High cholesterol: औषधं न घेता कसं कमी कराल कोलेस्ट्रॉल? डॉक्टरांनी सांगितलं काय खावं आणि काय खावू नये!

How to lower cholesterol naturally: वाढलेलं कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात कोणते पदार्थ खावेत आणि कोणते टाळावेत? ओट्स, डाळी, फळे, नियमित व्यायाम, वजन नियंत्रण आणि जीवनशैलीतील बदल हृदयाचं आरोग्य सुधारण्यास कशी मदत करतात.
How to lower cholesterol naturally
How to lower cholesterol naturallysaam tv
Published On: 

आजच्या व्यस्त जीवनशैलीमध्ये चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि व्यायामाचा अभाव यामुळे अनेकांना कोलेस्ट्रॉल वाढण्याची समस्या जाणवते. शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल वाढल्यास हृदयाच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. मात्र योग्य आहार आणि जीवनशैलीत बदल केल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकते.

अनेकांना सुरुवातीला थकवा जाणवणं, थोडे चालल्यानंतर किंवा हालचाल केल्यानंतर धाप लागणं अशी लक्षणं जाणवू शकतात. अशा वेळी डॉक्टरांच्या सल्ल्याने लिपिड प्रोफाइल ही रक्ताची तपासणी केली जाते. या तपासणीत एकूण कोलेस्ट्रॉल आणि एलडीएल म्हणजेच बॅड कोलेस्ट्रॉलची पातळी तपासली जाते.

How to lower cholesterol naturally
Diabetes drink: हे तीन घटक एकत्र उकळून प्या; डायबेटीस रूग्णांची वाढलेली साखर झटक्यात येईल कमी

कोलेस्ट्रॉलची पातळी वाढलेली आढळल्यास डॉक्टर जीवनशैलीत बदल करण्याचा, आहारावर नियंत्रण ठेवण्याचा आणि नियमित व्यायाम करण्याचा सल्ला देऊ शकतात. गरजेनुसार औषधोपचारही सुचवले जाऊ शकतात. जीवनशैलीत योग्य बदल केल्यानंतर आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, नियमित तपासणी केल्यास कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकते.

वाढलेलं कोलेस्ट्रॉल औषधांशिवाय नियंत्रणात आणण्यासाठी कोणत्या गोष्टी उपयोगी ठरू शकतात, याबाबत डॉ. राम मनोहर लोहिया रुग्णालयातील हृदयरोग विभागाचे माजी प्राध्यापक डॉ. तरुण कुमार यांनी आजतकशी बोलताना माहिती दिली.

कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात काय खावे?

डॉ. तरुण यांच्या मते, कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी रोजच्या आहारात विरघळणाऱ्या फायबरचा समावेश करणं महत्त्वाचं आहे. यासाठी ओट्स, जव, बीन्स, डाळी आणि छोले खाऊ शकता. फळांमध्ये सफरचंद, संत्री आणि नाशपती खाणे फायदेशीर ठरू शकते.

आहारात चांगल्या प्रकारच्या चरबीचाही समावेश करावा. यासाठी ऑलिव्ह ऑईल, मोहरीचे तेल किंवा शेंगदाणा तेल मर्यादित प्रमाणात वापरावं. तसंच बदाम आणि अक्रोड खाण्यास सुरुवात करावी. यामुळे हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवण्यास मदत होते. जे लोक मांसाहार करतात, ते आठवड्यातून दोन ते तीन वेळा सॅल्मन, सार्डिन आणि मॅकरेल यांसारखे मासे खाऊ शकतात. या माशांचा आहारात समावेश करणे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

How to lower cholesterol naturally
Blood Sugar Control: रक्तात वाढलेली साखर कमी करण्यासाठी दररोज किती मिनिटं चाललं पाहिजे?

सॅच्युरेटेड आणि ट्रान्स फॅट असलेले पदार्थ कमी खा

कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी खाण्यापिण्याच्या सवयींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. PubMed मध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार, तेल-बटर, तूप, क्रीम, प्रक्रिया केलेले मांस, बेकरी पदार्थ आणि तळलेलं फास्ट फूड यांचं सेवन कमी करा.

या पदार्थांमध्ये सॅच्युरेटेड फॅट किंवा ट्रान्स फॅटचं प्रमाण जास्त असू शकतं. त्यामुळे अशा पदार्थांच्या जागी आरोग्यासाठी चांगली असलेली अनसॅच्युरेटेड फॅट असलेले पदार्थ निवडावेत. अ‍ॅव्होकॅडो आणि ऑलिव्ह हे अशा प्रकारच्या चरबीचे चांगले स्रोत आहेत.

रोज व्यायाम करा आणि वजन नियंत्रणात ठेवा

कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी फक्त आहारात बदल करणं पुरेसं नाही. त्यासोबत रोज व्यायाम करणेही आवश्यक आहे. यासाठी नियमित चालणं किंवा पोहण्यासारखे व्यायाम करू शकता. शरीराचं वाढलेलं वजन कमी करण्याचाही प्रयत्न करावा. वजनात पाच ते दहा टक्के घट झाली तरी कोलेस्ट्रॉलच्या पातळीत चांगली सुधारणा होण्यास मदत होऊ शकते.

याशिवाय धूम्रपान करणं टाळावं आणि मद्यपानाचं प्रमाण कमी करावं. योग्य आहार, नियमित व्यायाम आणि वजनावर नियंत्रण ठेवल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकते.

How to lower cholesterol naturally
Blood sugar test: घरी ब्लड शुगर टेस्ट करताना सुई टोचल्यावर काय करावं? 'ही' 1 चूक करणं आजच थांबवा

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com