कोल्हापूरातील नांदणी येथून महादेवी हत्तीणीला वनतारा येथे नेण्यात आले
नांदणीच्या गावकऱ्यांनी जिओवर टाकला बहिष्कार
७ हजार गावकऱ्यांनी जिओचं सिम कार्ड केलं पोर्ट
कोल्हापूरतील नांदणी गावातील महादेवी उर्फ माधुरी हत्तीणीला वनतारा येथे नेण्यात आले आहे. यावरुन खूप वाद होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही हत्तीण नांदणी येथे होती. या हत्तीणीला नेल्यामुळे गावकऱ्यांच्या भावना दुखावल्या आहेत त्यांना अश्रू अनावर झाले होते. गावकऱ्यांनी हत्तीणीला परत आणण्याचा निश्चय केला आहे. हत्तीणीला वनतारामध्ये नेल्यानंतर आता गावकऱ्यांनी जिओवर बहिष्कार टाकला आहे.
नांदणीच्या गावकऱ्यांनी जिओवर का टाकला बहिष्कार? (Nandni People Stop Using Jio)
नांदणीच्या गावकऱ्यांची एक फोन क्लिप व्हायरल होत आहे. त्यामध्ये अंबानी कुटुंबाने नांदणीच्या गावकऱ्यांच्या भावना दुखावल्या आहेत, त्यामुळेच गावकऱ्यांनी हा जिओचे सिम कार्ड न वापरण्याचा निर्णय घेतला असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे. आमच्या घरातील व्यक्ती गेल्यासारखे आम्हाला वाटत आहे,अंबानी कुटुंब आमच्या भावानांशी खेळले आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
७ हजार गावकऱ्यांनी केले Jio चे सिम कार्ड पोर्ट (7000 Jio Users Port SIM Card)
अनेक गावकऱ्यांना जिओचे सिम कार्ड पोर्ट करण्यास सुरु केले आहे. महादेवी हत्तीणीला वनतारा केंद्रात नेण्याच्या निर्णयाविरोधात निषेध नोंदवला आहे. जवळपास ७००० गावकऱ्यांनी जिओ कंपनीचे सिम कार्ड पोर्ट केले आहे. हा केवळ व्यावसायिक निर्णय नव्हता. तर गावकऱ्यांचा भावनांचा उद्रेक आहे, अशा शब्दात गावकऱ्यांनी राग व्यक्त केला आहे.
महादेवी आता वनतारा येथे आहे, परंतु गावकऱ्यांचा लढा संपलेला नाही. या हत्तीणीला परत आणण्यासाठी कायदेशीर व सामाजिक मार्गाने लढा देण्याचा निर्धार केला आहे. गावकऱ्यांचा Jio वरचा बहिष्कार यातून त्यांचा संताप दिसून येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.