
देशात दररोज कोट्यवधी प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. या प्रवाशांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. रेल्वेने प्रवास करणारे बहुतेक प्रवासी आरक्षण मिळवून प्रवास करणे पसंत करतात. आरक्षण कोचमध्ये प्रवास करणे खूप आरामदायी आणि सोयीस्कर आहे. परंतु बऱ्याचदा लोक अचानक कुठेतरी जाण्याचा प्लॅन करतात.
ज्यामुळे त्यांना तत्काळ तिकिटे बुक करावी लागतात. पण तुम्हाला माहितीये का? भारतीय रेल्वे विभागाने तत्काळ तिकीट बूक करण्याच्या नियमात बदल केलाय. आता तत्काळ बुकिंगसाठी आधार व्हेरिफिकेशन अनिवार्य झालंय. आता तत्काळ तिकिटे कशी बुक केली जातील?
भारतीय रेल्वेने आता तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले आहेत. आता तुम्ही आयआरसीटीसी वेबसाइट किंवा मोबाईल अॅपवरून तात्काळ तिकिटे बुक करू शकाल. तिकीट बुक करण्यासाठी तुमचे आधार कार्ड तुमच्या आयआरसीटीसी खात्याशी लिंक असणं आवश्यक आहे. हा नवीन नियम आजपासून म्हणजेच १५ जुलैपासून लागू झालाय.
आता जेव्हा तुम्ही तत्काळ तिकीट बुक कराल तेव्हा त्याआधी तुमच्या आधारशी लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर तुम्हाला एक ओटीपी येईल. तो एंटर केल्यानंतरच तुम्ही बुकिंग करू शकाल. त्या ओटीपीशिवाय तत्काळ बुकिंग होणार नाही.
जर तुम्ही तुमचा आधार तुमच्या आयआरसीटीसी खात्याशी लिंक केला नसेल, तर ते त्वरित करा, त्याची प्रक्रिया खूप सोपी आहे. सर्वप्रथम तुम्हाला www.irctc.co.in या वेबसाइटवर लॉग इन करावे लागेल. तुम्ही अॅपवर देखील लॉग इन करू शकता. यानंतर तुम्हाला My Account सेक्शनमध्ये जावे लागेल. त्यानंतर तुम्हाला लिंक युअर आधार (Link Your Aadhaar) हा पर्याय निवडावा लागेल.
येथे तुम्हाला तुमचा १२ अंकी आधार क्रमांक टाकावा लागेल. त्यानंतर तुम्हाला जनरेट ओटीपीवर क्लिक करावे लागेल. यानंतर, तुमच्या आधारशी लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर ओटीपी येईल. तो ओटीपी एंटर केल्यानंतर पडताळणी प्रक्रिया पूर्ण होईल. तुमचे आयआरसीटीसी खाते आधारशी लिंक केले जाईल. जर तुम्ही रेल्वे काउंटरवरून तिकीट बुक केले तर तुम्हाला तुमचा आधार क्रमांक द्यावा लागेल आणि ओटीपी पडताळणी पूर्ण करावी लागेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.