Jio-Airtel-Vi युझर्स ऐकलं का! रिचार्ज प्लॅन महागणार, टेलिकॉम कंपन्या ग्राहकांना देणार धक्का

Mobile Recharge Price Hike: यावर्षी मे महिन्यात सक्रिय मोबाईल युझर्सच्या संख्येत खूप चांगली वाढ झाली होत. यामुळे टेलिकॉम कंपन्या पुन्हा एकदा रिचार्ज प्लॅन महाग करण्याची तयारी करत आहेत.
Mobile Recharge Price Hike
Telecom companies plan to raise mobile recharge plans by 12%saam tv
Published On

गेल्या वर्षी टेलिकॉम कंपन्यांनी रिचार्ज प्लॅन महाग केले होते. आता पु्न्हा टेलिकॉम कंपन्या ग्राहकांना धक्का देण्याच्या तयारीत आहेत. मोबाईल रिचार्ज प्लॅन पुन्हा एकदा १२% महाग होऊ शकतात. यावर्षी मे महिन्यात सक्रिय मोबाइल युझर्सच्या संख्येत खूप चांगली वाढ झाली होती. त्यामुळे टेलिकॉम कंपन्या पुन्हा एकदा प्लॅन महाग करण्याच्या तयारी आहेत. पुन्हा एकदा त्याचा थेट परिणाम त्या ग्राहकांवर होईल जे संपूर्ण वर्षभर रिचार्ज करतात किंवा मोठा पॅक घेतात. जाणकारांच्या मते, किंमत वाढल्यानंतर ग्राहक पुन्हा त्यांचे नंबर पोर्ट करू शकतात. (Telecom Companies To Hike Mobile Recharge Plans By 12% Again)

यावर्षी मे महिन्यात ७४ लाख सक्रिय युझर्सची संख्या वाढली आहे, ही खूप चांगली वाढ आहे. आकडेवारीनुसार गेल्या २९ महिन्यांतील ही सर्वाधिक संख्या आहे. या सक्रिय वापरकर्त्यांची संख्या १०८ कोटींवर पोहोचलीय. अहवालानुसार गेल्या ५ महिन्यांत युझर्सची संख्या सतत वाढतेय.

Mobile Recharge Price Hike
Railway Tatkal Ticket Booking: तत्काळ तिकीट बुकिंगसाठी आधारचा OTP आवश्यक, जाणून नवीन तिकीट बुकिंगची प्रक्रिया

मीडिया रिपोर्ट्सनुसार, यावर्षी मे महिन्यात वाढलेले युझर्स हे महागडे रिचार्ज घेणारे नव्हते तर. ते काही महत्त्वाच्या कामासाठी सिम वापरणारी आहेत. युझर्सकडे अनेक सिम कार्ड असतात. ब्रोकरेज कंपनी जेफरीजच्या मते, युझर्समध्ये वाढ झाल्यामुळे एअरटेल आणि जिओसारख्या कंपन्यांना मोबाइल रिचार्ज प्लॅनच्या किमती वाढवण्याची संधी मिळालीय

Mobile Recharge Price Hike
Electricity Rates: सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी; कमी होणार वीज दर, सरकारचा मोठा निर्णय

. परंतु Vi चे युझर्स सतत कमी होत आहेत, या परिस्थितीमुळे एअरटेल आणि जिओला अधिक फायदा होईल. दरम्यान सुरुवातीला युझर्सला जिओकडून खूप चांगले नेटवर्क मिळत होते. परंतु गेल्या काही दिवसांपासून नेटवर्कमध्ये खूप खराबी आलीय. ज्यामुळे युझर्सला डेटा वापरण्यात अडचणी येत आहेत. दुसरीकडे एअरटेलची सेवा आता पूर्वीपेक्षा खूपच चांगली झालीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com