पुण्यात स्नूकरच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या
मित्रांनीच तरुणाची भररस्त्यात हत्या केली
धारदार शस्त्राने वार करत जागीच संपवलं
स्नूकर खेळण्याच्या वादातून घडली घटना
पुण्यामध्ये गुन्हेगारीच्या घटना वाढत चालल्या आहेत. वाघोलीमध्ये कॉलेजबाहेर तरुणावर कोयत्याने सपासप वार केल्याची घटना ताजी असताना पुणे शहरामध्ये तरुणांची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना घडली. भररस्त्यात धारदार शस्त्रांनी वार करत तरुणाला संपवण्यात आले. या हत्येमागचं कारण समोर आले आहे. स्नूकर खेळताना खुन्नस दिल्याच्या रागातून हे हत्याकांड घडलं. तरुणांनी आपल्या मित्रालाच जागीच संपवलं. या हत्याकांडाने पुणे हादरले.
पुण्यातील सिंहगड रोडवर सोमवारी संध्याकाळी ३ जणांनी धारदार शास्त्राने एका तरुणावर वार करत त्याची हत्या केली. भर चौकात संध्याकाळी घडलेल्या या घटनेमुळे सिंहगड रोड परिसरात एकच खळबळ उडाली होती. करण काशीद असे हत्या झालेल्या १९ वर्षीय तरुणाचे नाव होते. मित्राची हत्या करून आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला होता पण पोलिसांनी अवघ्या काही तासांत आरोपींच्या मुसक्या आवळल्या.
घटना घडल्यानंतर काही तासातच सिंहगड रोड पोलिसांनी या प्रकरणी ३ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं. करण आणि तिन्ही आरोपी एकमेकांना ओळखत असून मित्र होते. जानेवारी महिन्यात स्नूकर खेळत असताना करण काशीदने या तिघांकडे रागाने बघितलं होतं. या गोष्टीचा राग मनात ठेवत या तीन अल्पवयीन तरुणांनी करणचा काटा काढायचं ठरवलं. याच रागातून त्यांनी करणची हत्या केल्याची माहिती त्यांनी पोलिसांना चौकशीदरम्यान दिली. तिन्ही आरोपी अल्पवयीन आहेत. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.