

सॉफ्ट ड्रिंक्स

कोल्ड्रिंक्स किंवा इतर सॉफ्ट ड्रिंक्स पिण्याची अनेकांना सवय असते. पण या पेयांमध्ये मोठ्या प्रमाणात साखर किंवा हाय फ्रुक्टोज कॉर्न सिरप असतं. यामुळे वजन वाढण्याची आणि मधुमेह होण्याची शक्यता वाढते. लठ्ठपणा आणि मधुमेह हे किडनीच्या आजारामागील महत्त्वाचे धोके आहेत. याशिवाय काही सॉफ्ट ड्रिंक्समध्ये फॉस्फोरिक अॅसिड असतं. याचा शरीरावर दीर्घकाळ परिणाम होऊ शकतो.

Worst Drinks for Kidney
Cholesterol Lowering Breakfast: कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर येऊ शकतो हार्ट अटॅक; फक्त या 4 पदार्थांचा नाश्त्यात करा समावेश, धोका लगेच टळेल

मद्यपान

अनेकांना मद्यपान करण्याची सवय असते. पण जास्त प्रमाणात दारू प्यायल्याने शरीरातील पाणी कमी होऊ शकतं. म्हणजेच शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते. अशा वेळी शरीरातील घातक पदार्थ बाहेर काढण्यासाठी किडनीला अधिक मेहनत घ्यावी लागते. याशिवाय जास्त मद्यपान केल्याने रक्तदाब वाढू शकतो आणि तुमच्या लिव्हरच्याही नुकसान होऊ शकतं.

एनर्जी ड्रिंक्स

थकवा दूर करण्यासाठी किंवा लगेच ऊर्जा मिळवण्यासाठी अनेकजण एनर्जी ड्रिंक्स पितात. परंतु या पेयांमध्ये कॅफिन, साखर आणि कृत्रिम पदार्थ मोठ्या प्रमाणात असू शकतात. त्यामुळे किडनीवर ताण येऊ शकतो. जास्त प्रमाणात कॅफिन शरीरात गेल्यास रक्तदाब वाढण्याची शक्यता असते. यामुळे किडनीवर अधिक ताण पडतो.

पॅकबंद फ्रुट ज्यूस

बाजारात मिळणारे पॅकबंद फळांचे ज्यूस आरोग्यासाठी चांगले असतात असा अनेकांचा समज असतो. पण अशा ज्यूसमध्ये अनेकदा अतिरिक्त साखर मिसळलेली असते. याशिवाय संपूर्ण फळांमध्ये असणारे फायबर या ज्यूसमध्ये पुरेशा प्रमाणात नसतं. त्यामुळे हे ज्यूस प्यायल्यावर रक्तातील साखरेचं प्रमाण झपाट्याने वाढू शकतं. रक्तातील साखर वाढल्याने मधुमेहाचा धोका वाढतो. मधुमेहाचा परिणाम पुढे किडनीच्या आरोग्यावरही होऊ शकतो.

Worst Drinks for Kidney
High Cholesterol: शरीरात कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढलंय? हे 5 पदार्थ खेचून बाहेर काढतील रक्तवाहिन्यांमध्ये साचलेली चरबी

चहा आणि कॉफी

अनेकांच्या दिवसाची सुरुवात चहा किंवा कॉफीशिवाय होत नाही. चहा आणि कॉफी या दोन्ही पेयांमध्ये कॅफिन असतं. मर्यादित प्रमाणात चहा किंवा कॉफी प्यायल्याने फारसा धोका नसतो. पण त्यामध्ये जास्त साखर घालून वारंवार सेवन करणं आरोग्यासाठी चांगलं नाही. कॅफिनमुळे रक्तदाब वाढू शकतो. तसंच जास्त साखरेचं सेवन केल्यानेही आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात.

Worst Drinks for Kidney
High cholesterol: ब्लड शुगर आणि कोलेस्ट्रॉल वाढलंय? दोन्ही समस्यांवर तूप ठरेल रामबाण उपाय, जाणून घ्या पद्धत

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.