Railway Exam Rules: रेल्वे परीक्षेच्या नियमात मोठा बदल; पेपरवेळी परीक्षार्थींना 'या' गोष्टीची असणार मुभा

Railway Exam: रेल्वेकडून परीक्षेच्या काही नियमांमध्ये आता बदल करण्यात आले आहेत. या संदर्भात नोटिफिकेशन देखील जारी करण्यात आलं आहे.
Railway Exam Rules
Railway ExamSaam Tv
Published On

तुम्ही रेल्वेमधील नोकरीसाठी तयारी करत आहात? तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. रेल्वेकडून परीक्षेच्या काही नियमांमध्ये आता बदल करण्यात आलेत. रेल्वेच्या नव्या नियमानुसार आता उमेदवारांना आपल्या धार्मिक प्रतिकांसह परीक्षा देता येईल. याबाबत रेल्वेकडून नोटिफिकेशन जारी करण्यात आलंय.

रेल्वेच्या नव्या नोटिफिकेशननुसार हातात कडं, धागा, डोक्याला पगडी, यासारख्या विविध धार्मिक प्रतिकांसह परीक्षार्थ्यांना रेल्वे भरतीची परीक्षा देता येईल. मात्र हा नियम फक्त रेल्वेशी संबंधित परीक्षेसाठीच लागू असेल, ही बाब लक्षात ठेवा.

आधी सुरुवातीला रेल्वेकडून कोणतंही धार्मिक प्रतिक परीक्षा केंद्रात घेऊन जाण्यास मनाई करण्यात येत होती. मात्र आता यात बदल करण्यात आलाय. रेल्वेच्या परीक्षेत पारदर्शकता असावी. कोणताच प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी या धार्मिक प्रतिकात्मक गोष्टींवर बंदी घालण्यात आली होती. एखादा उमेदवार परीक्षा केंद्रात एखादे इलेक्ट्रॉनिक गॅझेट लपवून आणून शकतो, त्यामुळे परीक्षेत गैरप्रकार होण्याची शक्यता असते.

Railway Exam Rules
Reservation Chart : ट्रेन सुटण्याच्या ८ तास आधी येणार आरक्षण चार्ट, 'या' दिवसापासून सेवा सुरूवात

परीक्षा पूर्णपणे पारदर्शी पद्धतीनं व्हावी, यासाठी हा नियम घालण्यात आला होता. मात्र त्यानंतर आता उमेदवारांची धार्मिक श्रद्धा लक्षात घेऊन रेल्वेकडून या नियमामध्ये बदल करण्यात आलाय. परीक्षेच्या नियमात बदल करण्यात आल्याची नोटीस जाहीर करण्यात आलीय. कोणत्याही उमेदवारांना आपल्या धार्मिक प्रतिकांसोबत परीक्षा केंद्रात प्रवेश मिळेल.

Railway Exam Rules
IRCTC Monsoon Travel: १७ दिवस रेल्वेप्रवास, ३० पेक्षा जास्त पर्यटनस्थळ; कमाल आहे 'रामायण यात्रा', काय-काय मिळतील सुविधा,जाणून घ्या

मात्र संबंधित उमेदवार हा तेथील तपास यंत्रणेला संपूर्णपणे सहकार्य करेल तेव्हाच त्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार आहे. परीक्षेसाठी परीक्षा केंद्रांवर आलेल्या उमेदवारांचं व्हेरिफिकेशन पूर्वी प्रमाणेच होणार आहे.

यामुळे बदलण्यात आला नियम

काही दिवसापूर्वी कर्नाटक राज्यात रेल्वे भरतीची परीक्षा पार पडली. ही परीक्षा देण्यासाठी आलेल्या काही उमेदवारांच्या हातातील धार्मिक प्रतिक असलेला धागा काढून टाकण्यात आला होता. पंजबामध्ये देखील असाच प्रकार घडला होता. मात्र यावरून विद्यार्थी चांगलेच आक्रमक झाले, विद्यार्थ्यांचा वाढत असलेला विरोध पाहून रेल्वेनं आपल्या परीक्षेच्या नियमात बदल केलाय. रेल्वेच्या या नव्या नियमानुसार विद्यार्थ्यांना आपल्या धार्मिक प्रतिकांसह रेल्वेची परीक्षा देता येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com