IRCTC Monsoon Travel: १७ दिवस रेल्वेप्रवास, ३० पेक्षा जास्त पर्यटनस्थळ; कमाल आहे 'रामायण यात्रा', काय-काय मिळतील सुविधा,जाणून घ्या

IRCTC Ramayana Yatra Package: भारतीय रेल्वेची 'श्री रामायण यात्रा' २५ जुलै २०२५ पासून सुरू होत आहे. यामध्ये तुम्हाला भगवान रामाशी संबंधित ३० हून अधिक पर्यटन स्थळांना भेट देण्याची संधी मिळेल. ही यात्रा अयोध्येपासून सुरू होईल आणि रामेश्वरममध्ये संपणार आहे.
IRCTC Monsoon Travel Package
IRCTC Ramayana Yatra PackageSaam Tv
Published On

जर तुम्ही पावसात कुठेतरी प्रवास करण्याचा विचार करत असाल तर आयआरसीटीसी तुम्हाला एक उत्तम ऑफर देत आहे. इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनकडून 'श्री रामायण यात्रा' सुरू होणार आहे. ही ट्रेन टूर १७ दिवसांचा असेल ज्यामध्ये तुम्हाला ३० पर्यटन स्थळांना भेट दिली जाईल. दरम्यान आयआरसीटीसी पाचव्यांदा राम भक्तांसाठी ट्रर काढत आहे. श्री रामायण यात्रा २५ जुलै २०२५ पासून सुरू होणार आहे.

ही यात्रा अयोध्येपासून सुरू होईल आणि नंदीग्राम, सीतामढी, जनकपूर, बक्सर, वाराणसी, प्रयागराज, चित्रकूट, नाशिक, हम्पी आणि शेवटी दक्षिण भारतातील रामेश्वरम बेट मार्गे भक्तांना दिल्लीला परत आणेल. आयआरसीटीसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, अयोध्येतील रामजन्मभूमी मंदिराच्या उद्घाटनानंतर धार्मिक आणि सांस्कृतिक पर्यटनाला मोठी चालना मिळाली आहे. लोक मोठ्या संख्येने रामाशी संबंधित या ठिकाणांना भेट देऊ इच्छितात. हा ५ वा रामायण दौरा आहे.

रामायण टूरचे भाडे

या टूरचं पॅकेज साधरण ३ एसीसाठी प्रति व्यक्ती १,१७,९७५ रुपये, २ एसीसाठी प्रति व्यक्ती १,४०,१२० रुपये, १ एसी क्लास केबिनसाठी १,६६,३८० रुपये आणि १ एसी कूपसाठी १,७९,५१५ रुपये ठेवण्यात आले आहे. प्रवाशांसाठी, ३ स्टार हॉटेल्समध्ये राहण्याची सोय, सर्व प्रकारचे शाकाहारी जेवण, प्रेक्षणीय स्थळांसाठी वाहतूक आणि प्रवास विमा यासारख्या सुविधा असतील

प्रवासात या मिळतील सुविधा

२५ जुलै रोजी दिल्ली सफदरजंग रेल्वे स्टेशनवरून प्रवास सुरू होईल. आधुनिक सुविधांनी सुसज्ज भारत गौरव डिलक्स एसी टूरिस्ट ट्रेन चालवली जाईल. ट्रेनमध्ये २ रेस्टॉरंट्स, १ आधुनिक स्वयंपाकघर, कोचमध्ये शॉवर क्यूबिकल, सेन्सर आधारित वॉशरूम फंक्शन, फूट मसाज यासारख्या अनेक सुविधा पुरवल्या जातील. प्रत्येक कोचमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा आणि गार्डची सुविधा देण्यात आलीय.

IRCTC Monsoon Travel Package
Pune Station Rename: पुणे स्टेशनला जिजाऊंचे नाव द्या; इतिहास अभ्यासकाची मागणी

या तीर्थस्थळांवर ट्रेन जाणार

यात्रेचा पहिला स्टॉप अयोध्या राम मंदिर असेल, तेथे पर्यटक श्री राम जन्मभूमी मंदिर, हनुमान गढी आणि राम की पैडीला भेट देतील. त्यानंतर नंदीग्राममधील भारत मंदिराकडे सहल पोहोचेल. त्यानंतर यात्रेचं पुढील ठिकाण बिहारमधील सीतामढी आहे. येथे पर्यटक सीताजींचे जन्मस्थान आणि जनकपूरमधील राम जानकी मंदिराला भेट देतील.

येथे रस्त्याने प्रवास केला जाईल. सीतामढीनंतर, ट्रेन बक्सरला जाते जिथे ती रामरेखा घाट आणि रामेश्वरनाथ मंदिरात पोहोचते. पुढील स्टॉप वाराणसी आहे तिथे काशी विश्वनाथ मंदिर आणि कॉरिडॉर, तुळशी मंदिर, संकटमोचन हनुमान मंदिराला भेट दिली जाईल त्यानंतर गंगा आरतीचं दर्शन घेतलं जाईल.

IRCTC Monsoon Travel Package
Solar Agri Pump: सौर कृषी पंपची चोरी झालीय? कुठे कराल तक्रार? जाणून घ्या हेल्पलाईन नंबर

यानंतर, ट्रेन रस्त्याने प्रयाग, शृंगवेरपूर आणि चित्रकूट येथे जाईल, जिथे रात्रीच्या मुक्कामाची व्यवस्था केली जाईल. चित्रकूटहून, ट्रेन महाराष्ट्रातील नाशिकला पोहोचेल येथील त्र्यंबकेश्वर मंदिर आणि पंचवटीला भेट दिली जाईल. तर कृष्णकिंधा हे प्राचीन शहर मानले जाणारे हंपी हा सहलीचा पुढील स्टॉप असेल. येथे भगवान हनुमानाचे जन्मस्थान मानले जाणारे अंजनेय टेकडी, विठ्ठल आणि विरुपाक्ष मंदिरासारख्या इतर वारसा स्थळांसह पाहिली जातील.

या रेल्वे प्रवासातील पुढचा स्टॉप रामेश्वरम असेल. रामानाथस्वामी मंदिर आणि धनुषकोडी येथी सहल नेली जाणार आहे. प्रवासाच्या १७ व्या दिवशी ही ट्रेन दिल्लीला परत येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com