PWD Scam: कार्यकारी अभियंत्यासह ३ जणांना अटक, सार्वजनिक बांधकाम विभागात खळबळ

Palghar PWD Scam Update: सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये ७३ लाखांचा अपहार झाल्याचे प्रकरण उघड झाले. या प्रकरणी कार्यकारी अभियंत्यासह ३ जणांना अटक करण्यात आली.
PWD Scam: कार्यकारी अभियंत्यासह ३ जणांना अटक, सार्वजनिक बांधकाम विभागात खळबळ
Palghar PWD Scam Saam Tv
Published On: 
  • पालघर सार्वजनिक बांधकाम विभागातील ७३ लाखांचा कथित अपहार

  • कार्यकारी अभियंत्यासह तीन जणांना जव्हार पोलिसांकडून अटक

  • शासकीय निधी अपहार प्रकरणात बनावट कागदपत्रांचा वापर केल्याचा आरोप

फैय्याज शेख, शहापूर

सार्वजनिक बांधकाम विभागातून मोठी बातमी समोर आली आहे. कार्यकारी अभियंत्यासह ३ जणांना पोलिसांनी अटक केली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ७३ लाखांच्या अपहार प्रकरणी जव्हार पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली आहे. पोलिस सध्या या तिघांची देखील चौकशी करत आहेत. या कारवाईमुळे बांधकाम विभागात खळबळ उडाली आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागात सुशिक्षित बेरोजगार अभियंत्याच्या कामांच्या देयकांमध्ये फेरफार करून ७३ लाख १३ हजार ८८४ रुपयांच्या अपहार करण्यात आल्याचे प्रकरण उघड झाले. या प्रकरणात कार्यकारी अभियंत्यासह तिघांचा हात असल्याची माहिती समोर येताच त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. तत्कालीन कार्यकारी अभियंता राजेंद्र शाहिग्राम पवार यांच्यासह कर्मचारी अशोक माळगावी आणि एकनाथन वांगड या तिघांना जव्हार पोलिसांनी अटक केली. या तिघांनाही जव्हार न्यायाल्यात हजर केले असता न्यायाधीशांनी त्यांना २ दिवासांच्या पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे .

PWD Scam: कार्यकारी अभियंत्यासह ३ जणांना अटक, सार्वजनिक बांधकाम विभागात खळबळ
BJP Leader Arrested : महाराष्ट्र हादरला! भाजप शहराध्यक्षला अटक, राजकीय वर्तुळात खळबळ, नेमकं प्रकरण काय?

पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे सार्वजनिक बांधकामविभागात एकच खळबळ उडाली आहे. विक्रमगड येथील मे. जिजाऊ कन्ट्रक्शानच्या माध्यमातून शासकीयनिधीचा कथित अपहार झाल्या प्रकरणी जव्हार पोलिस ठाणयात गुन्हा दाखल करणयात आला होता. या प्रकरणातसंबंधित ठेकेदार त्याचे भागीदार तसेच सार्वजनिक बांधकाम विभागातील तत्कालीन कार्यकारी अभियंता आणि कर्मचारी यांनी संगनमत करून बनाबट कागदपत्रे तयार केली आणि शासकीय निधीचा अपहार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला होता.

PWD Scam: कार्यकारी अभियंत्यासह ३ जणांना अटक, सार्वजनिक बांधकाम विभागात खळबळ
Former Education Minister Arrested: १०० कोटींचा शालेय घोटाळा; माजी शिक्षणमंत्र्याला अटक, तमिळनाडूच्या राजकारणात खळबळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.