Kidney stones home remedy: रस्त्याच्या कडेला उगवणारं हे छोटं रोप करेल किडनी स्टोनचा खात्मा; 7 दिवसात मिळेल रिझल्ट

Achadi plant benefits: आघाडीच्या मुळांपासून तयार केलेलं मिश्रण किडनी स्टोन दूर करू शकतं का? आयुर्वेदातील या वनस्पतीचा पारंपरिक वापर, घरगुती उपायाचा दावा आणि वैज्ञानिक पुराव्यांची स्थिती जाणून घ्या. स्टोन झाल्यास डॉक्टरांचा सल्लाही महत्त्वाचा आहे.
Kidney stones home remedy
Kidney stones home remedysaam tv
Published On: 

रस्त्याच्या कडेला, मोकळ्या जागेत किंवा झुडपांमध्ये अनेकदा एक रानटी रोप उगवलेलं दिसतं. या रोपाला लागलेली छोटी काटेरी फळं चालताना कपड्यांना चिकटतात. या रोपाला आघाडी, लटजीरा, चिरचिटा किंवा अपामार्ग अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं. आयुर्वेदात या वनस्पतीला महत्त्व असल्याचं सांगितलं जातं. पूर्वी घरातील ज्येष्ठ मंडळीही शरीराच्या वेगवेगळ्या तक्रारींसाठी या वनस्पतीचा वापर करत असत.

Sameer Singh Garden या यूट्यूब चॅनेलवर आघाडीच्या वनस्पतीचे काही खास गुण सांगण्यात आलेत. या व्हिडिओमध्ये आघाडी या वनस्पतींच्या मुळांपासून तयार केलेला घरगुती उपाय किडनी, लघवीच्या मार्गात आणि पित्ताशयात होणारे स्टोन दूर करण्यासाठी मदत करू शकतो, असा दावा करण्यात आलाय. मात्र, या दाव्यांना आधुनिक वैद्यकीय संशोधनाचा पुरेसा आधार उपलब्ध नाही. त्यामुळे हा उपाय करून पाहण्यापूर्वी त्याबाबतची योग्य माहिती जाणून घेणं महत्त्वाचं आहे.

आघाडीचं रोप कसं ओळखायचं?

आघाडी ही रानात सहज उगवणारी वनस्पती आहे. शेतात, रस्त्याच्या कडेला, मोकळ्या जागेत आणि झुडपांमध्ये हे रोप दिसून येतं. या रोपाला छोटी काटेरी फळं किंवा बिया लागतात. चालताना या बिया कपड्यांना चिकटतात. हे या वनस्पतीचं प्रमुख वैशिष्ट्य आहे.

Kidney stones home remedy
Gastric cancer symptoms: पोटाचा कॅन्सर झाल्यानंतर सर्वप्रथम कोणतं लक्षण दिसतं? 99% लोकं या 6 लक्षणांकडे करतात दुर्लक्ष

किडनी स्टोनसाठी ही वनस्पती कशी फायदेशीर?

Sameer Singh Garden या यूट्यूब चॅनेलवरील व्हिडिओमध्ये आघाडीच्या मुळांचा वापर करून स्टोनसाठी घरगुती उपाय करण्याची माहिती देण्यात आलीये. या दाव्यानुसार, आघाडीच्या मुळांचा अर्क आणि खडीसाखर एकत्र करून तयार केलेलं मिश्रण काही दिवस घेतल्यास स्टोनची समस्या दूर होऊ शकते.

आघाडीच्या मुळांपासून तयार केलेलं मिश्रण प्यायल्याने स्टोन विरघळते किंवा ती पूर्णपणे बरी होते, हे सिद्ध करणारे पुरेसे वैज्ञानिक पुरावे उपलब्ध नाहीत. त्यामुळे जर तुम्ही हा उपाय करणार असाल तर डॉक्टरांचा अवश्य सल्ला घ्यावा.

आघाडीच्या मुळांपासून मिश्रण कसं तयार करतात?

  • व्हिडिओमध्ये हा घरगुती उपाय तयार करण्यासाठी पुढील पद्धत सांगितली आहे.

  • सर्वप्रथम आघाडीची मुळं काढून ती स्वच्छ धुवून घ्यावीत

  • त्यानंतर मुळांचे छोटे-छोटे तुकडे करावेत

  • हे तुकडे कुटून अर्धा कप पाण्यात १५ ते ३० मिनिटं भिजत ठेवावेत

  • मुळांचा अर्क पाण्यात उतरल्यावर ते पाणी गाळून घ्यावं

  • गाळलेल्या पाण्यात थोडी खडीसाखर मिसळावी

  • हे मिश्रण सकाळी रिकाम्या पोटी आणि संध्याकाळी पिण्याचा सल्ला व्हिडिओमध्ये देण्यात आला आहे.

व्हिडिओमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, हा उपाय सलग सात दिवस केल्यास स्टोनची समस्या दूर होऊ शकते. त्याचप्रमाणे स्टोन लघवीवाटे शरीराबाहेर पडू शकतात, असंही सांगण्यात आलं आहे. मात्र या दाव्यांची खात्री झालेली नाही. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय हा उपाय करून वैद्यकीय उपचार टाळणं योग्य नाही.

Kidney stones home remedy
High cholesterol: औषधं न घेता कसं कमी कराल कोलेस्ट्रॉल? डॉक्टरांनी सांगितलं काय खावं आणि काय खावू नये!

आयुर्वेदात आघाडीला काय महत्त्व आहे?

आयुर्वेदातील काही पारंपरिक उपचारांमध्ये आघाडीचा वापर केला जातो. या वनस्पतीची मुळं, पानं आणि बिया यांचा वेगवेगळ्या कारणांसाठी उपयोग केला जात असल्याचं सांगितलं जातं. दरम्यान किडनी किंवा पित्ताशयातील स्टोन बरं करण्यासाठी आघाडी किती प्रभावी आहे, याबाबत आधुनिक वैद्यकीय विज्ञानाकडे पुरेसे ठोस पुरावे नाहीत.

स्टोन झाल्यास डॉक्टरांचा सल्ला का महत्त्वाचा?

किडनी किंवा पित्ताशयात स्टोन झाल्यास त्याचा आकार किती आहे, तो नेमका कुठे आहे आणि रुग्णाची प्रकृती कशी आहे, यावर उपचार ठरतात. काही लहान स्टोनसाठी डॉक्टरांच्या देखरेखीखाली औषधोपचार किंवा निरीक्षण पुरेसं ठरू शकतं. तर काही प्रकरणांमध्ये लेसर किंवा शस्त्रक्रियेची गरज भासू शकते.

Kidney stones home remedy
Blood sugar test: घरी ब्लड शुगर टेस्ट करताना सुई टोचल्यावर काय करावं? 'ही' 1 चूक करणं आजच थांबवा

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com