High cholesterol: ब्लड शुगर आणि कोलेस्ट्रॉल वाढलंय? दोन्ही समस्यांवर तूप ठरेल रामबाण उपाय, जाणून घ्या पद्धत

Ghee-based Ayurvedic therapy: भोपाळमधील आयुर्वेदिक संस्थेच्या अभ्यासात तुपाच्या मदतीने विरेचन उपचार पद्धतीचे मधुमेह आणि कोलेस्ट्रॉल असलेल्या रुग्णांवर सकारात्मक परिणाम झाल्याचा दावा करण्यात आला आहे. या उपचार पद्धतीची प्रक्रिया, संभाव्य फायदे आणि आवश्यक वैद्यकीय काळजी जाणून घ्या.
High cholesterol
High cholesterolsaam tv
Published On: 

बदलती जीवनशैली, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि वाढता ताण यामुळे मधुमेहाच्या रुग्णांची संख्या वाढताना दिसतेयो. अशातच कोलेस्ट्रॉल वाढल्यास हार्ट अटॅक आणि ब्रेन स्ट्रोकचा धोका वाढू शकतो. अशा परिस्थितीत भोपाळमधील पंडित खुशीलाल शर्मा आयुर्वेदिक संस्थेने तुपाच्या मदतीने शरीरशुद्धी करण्याच्या पद्धतीचा अभ्यास केला. १ हजार २५ रुग्णांवर करण्यात आलेल्या या अभ्यासात या पद्धतीचे चांगले परिणाम दिसल्याचा दावा संस्थेतील तज्ज्ञांनी केलाय.

मध्य प्रदेशात रक्तातील साखर वाढलेल्या रुग्णांची संख्या अधिक

राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाच्या अहवालानुसार, मध्य प्रदेशात १५ वर्षे आणि त्यापुढील वयोगटातील १८.३ टक्के पुरुष आणि १४.५ टक्के महिलांच्या रक्तातील साखरेचं प्रमाण जास्त आहे. हे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी ते औषधांचा वापर करतायत.

भोपाळमध्ये रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी औषधं घेणाऱ्या रुग्णांचं प्रमाण २०१९-२१ मध्ये १२.९ टक्के होतं. आता ते वाढून २१.१ टक्के झालंय. इंदूरमध्ये हे प्रमाण १०.५ टक्क्यांवरून २३.५ टक्क्यांपर्यंत पोहोचलंय. जबलपूरमध्ये १९.१ टक्क्यांवरून २२.८ टक्के, ग्वाल्हेरमध्ये १३ टक्क्यांवरून १६.६ टक्के, तर उज्जैनमध्ये १०.८ टक्क्यांवरून १८.५ टक्के वाढ नोंदवण्यात आलीये. मोठ्या शहरांसोबतच लहान शहरांमध्येही अशा रुग्णांची संख्या वाढतेय.

High cholesterol
Kidney Cancer: किडनीत कॅन्सरची गाठ तयार होण्यापूर्वी शरीरात दिसतात ही 6 लक्षणं

शुगर आणि कोलेस्ट्रॉल एकत्र वाढल्यास धोका

तज्ज्ञांच्या मते, मधुमेहासोबत कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढलं असेल तर हार्ट अटॅक आणि ब्रेन स्ट्रोकचा धोका दोन ते चार पट किंवा त्याहून अधिक वाढू शकतो. त्यामुळे रक्तातील साखर आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवणं महत्त्वाचं आहे.

काय आहे तुपाद्वारे शरीरशुद्धीची पद्धत?

पंडित खुशीलाल शर्मा आयुर्वेदिक संस्थेच्या पंचकर्म विभागातील प्राध्यापक डॉ. कामिनी सोनी यांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारच्या सार्वजनिक आरोग्य उपक्रमांतर्गत हा अभ्यास गेल्या तीन वर्षांपासून सुरू होता. त्यात १ हजार २५ रुग्णांचे तीन गट करण्यात आले.

पहिल्या गटातील रुग्णांना तुपाच्या मदतीने शरीरशुद्धी करण्याची विरेचन पद्धत आणि औषधं देण्यात आली. दुसऱ्या गटाला फक्त आयुर्वेदिक औषधं देण्यात आली तर तिसऱ्या गटाला चांगला आहार, आठवड्यातून पाच दिवस चालणं आणि खाण्यापिण्याची काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला. पहिल्या गटात चांगले परिणाम दिसल्याचे डॉ. सोनी यांनी सांगितलं.

या पद्धतीत सुरुवातीला तीन दिवस आयुर्वेदिक औषधं दिली जातात. त्यानंतर रुग्णाच्या पचनशक्तीनुसार साधारण ३० मिलिलिटर तुपापासून सुरुवात केली जाते. मात्र याआधी रुग्णाच्या आरोग्याची तपासणी केली जाते. पोटावर शस्त्रक्रिया झाली आहे का, तसंच हृदय, किडनी किंवा रक्ताच्या कमतरतेशी संबंधित आजार आहेत का, हे तपासलं जातं.

त्यानंतर चार ते पाच दिवसांची प्रक्रिया केली जाते. पुढील तीन दिवस रुग्णाला मसाज आणि वाफ दिली जाते. वेगवेगळ्या औषधांचा काढा देऊन जुलाबाच्या माध्यमातून पोट साफ केले जाते. यानंतर रुग्णाला काही आयुर्वेदिक औषधे दिली जातात.

High cholesterol
Water for kidney health: किडनी खराब होऊ नये म्हणून दिवसातून किती पाणी प्यायलं पाहिजे?

वजन आणि फॅटी लिव्हरमध्येही सुधारणा झाल्याचा दावा

डॉ. सोनी यांच्या मते, या पद्धतीमुळे काही रुग्णांच्या रक्तातील साखर आणि कोलेस्ट्रॉलचं प्रमाण सामान्य झालंय. तसंच वजन आणि फॅटी लिव्हरमध्येही सुधारणा दिसली. वजन वाढणं, फॅटी लिव्हर आणि कोलेस्ट्रॉल या समस्या रक्तातील साखरेवर परिणाम करू शकतात.

चालणं आणि प्राणायाम महत्त्वाचं

तरुणांमध्येही मधुमेहाचं प्रमाण वाढत असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलंय. चुकीच्या आहारासोबतच ताणाचाही रक्तातील साखरेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे नियमित चालणं आणि प्राणायाम करण्याचा सल्ला दिला जातो.

डॉ. सोनी यांच्या मते, तुपाच्या सेवनामुळे कोलेस्ट्रॉल वाढतंच असं नाही. मात्र तेलकट पदार्थ जास्त खाल्ल्यास आरोग्याला नुकसान होऊ शकतं. त्यामुळे संतुलित आहार आणि नियमित व्यायाम महत्त्वाचा आहे.

High cholesterol
Kidney stones home remedy: रस्त्याच्या कडेला उगवणारं हे छोटं रोप करेल किडनी स्टोनचा खात्मा; 7 दिवसात मिळेल रिझल्ट

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com