Blood Sugar Control: रक्तात वाढलेली साखर कमी करण्यासाठी दररोज किती मिनिटं चाललं पाहिजे?

Surabhi Jayashree Jagdish

ब्लड शुगर का वाढते?

ब्लड शुगर वाढण्याला हायपरग्लायसेमिया म्हणतात. स्वादुपिंडातून तयार होणारं इन्सुलिन अन्नातून मिळालेला ग्लुकोज शरीराच्या पेशींमध्ये पोहोचवण्याचं काम करतं. इन्सुलिन कमी तयार झालं किंवा शरीराच्या पेशींना इन्सुलिनचा योग्य वापर करता आला नाही, तर ग्लुकोज रक्तात जमा होऊन ब्लड शुगर वाढू शकतं.

High Blood Sugar | saam tv

चालण्यामुळे ब्लड शुगर नियंत्रणात कशी राहते?

नियमित शारीरिक हालचाल ब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी महत्त्वाची आहे. चालताना शरीराचे स्नायू ग्लुकोजचा वापर ऊर्जेसाठी करतात. त्यामुळे नियमित चालण्यामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत होऊ शकते.

Walking for Diabetes | saam tv

दिवसातून किती वेळ चालावे?

निरोगी प्रौढ व्यक्तीने आठवड्यात किमान १५० मिनिटे मध्यम तीव्रतेचा व्यायाम करण्याचं लक्ष्य ठेवावं. हे रोज साधारण ३० मिनिटे वेगाने चालून पूर्ण करता येतं. सलग ३० मिनिटं चालणं कठीण वाटत असेल, तर १०-१० मिनिटांचे छोटे वॉक सेशन करता येतात.

Walking for Blood Sugar | saam tv

जेवणानंतर किती मिनिटे चालावे?

डायबिटीज किंवा वाढलेली ब्लड शुगर असलेल्या व्यक्तींसाठी जेवणानंतर थोडं चालणं उपयोगी ठरू शकतं. जेवणानंतर १० ते १५ मिनिटं हलक्या ते मध्यम वेगाने चालल्याने शरीराला ग्लुकोज वापरण्यास मदत होते. त्यामुळे जेवणानंतरचा छोटा वॉक रोजच्या सवयीचा भाग करता येते.

Exercise for Diabetes | saam tv

चालण्याची वेळ

चालण्याचा कालावधी आणि वेग प्रत्येक व्यक्तीच्या वय, आरोग्य, वजन, फिटनेस आणि ब्लड शुगरच्या पातळीनुसार वेगळा असू शकतो. चालताना खूप थकवा, चक्कर, अशक्तपणा किंवा अस्वस्थ वाटल्यास लगेच चालणं थांबवावं. डायबिटीजची औषधं किंवा इन्सुलिन घेणाऱ्या व्यक्तींनी व्यायामामुळे ब्लड शुगर खूप कमी होण्याचा धोका लक्षात ठेवावा.

Diabetes and Exercise | saam tv

फक्त चालण्यावर अवलंबून राहू नका

फक्त चालणं हे उपचार नाहीत. संतुलित आहार, पुरेशी झोप, वजन नियंत्रण, डॉक्टरांनी सांगितलेली औषधं आणि नियमित ब्लड शुगर तपासणंही महत्त्वाचं आहे. या सर्व गोष्टी एकत्र पाळल्यास ब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी अधिक चांगली मदत मिळू शकते.

Blood Glucose Control | saam tv

व्यायाम

प्रत्येक व्यक्तीची आरोग्याची स्थिती वेगळी असल्यामुळे चालण्याची योग्य वेळ आणि वेगही वेगळा असू शकतो. डायबिटीज असलेल्या व्यक्तीने आपल्या औषधांनुसार आणि ब्लड शुगरच्या पातळीनुसार व्यायामाचं नियोजन करावं.

Blood Glucose Management | saam tv

टीप

ही माहिती विविध सार्वजनिक स्रोतांवर आधारित असून केवळ सामान्य माहितीसाठी देण्यात आली आहे. या माहितीची स्वतंत्र वैद्यकीय पडताळणी आम्ही केलेली नाही. कोणतीही लक्षणे आढळल्यास स्वतः निष्कर्ष काढण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Walking After Meals | saam tv

Heart attack symptoms: 1 महिना अगोदर ही 5 लक्षणं दिसली तर समजा हार्ट अटॅक येणारे!

cardiac warning signals | saam tv
येथे क्लिक करा