Gastric cancer symptoms: पोटाचा कॅन्सर झाल्यानंतर सर्वप्रथम कोणतं लक्षण दिसतं? 99% लोकं या 6 लक्षणांकडे करतात दुर्लक्ष

Stomach cancer symptoms: पोटाचा कॅन्सर सुरुवातीला सौम्य लक्षणांसह दिसू शकतो. वारंवार अपचन, विनाकारण वजन कमी होणं, पोटदुखी, गिळताना त्रास, उलटीत रक्त किंवा काळी शौच यांकडे दुर्लक्ष करू नका. लक्षणं कायम राहिल्यास किंवा वाढल्यास डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य तपासणी करा.
Gastric cancer symptoms
Gastric cancer symptomssaam tv
Published On: 

आजकाल चुकीच्या जीवनशैलीमुळे अनेक आजार आपल्या मागे लागले आहेत. त्यापैकी एक आजार म्हणजे कॅन्सर...पोटाच्या कॅन्सरचं प्रमाण सध्या अनेकांमध्ये दिसून येतं. पोटाचा कॅन्सर म्हणजे गॅस्ट्रिक कॅन्सर हा गंभीर कॅन्सरपैकी एक मानला जातो. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, या आजाराचं निदान सुरुवातीच्या काळात होणं काहीसं कठीण असतं.

एनडीव्हीच्या वेबसाईटला माहिती देताना दिल्लीतील हौज खासमधील H.O.P.E. ऑन्कोलॉजी विभागाचे मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. अमीश वोरा यांनी सांगितलं की, शरीरात होणारे काही बदल गांभीर्याने घेणं गरजेचं आहे. ही लक्षणं दिसली म्हणजे कॅन्सर झालाच आहे असं नाही. मात्र ही लक्षणं बराच काळ टिकून राहिली किंवा त्यांची तीव्रता वाढत गेली तर डॉक्टरांचा सल्ला घेऊन तपासणी करणं आवश्यक आहे.

Gastric cancer symptoms
Eye care tips: मोबाईल, लॅपटॉपच्या अतिवापरामुळे डोळ्यांवर होतोय परिणाम? दुर्लक्ष केल्यास दृष्टीला बसू शकतो मोठा फटका!

डॉ. वोरा यांनी पोटाच्या कॅन्सरची सुरुवातीला दिसून येणारी लक्षणं सांगितली आहेत. ही लक्षणं ओळखून उपचार करणं सोप जातं. ही लक्षणं कोणती आहेत ती जाणून घेऊया.

वारंवार अपचन

डॉ. अमीश वोरा सांगतात की, सतत अपचन होणं, पोट फुगणं, गॅस होणं किंवा छातीत जळजळ होणं अशा समस्या जाणवत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. अनेकदा पोटाच्या कॅन्सरच्या सुरुवातीला अशी सौम्य लक्षणं दिसू शकतात. औषधं घेतल्यानंतरही हा त्रास कमी होत नसेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.

कोणतंही कारण नसताना वजन कमी होणं

आहारात बदल न करता आणि कोणताही व्यायाम न करता जर तुमचं वजन कमी होत असेल तर ही बाब चिंतेची असू शकते. पोटाच्या कॅन्सरचा ट्यूमर शरीरात तयार होत असताना अनेक नैसर्गिक प्रक्रियांवर परिणाम होत असतो. अशावेळी तुमच्या शरीराला पुरेसे पोषक घटक मिळत नाही आणि तुमचं वजन कमी होऊ लागतं.

पोटाच्या वरच्या भागात वेदना

पोटाच्या वरच्या भागात वारंवार दुखणं, पोट भरल्यासारखं किंवा जड वाटणं आणि सतत अस्वस्थता जाणवणं हीदेखील पोटाच्या कॅन्सरची लक्षणं असू शकतात. हा त्रास कधी कमी, तर कधी जास्त जाणवू शकतो. अनेक जण याला गॅस किंवा अॅसिडिटी समजून दुर्लक्ष करतात. परंतु पोटाचा त्रास बराच काळ कायम राहत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करणं टाळावं.

Gastric cancer symptoms
Blood sugar control: डायबिटीजमध्ये 3 छोट्या चुका पडू शकतात महागात; ब्लड शुगर वाढू नये यासाठी 'या' गोष्टी लक्षात ठेवा

अन्न किंवा पाणी गिळताना त्रास होणं

अन्न खाताना किंवा पाणी पिताना ते गिळण्यास अडथळा येत असेल किंवा गिळताना दुखत असेल, तर हेही एक महत्त्वाचं लक्षण असू शकतं. सुरुवातीला कमी जाणवणारा हा त्रास हळूहळू वाढत असेल तर तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधावा.

उलटीत किंवा शौचात रक्त दिसणं

उलटी करताना रक्त येणं किंवा शौचाचा रंग काळा होणं ही लक्षणं दुर्लक्षित करू नयेत. शरीरात कुठेतरी रक्तस्राव होत असल्याचं हे लक्षण असू शकतं. अशी लक्षणं दिसल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

सतत थकवा जाणवणं

पुरेशी विश्रांती घेतल्यानंतरही सतत थकल्यासारखं वाटत असेल, शरीरात ऊर्जा नसल्यासारखं जाणवत असेल किंवा अशक्तपणा वाढत असेल तर त्यामागे रक्ताची कमतरता म्हणजेच अॅनिमिया हे कारण असू शकतं. त्यामुळे उशीर न करता डॉक्टरांची मदत घेतली पाहिजे.

Gastric cancer symptoms
Blood sugar test: घरी ब्लड शुगर टेस्ट करताना सुई टोचल्यावर काय करावं? 'ही' 1 चूक करणं आजच थांबवा

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com