Maharashtra News Live Update: वैजापूरच्या शिऊरमध्ये अब्दुल सत्तारांकडून प्रतापसिंह पाटलांचा सत्कार

Marathi Breaking Live Headlines Updates: शेतकरी मोर्चा, गोकुळ राजकारण, निवडणूक आयोग, ज्ञानेश कुमार, दिवाळीला सुरूवात, महाराष्ट्र दुष्काळ, चक्रीवादळाचे अपडेट, देश- विदेशातील महत्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...
Maharashtra News Live Update
Maharashtra News Live UpdateSaam Tv News
Published On: 

वैजापूरच्या शिऊरमध्ये अब्दुल सत्तारांकडून प्रतापसिंह पाटलांचा सत्कार

पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर पवारांच्या राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित आमदार प्रतापसिंह पाटील यांचा वैजापूर तालुक्यातील शिऊर येथे शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना प्रतापसिंह पाटील यांनी अब्दुल सत्तार यांचे भरभरून कौतुक केले. आम्हाला अब्दुल सत्तार यांच्यासारखा कॅप्टन आणि मार्गदर्शक मिळाला. पहिल्याच बॉलला सिक्स मारला आणि मॅच जिंकली, आता आयुष्यात मॅच खेळायचा नाद करणार नाही, असे ते म्हणाले. या निवडणुकीत आमची मॅच आयपीएलसारखी झाली. सगळ्याच देशांचे खेळाडू मैदानात होते, असे सांगत त्यांनी महायुतीतील नेत्यांनी केलेल्या मदतीचाही उल्लेख केला. यावेळी प्रतापसिंह पाटील यांनी सतीश चव्हाण यांच्यावरही टीका केली.

ऐन दुष्काळात उच्च व तंत्रशिक्षण विभागाची उधळपट्टी

मंत्रालयातील खिडक्यांना प्रत्येकी १० हजारांचा पडदा

उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या दालनातील खिडक्यांना पडदे बसवण्यासाठी निधी मंजूर

उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या दालनातील २५ खिडक्यांना लावण्यात येणार पॉलीईस्टर चे पडदे

राज्य सरकारने जारी केला शासनादेश

शरद पवार यांना भेटायला प्रफुल्ल पटेल ब्रिच कँडी रुग्णालयात दाखल

Nanded: उपचारासाठी ५ हजारांची मदत मिळावी; दाभड येथील तरुणाची बंद इमारतीवर चढून मागणी

नांदेड रेल्वे स्थानकासमोरील एका बंद इमारतीवर चढून दाभड येथील तरुणाने रुग्णालयातील उपचारांसाठी ५ हजार रुपयांची आर्थिक मदत मिळावी अशी मागणी केली. या घटनेमुळे परिसरात काही काळ नागरिकांचे लक्ष वेधले गेले. स्थानिक नागरिकांनी मध्यस्थी करत तरुणाला सुरक्षितपणे खाली आणले. संबंधित तरुण मनोरुग्ण असल्याचे सांगण्यात येत आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच काम बंद आंदोलन थांबविण्यात परिवहन विभागाला यश

दिवाळी बोनस व महागाई भत्त्यात वाढ मिळावी या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी ऐन दिवाळीत काम बंद आंदोलन करण्याचा दिला होता इशारा

या संदर्भात धुळ्यात कामगार संघटनेच्या वतीने घंटा नाद आंदोलन करून प्रशासनाला आंदोलनाचा इशारा देखील आला होता देण्यात

परंतु परिवहन मंत्र्यांनी तातडीची बैठक बोलावून एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत.

नाशिकमध्ये एफडीएची मोठी कारवाई, श्री बालाजी लाडू सेंटरवर अन्न व औषध प्रशासनाचा छापा

नाशिकमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई

वडनेर दुमाला येथील श्री बालाजी लाडू सेंटरवर अन्न व औषध प्रशासनाचा छापा

लाडूंच्या गुणवत्तेबाबत आणि अन्नरंगाच्या अतिवापराबाबत संशय

संशयित निकृष्ट दर्जाचे मोतीचूर लाडू आढळल्याने कारवाई

तब्बल २५८ किलो मोतीचूर लाडूंचा साठा जप्त.

राहुल गांधींकडून भारतीय संविधानाला डावलण्याचा प्रयत्न

लोकशाहीला ज्या पद्धतीने टार्गेट केलं जात आहे. भारतीय संविधानाला डावलण्याचा प्रयत्न राहुल गांधी आणि त्यांच्या साथीदाराविरुद्ध आपण एकत्र आलो

- राहुल गांधी तुम्ही सांगितलं आता लढाई संसदेत नाही रस्त्यावर होईल. मात्र बाबासाहेबांचा संविधान आहे. तो पर्यंत रस्त्यावर नाही तर संसदेत लढाई असेल.

राहुल गांधी तुम्ही सांगितलं आता लढाई संसदेत नाही रस्त्यावर होईल. मात्र बाबासाहेबांचा संविधान आहे. तो पर्यंत रस्त्यावर नाही तर संसदेत लढाई असेल.

बारामतीतील शासकीय रुग्णालयात रुग्णाची आत्महत्या

बारामतीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय रुग्णालयाच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून एकाने आत्महत्या केलीय. बारामती तालुका पोलीस घटनास्थळी दाखल झालेत.

छत्रपती संभाजीनगर शहरात मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ,२२ दिवसात तब्बल ५८५ जणांना कुत्र्यांनी घेतला चावा

छत्रपती संभाजीनगर शहरात मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ सुरूच असल्यानं नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. या महिन्यातील २२ दिवसात तब्बल ५८५ जणांना कुत्र्यांनी चावा घेतल्याने जखमींना घाटी हॉस्पिटलमध्ये उपचार घ्यावे लागले. यात ४४४ पुरुष आणि १४१ महिलांचा समावेश आहे. लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिकांवर कुत्र्यांनी हल्ला केल्याच्या घटना घडल्यात. गल्ली बोळ, रस्ते आणि वसाहतींमध्ये टोळक्याने फिरणाऱ्या कुत्र्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दररोज सरासरी २३ नागरिक कुत्र्यांच्या चाव्यामुळे उपचारासाठी घाटीत येत आहेत. त्यामुळे मोकाट कुत्र्यांचा प्रश्न केवळ रस्त्यांवरील त्रासापुरता मर्यादित राहिला नसून, तो नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर समस्या बनत आहे.

सचिन वाझेचा जामीन अर्ज फेटाळला

मुंबईच्या उच्च न्यायालयाने सचिन वाझेचा जामीन अर्ज फेटाळलाय.

कोल्हापुरात आंदोलनाच्या ५५ तासांनंतर जिल्हा प्रशासनाला जाग

कोल्हापुरात सुरू असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला तब्बल ५५ तास उलटल्यानंतर जिल्हा प्रशासनाला जाग आली आहे. प्रशासनाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलावले आहे. सध्या कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक सुरू असून, या बैठकीला साखर कारखानदारांचे प्रतिनिधीही उपस्थित आहेत. शेतकऱ्यांच्या मागण्यांवर या बैठकीत काय तोडगा निघतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मिठाई खवा आदींची डिलिव्हरी घेताना त्यावर दिलेली मुद्दत तपासून पाहावे - तुकाराम मुंढे

मिठाई खवा आदींची डिलिव्हरी घेताना त्यावर दिलेली मुद्दत तपासून पाहावे

मुद्दत संपलेली असेल किंवा संपायला आली असेल तर घेऊ नका

६ नोव्हेंबरपासून सिंधुदुर्ग ते नवी मुंबई विमानसेवा सुरू

६ नोव्हेंबरपासून सिंधुदुर्ग ते नवी मुंबई विमानसेवा सुरू

कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. सिंधुदुर्गमधील चिपी विमानतळावरून नवी मुंबईसाठी १६ नोव्हेंबरपासून Fly91 ची विमानसेवा सुरू होणार आहे. या विमानसेवेच्या तिकिटांचे बुकिंगही सुरू झाले आहे. विशेष म्हणजे, आठवड्यातील सातही दिवस ही विमानसेवा उपलब्ध असणार आहे. पालकमंत्री नितेश राणे यांनी 'X' वर पोस्ट करून याबाबत माहिती दिली. 'येवा, कोकण आपलोच आसा!' असे म्हणत त्यांनी पर्यटकांना या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. या विमानसेवेमुळे कोकणवासीयांचा प्रवास सोपा होणार असून सिंधुदुर्गच्या पर्यटनालाही मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

राष्ट्रवादीचे पेण विधान सभा मतदार संघाचे कार्याध्यक्ष प्रमोद म्हसकर यांचा राजीनामा

राष्ट्रवादीचे पेण विधान सभा मतदार संघाचे कार्याध्यक्ष प्रमोद म्हसकर यांचा राजिनामा

० प्रमोद म्हसकर यांनी आपल्या कार्याध्यक्ष पदाचा दिला राजिनामा

० राजिनामा देताना पत्रात म्हसकर यांनी कोणतच करण स्पष्ट केल नसल तरी पक्षांर्गत राजकारणामुळे राजिनामा दिल्याची राजकिय वर्तुळात चर्चा

० म्हसकर हे सुनिल तटकरे यांचे निकटवर्तीय म्हणून सर्वश्रृत असून ते प्रमोद म्हसकर प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेल्या अनेक महिन्यां पासून रायगडच्या सामाजिक क्षेत्रात कार्यरत होते

० प्रमोद म्हसकर यांच्या राजिनाम्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसण्याचे राजकिय संकेत

मुंबईत NSG आणि IAF कडून विविध ठिकाणी मॉक ड्रिल

मुंबईत NSG आणि IAF कडून विविध ठिकाणी मॉक ड्रिल

मुंबईतील विविध महत्त्वाच्या ठिकाणी आज NSG आणि भारतीय हवाई दलाकडून संयुक्त मॉक ड्रिल

ONGC इमारत, मंत्रालय, मुंबई विमानतळ, डायमंड बोर्ससह अनेक ठिकाणी होणार सराव

NSG, मुंबई पोलीस फोर्स वन आणि इतर सुरक्षा यंत्रणांचा मॉक ड्रिलमध्ये सहभाग

ONGC इमारतीजवळ मुंबई पोलीस कमांडो पथक ऑपरेशनसाठी सज्ज

डायमंड बोर्स परिसरातून NSG च्या हेलिकॉप्टरची एंट्री

दहशतवादी हल्ल्यासारख्या आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी सुरक्षा यंत्रणांकडून सराव

उद्धव ठाकरे यांनी सतेज पाटील यांना पाठिंबा दिला आहे

उद्धव ठाकरे यांनी सतेज पाटील यांना पाठिंबा दिला आहे

लोकशाही मार्गाने सतेज पाटील यांचं पॅनेल निवडून आलं आहे

पण हे लोक हुकूमशाही मार्गाने वाटचाल करत आहेत

अतिरिक्त चार जणांची नियुक्ती करून लोकशाहीची हत्या करत आहेत

देशाची वाटचाल ही लोकशाही मार्गाने व्हायला हवी म्हणून उद्धव ठाकरे यांनी सतेज पाटील यांना पाठिंबा दिला आहे

नागपूर पदयात्रेसाठी भंडाऱ्यातून निघालेत भाजप पदाधिकारी

भाजपच्या लोकतंत्र बचाव अराजकता हटाव पदयात्रेकरिता भंडारा येथून मोठ्या संख्येने भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते नागपूरला निघालेत. नागपूर इथ अराजकता हटाव, लोकतंत्र बचाव पदयात्रेचा समारोप होत आहे. भंडारा येथील दसरा मैदानावरून येथून निघालेला गाडींना माजी खासदार सुनील मेंढे, भाजप जिल्हाध्यक्ष आशू गोंडाने यांनी हिरवी झेंडी दाखविली. दरम्यान, भाजप पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस विरोधी नारेबाजी केली.

सातपुड्यातील सर्वोच्च शिखर असलेल्या अस्तंबा ऋषींच्या यात्रे उत्सवाला सुरुवात

सातपुड्यातील सर्वोच्च शिखर असलेल्या अस्तंबा ऋषींच्या यात्रे उत्सवाला सुरुवात......

महाभारतातील पात्र असलेल्या अश्वस्थामा यांनी केली होती शिखरावर तपस्या...

4 हजार फूट उंच डोंगरावर पायी चढत देवाला दिले जाते धान्याच्या नैवेद.....

अंधेरी स्थानकात तिकीट तपासनीसाला महिला प्रवाशाने चावा घेतला!

- अंधेरी स्थानकात तिकीट तपासनीसाला महिला प्रवाशाने चावा घेतला!

- विरारकडे जाणाऱ्या लोकलमध्ये तिकीट तपासणीदरम्यान घटना!

- ५१० रुपयांचा दंड आकारल्यानंतर वाद झाल्याचा आरोप.

- ४२ वर्षीय तिकीट तपासनीसाच्या हाताला चावा घेतला आणि ओरखडे काढले

वाशिमच्या पेनटाकळी धरणातून पैनगंगा नदीपात्रात पाणी सोडण्याची शेतकऱ्यांची मागणी

वाशिम जिल्ह्यात यंदा अत्यल्प पाऊस झाल्यानं पैनगंगा नदी कोरडी ठाक पडलीये,त्यामुळं या नदीवर असलेल्या पेनटाकळी धरणातून वाशिम जिल्ह्यासाठी पाणी सोडावं या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं.

गोकुळच्या राजकारणात माजी सरन्यायाधीशांच्याही मताचा उल्लेख

गोकुळच्या राजकारणात माजी सरन्यायाधीशांच्याही मताचा उल्लेख

कायदेशीर मत आणि सल्ला घेऊन राज्य सरकारला पत्र देण्यात आलं होतं सूत्रांची माहिती

गोकुळ बाबत केलेल्या नव्या कायद्याबाबत माजी सरन्यायाधीशांचं मत घेऊन त्याबाबतचे पत्र सरकारला देण्यात आलं होतं

नवा कायदा केल्यावर तो कशा पद्धतीने चुकीचा असेल याबाबत माजी सरन्यायाधीशांचं मत सरकारपर्यंत पोहोचवण्यात आलं होतं

सतेज पाटील यांना उद्धव ठाकरे यांचा फोन

सतेज पाटील यांना उद्धव ठाकरे यांचा फोन

पत्रकार परिषद झाल्यावर फोन

गोकुळ बाबत शिवसेना UBT पक्ष सोबत असल्याचं दिल आश्वासन

लढ्यात शिवसेना सतेज पाटील यांच्यासोबत असेल - ठाकरे

जळगावमध्ये 240 किलोंचा डुप्लिकेट खवा एफडीएने केला जप्त

जळगाव तब्बल 240 किलो म्हणजेच 65 हजाराचा डुप्लिकेट खवा एफडीएने जप्त केला

240 किलो डुप्लिकेट खवा हा आमदाबाद वरून आल्याची FDAची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

पंचनामा झाल्यानंतर दोशींवर करण्यात येणार कारवाई

केंद्रीय निवडणूक आयोगातील अंतर्गत वाद संपुष्टात? नव्या वर्क अलोकेशन ऑर्डरमुळे चर्चांना उधाण

केंद्रीय निवडणूक आयोगातील अंतर्गत वाद अखेर संपुष्टात आल्याचे संकेत मिळत आहेत. आयोगाने नवा वर्क अलोकेशन ऑर्डर जारी करत आयटी आणि जनतक्रार निवारण विभागाच्या जबाबदाऱ्यांचे नव्याने वाटप केले आहे. या नव्या आदेशानुसार, डीजी सीमा खन्ना आता वरिष्ठ उपनिवडणूक आयुक्त पवन कुमार शर्मा यांच्यामार्फत फाईल्स सादर करणार आहेत.

२८ जुलैच्या अंतरिम आदेशामुळे आयोगातील विविध विभागांच्या जबाबदाऱ्यांच्या वाटपावरून वाद निर्माण झाला होता. निवडणूक आयुक्त एस. एस. संधू आणि डॉ. विवेक जोशी यांनी या निर्णयाला विरोध करत कॅबिनेट सचिवांना पत्रही लिहिले होते. मात्र, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि दोन्ही निवडणूक आयुक्तांच्या सहमतीने नवा आदेश मंजूर करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आयोगातील अंतर्गत वाद संपुष्टात आल्याचा दावा केला जात आहे.

गोकुळ दूध संघातील हस्तक्षेपाविरोधात ९ तारखेला संघर्ष मोर्चा; सतेज पाटील यांची घोषणा

गोकुळ दूध संघात महायुती आणि राज्य सरकारने केलेल्या हस्तक्षेपाच्या निषेधार्थ येत्या ९ तारखेला संघर्ष मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. कोल्हापुरातील दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा हा मोर्चा काढण्यात येणार आहे. गोकुळ दूध संघातील राजकीय हस्तक्षेपाविरोधात हा मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी केली आहे.

अमेरिकेत ट्रम्प आणि जेडी व्हान्स यांच्यात धुसफूस; इराणविरोधातील युद्धावरून मतभेद

अमेरिकेतील मिडटर्म निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांच्यात मतभेद निर्माण झाल्याचे चित्र समोर येत आहे. अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांनी ट्रम्प यांच्या परराष्ट्र धोरणावर प्रश्न उपस्थित केले आहेत. लष्कराला युद्धात उतरवणे हा विश्वासघात असल्याचे वक्तव्य त्यांनी केले असून, इराणविरोधात युद्ध करण्याचा निर्णय चुकीचा असल्याचेही म्हटले आहे. दरम्यान, ट्रम्प यांनी मात्र युद्धाचा निर्णय योग्य असल्याचे समर्थन केले आहे. त्यामुळे या मुद्द्यावरून अमेरिकेच्या सत्ताधारी नेतृत्वातील मतभेद समोर येत आहेत.

सोने-चांदीच्या दरात मोठी वाढ; २४ तासांत सोनं ७ हजारांनी, तर चांदी १५ हजारांनी महागली

सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाल्याने सर्वसामान्य ग्राहकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. अमेरिकेतील निवडणुकीच्या निकालानंतर त्याचे थेट परिणाम सोने आणि चांदीच्या दरांवर झाल्याचे पाहायला मिळत आहे. अवघ्या २४ तासांत सोन्याच्या दरात तब्बल ७ हजार रुपयांची, तर चांदीच्या दरात १५ हजार रुपयांची वाढ झाली आहे.

आज सोन्याचा दर जीएसटीशिवाय प्रति १० ग्रॅम १ लाख ४५ हजार रुपये, तर चांदीचा दर जीएसटीशिवाय प्रति किलो १ लाख ९५ हजार रुपये इतका झाला आहे. आगामी काळातही सोने आणि चांदीच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने ग्राहकांच्या चिंतेत भर पडली आहे.

राजू शेट्टी यांची समजूत काढणार; हसन मुश्रीफ यांचे वक्तव्य

राजू शेट्टी यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. किमान दिवाळीच्या काळात तरी अशा पद्धतीने आंदोलन करू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे. या आंदोलनामुळे ट्रकचालकांचे मोठे हाल झाले आहेत. त्यामुळे राजू शेट्टी यांच्याशी चर्चा करून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करणार असल्याचे हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

गोकुळच्या वादावर हसन मुश्रीफांचं स्पष्टीकरण; म्हणाले, सरकारने डेडलॉक दूर करावा

गोकुळ दूध संघातील सत्तासंघर्षावरून सुरू असलेल्या वादावर मंत्री हसन मुश्रीफ यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. राहुल गांधी यांनी गोकुळ प्रकरणावर केलेल्या ट्विटवर प्रतिक्रिया देताना त्यांना या विषयाची पूर्ण माहिती नसल्याचे मुश्रीफ म्हणाले. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ प्रसिद्ध असून, निवडणुकीत महायुतीला १२ जागा मिळाल्या आहेत. कायदा अस्तित्वात असता तर बहुमताचा विचार झाला असता. मात्र, झालेल्या बैठकीत कोरम पूर्ण झाला नाही, त्यामुळे निवडणुकीचे नियम समजून घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रशासक कधी लागू होतो, याचाही विचार करायला हवा. गोकुळमधील डेडलॉक दूर करायचा असेल तर सरकार तो दूर करू शकते. आम्ही विरोधी पक्षात आहोत. बैठकीला जाऊन चेअरमन आमचाच करावा, अशी आमची भूमिका नाही. जनतेने आम्हाला विरोधी पक्षात बसवले आहे. सरकारने हा डेडलॉक दूर करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी भूमिका हसन मुश्रीफ यांनी मांडली.

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरण; तपास यंत्रणा बदलण्यासाठी मुलगा राम पूर्णेकरांची उच्च न्यायालयात धाव

प्रदीप पूर्णेकर यांचे चिरंजीव राम पूर्णेकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे. प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाचा तपास सध्या करत असलेली यंत्रणा बदलण्यात यावी, अशी मागणी त्यांनी या याचिकेद्वारे केली आहे. याप्रकरणी आज दुपारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार असून, या सुनावणीसाठी राम पूर्णेकर स्वतः न्यायालयात उपस्थित राहणार आहेत.

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरण; मुलगा राम पूर्णेकर यांची मुंबई उच्च न्यायालयात धाव

प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणात त्यांचे पुत्र राम पूर्णेकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, यासाठी तपास स्वतंत्र यंत्रणेकडे वर्ग करण्याची मागणी त्यांनी याचिकेद्वारे केली आहे. तसेच राजेंद्र शिंदे यांचा जबाबही न्यायालयाच्या रेकॉर्डवर घेण्याची मागणी करण्यात आली आहे.

आतापर्यंत झालेल्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, हल्ल्याच्या वेळी मारेकऱ्यांनी परिधान केलेले कपडे जप्त करण्यात एसआयटीला अपयश आल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. संशयितांना वाचवण्यासाठी आणि तपास कमकुवत करण्यासाठी हे सर्व सुरू असल्याचाही दावा करण्यात आला आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या खंडपीठासमोर ५ डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे. दरम्यान, २९ सप्टेंबर रोजी प्रदीप पूर्णेकर यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटीने आतापर्यंत पाच जणांना अटक केली आहे.

गोकुळ दूध संघाच्या वादात राहुल गांधींची उडी; भाजपवर मतांची चोरी केल्याचा आरोप

गोकुळ सहकारी दूध संघातील सत्तासंघर्षावरून आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही भाजपवर निशाणा साधला आहे. भाजपने गोकुळमधील दूध उत्पादकांचा कौल हिरावून घेतल्याचा आरोप त्यांनी केला आहे. निवडणुकीनंतर भाजपने नियमांमध्ये बदल करून चार संचालकांच्या नियुक्तीचा निर्णय घेतला. त्यामुळे १२ चा आकडा १६ करून बहुमताची चोरी करण्यात आल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.

दूध उत्पादकांच्या मतांची चोरी म्हणजेच जनादेशात भेसळ असल्याचे त्यांनी म्हटले आहे. भाजप इतका हताश झाला आहे की, प्रत्येक ठिकाणी सत्ता टिकवण्यासाठी कोणत्याही थराला जात आहे. मात्र, उत्पादकांची मते चोरणाऱ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी, शेतकरी कधीही विसरत नाहीत, असा इशाराही राहुल गांधी यांनी दिला आहे.

बहुमत डावलून पराभूत झालेल्यांच्या हातात गोकुळ देण्याचा प्रयत्न; संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल

सरकारला सत्तेची मस्ती आली आहे. बहुमत डावलून पराभूत झालेल्यांच्या हातात गोकुळची सत्ता देऊन ही संस्था गुजरात लॉबीला विकण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. सरकारला लोकशाहीची कोणतीही चाड राहिलेली नाही. लोकभावना दडपून स्वतःची सत्ता प्रस्थापित करण्यासाठी चार संचालकांची नियुक्ती करणे, यालाच सत्तेची मस्ती म्हणतात. यांची चरबी वाढली आहे, अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सरकारवर निशाणा साधला.

लोकशाही मार्गाने निवडून आलेले पॅनेल सरकारला चालत नाही का? बहुमताचा अनादर करून पराभूत झालेल्यांना सत्तेवर आणले जात आहे. याविरोधात लोक रस्त्यावर उतरतील. साडेपाच लाख शेतकऱ्यांचा कौल सरकारला मान्य नसेल, तर त्यांना पराभव स्वीकारावाच लागेल, असा इशाराही संजय राऊत यांनी दिला.

एसटी कर्मचाऱ्यांचा ऐन दिवाळीत आंदोलनाचा इशारा; परिवहन मंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक

एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस मिळावा, तसेच महागाई भत्त्यात वाढ करण्यात यावी, या मागण्यांसाठी एसटी कामगार संघटनेने ऐन दिवाळीत आंदोलनाचा इशारा दिला आहे. या आंदोलनाची दखल घेत परिवहन मंत्र्यांनी आज दुपारी दीड वाजता तातडीची बैठक बोलावली आहे.

या बैठकीत नेमका काय तोडगा निघतो, याकडे राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे. बैठकीत योग्य निर्णय न झाल्यास आंदोलनावर ठाम राहण्याची भूमिका एसटी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळे परिवहन मंत्री एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन रोखण्यात यशस्वी होणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

समृद्धी महामार्गावर डिझेल चोरट्यांचा धुमाकूळ; दोन ट्रकमधून ५०० लिटर डिझेल लंपास

समृद्धी महामार्गावर डिझेल चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र समोर येत आहे. मेहकर-डोणगाव दरम्यान रात्रीच्या सुमारास उभ्या असलेल्या दोन ट्रकमधून चोरट्यांनी तब्बल ५०० लिटर डिझेल लंपास केले. महामार्गावर वाहनांची वर्दळ असतानाही अशा प्रकारे डिझेल चोरीच्या घटना घडत असल्याने वाहनचालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिस आणि आरटीओच्या भरारी पथकांकडून नेमकी काय कारवाई केली जात आहे, असा सवाल उपस्थित होत आहे. समृद्धी महामार्गावरील वाढत्या डिझेल चोरीच्या घटनांमुळे पोलिस आणि आरटीओच्या गस्त व देखरेख यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनांचा तपास करून चोरट्यांचा बंदोबस्त करण्याचे आव्हान आता संबंधित यंत्रणांसमोर आहे.

Mumbai: भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी घेतली केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांची भेट

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी घेतली केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांची भेट

विधानपरिषद निवडणुकीतील कामाचा अहवाल केला सादर

महायुती अभेद्य ठेवण्याबाबत दोन्ही नेत्यांत चर्चा

अमित शाह यांच्या रविंद्र चव्हाण यांना सूचना

महा विकास आघाडीच्या नरेटीव्हला खोडून काढा

विरोधकांना जशास तसे उत्तर द्या

महायुती म्हणून विरोधकांना पूर्ण ताकदीने प्रत्युत्तर द्या

Kolhapur: ऊसदर आंदोलनाचा ट्रक चालकांना मोठा फटका, २० रुपयांची पाण्याची बाटली ५० रुपयांना

कोल्हापूर - ऊसदर आंदोलनाचा ट्रक चालकांना मोठा फटका

कोल्हापूर परिसरात शेकडो ट्रक, टँकर्स आणि ट्रेलर्स तीन दिवसांपासून अडकले!

ट्रक चालकांची उपासमार; खाण्यापिण्याच्या वस्तूंचे दर मात्र गगनाला!

२० रुपयांची पाण्याची बाटली ५० रुपयांना विक्री!

१० रुपयांचा चहा २५ रुपयांना, तर वडापाव ५० रुपयांना!

अडकलेल्या ट्रक चालकांच्या अगतिकतेचा व्यापाऱ्यांकडून गैरफायदा?

Nashik: येवल्यात दिवाळी आधीच राजकीय फटाके फुटण्यास सुरुवात

- येवल्यात दिवाळी आधीच राजकीय फटाके फुटण्यास सुरुवात

- आमदार सुहास कांदेंच्या शुभेच्छा फलकांनी येवल्यात राजकीय चर्चांना उधाण

- आ.सुहास कांदे यांची येवला मतदारसंघात राजकीय चाचपणी सुरू..?

- शिवसेना कार्यकर्त्यांसह नागरिकांना पाठवले दिवाळीचे गिफ्ट व शुभेच्छा पत्रे

- येवला हा मंत्री छगन भुजबळ यांचा बालेकिल्ला

Pune: दिवाळीच्या निमित्ताने गावाला जाण्यासाठी प्रवाशांची स्वारगेट बस स्थानकात गर्दी

दिवाळीच्या निमित्ताने गावाला जाण्यासाठी प्रवाशांची गर्दी

स्वारगेट बस स्थानकात प्रवाशांची गर्दी

पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावरून राज्याच्या विविध कानाकोपऱ्यात एसटी बस जात असतात

पुणे कोल्हापूर बस आंदोलनामुळे बंद असल्याने प्रवाशांचे हाल

गावाला जाण्यासाठी स्वारगेट बस स्थानकात प्रवाशांच्या रांगा

Yavatmal: काँग्रेसच्या नेत्यांनी एकत्र बसून विचारमंथन करायला हवे - माजी मंत्री वसंतराव पुरके

यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध होणे हीे मुळात आपल्याला पटलेली नाही,असे स्पष्ट मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री वसंतराव पुरके यांनी व्यक्त केले.

महाविकास आघाडी व काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी एकत्र बसून विचारमंथन करायला हवे होते. महाविकास आघाडीचा अध्यक्षपदाचा उमेदवार पराभूत झाला असता तरी चालले असते.

मात्र काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे नेते महायुतीसमोर शरणागती पत्करतातच कसे, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.

Shivsena: अंबरनाथमध्ये शिवसेनेतर्फे अवघ्या १० रुपयांत दिवाळी फराळ साहित्य वाटप 

अंबरनाथमध्ये गोरगरिबांची दिवाळी झाली 'गोड'

अंबरनाथमध्ये शिवसेनेतर्फे अवघ्या १० रुपयांत दिवाळी फराळ साहित्य वाटप

Pune: खडकवासला धरण साखळीतील पाणी साठ्यात वेगाने घट पाणीटंचाई तीव्र होण्याची शक्यता

पुणे -

खडकवासला धरण साखळीतील पाणी साठ्यात वेगाने घट पाणीटंचाई तीव्र होण्याची शक्यता

गेल्या वर्षीपेक्षा पाच टीएमसी कमी पाणीसाठा सध्या खडकवासला धरणात उपलब्ध असल्याची माहिती

पाणीटंचाईची गंभीर स्थिती निर्माण होणे अगदी पाणी राखीव ठेवण्याची नागरिकांची मागणी

Nagpur: मेयो रुग्णालयात निवासी डॉक्टराला मारहाण, तहसील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

नागपूर

- मेयो रुग्णालयात निवासी डॉक्टराला मारहाण झाल्याची पुन्हा एक घटना समोर आलीय. तहसील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल.

- गंभीर रुग्णावर आधी उपचार सुरू केल्याने दुसऱ्या रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉ. समीर चांदेकर यांची कॉलर पकडून खाटेवर ढकलले, ठोसेही मारल्याचा आरोप

- मेयो रुग्णालयात आधी तपासण्याच्या आग्रहावरून डॉक्टर आणि नातेवाईकांमध्ये वाद घातला.

- मेयोचे अधिष्ठाता डॉ. अविनाश गावंडे यांच्याकडून घटनेची गंभीर दखल घेत तहसील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलीय..

Yavatmal: यवतमाळ जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्तांना मिळणार नुकसान भरपाई

यवतमाळ जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्तांना मिळणार नुकसान भरपाई

यवतमाळ जिल्ह्यात या वर्षीच्या जून ते ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून 31 कोटी 58 लाख रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे.

यापैकी शेती पिकाच्या नुकसानीसाठी 30 कोटी दोन लाख रुपये तर शेतजमिनीच्या नुकसानीसाठी एक कोटी छप्पन लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय.

Akola: अकोल्यातील रेल्वे स्टेशन चौकात महापालिकेची पाईपलाईन फुटली, लाखो लिटर पाणी वाया

अकोल्यातील रेल्वे स्टेशन चौकात महापालिकेची पाईपलाईन फुटली, लाखो लिटर पाणी वाया

दुष्काळामुळे अकोला शहरात पाण्याचे मोठे दुर्भिक्ष असतानाही महापालिकेचा कारभार काही करता सुधरायचे नाव घेत नाहीय.

अनेक ठिकाणी खोदकामामुळे महापालिकेची पाणीपुरवठा पाईपलाईन फुटण्याच्या घटना दररोज घडत आहेत.

काल रात्रीही अकोला शहरातील रेल्वे स्टेशन चौकात महापालिकेची पाईपलाईन फुटली.

खोदकाम करताना ही पाईपलाइन फुटली त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेलं.

Dharashiv: धाराशिवच्या कुंथलगिरी पेढ्याची मागणी वाढली, ५ महिन्यात दरात १०० रुपयांची वाढ

धाराशिव -

धाराशिवच्या कुंथलगिरी पेढ्याची मागणी वाढली

पाच महिन्यात दरात १०० रुपयांची वाढ

एफडीएच्या धडक कारवायांमुळे अस्सल खवा पेढ्याला अच्छे दिन

दूध उत्पादकांना दिलासा

Pune: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आंदोलनविरोधी परिपत्रकावरून विद्यार्थी संघटना आक्रमक

पुणे -

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आंदोलनविरोधी परिपत्रकावरून विद्यार्थी संघटना आक्रमक

कुलगुरूंची गाडी अडवण्याचा विद्यार्थ्यांनी केला प्रयत्न

व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीनंतर कुलगुरूंची गाडी अडवण्याचा प्रयत्न, यावेळी विद्यार्थी आक्रमक

परिपत्रक रद्द करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थी संघटनांचे आंदोलन सुरू

व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत परिपत्रक रद्द न करण्याचा निर्णय घेतल्याचा संघटनांचा आरोप

विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत असल्याचा विद्यार्थी संघटनांचा दावा

Pune: पुण्यात आज शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पुण्यात शक्तीप्रदर्शन

पुणे- पुण्यात आज शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पुण्यात शक्तीप्रदर्शन

उच्च शिक्षण संचालनालयावर धडक मोर्चा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.