Pune Station Rename: पुणे स्टेशनला जिजाऊंचे नाव द्या; इतिहास अभ्यासकाची मागणी

Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकाला राजमाता जिजाऊ यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी केलीय. तर संभाजी ब्रिगेडने महात्मा ज्योतिराव फुले यांचे नाव देण्याची मागणी केलीय.
Pune Station Rename
Pune Railway Stationsaamtv
Published On

पुणे शहरातील पुणे स्टेशनच्या नावावरून वाद होण्याची शक्यता आहे. भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी बाजीराव पेशवे यांचे नाव स्टेशनला द्यावी,अशी मागणी केली होती. त्यांच्या मागणीला संभाजी ब्रिगेडनं विरोध केला. आता या नावाच्या वादात इतरांनीही उडी घेतलीय.आता इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनीही खासदार कुलकर्णी यांच्या मागणीला विरोध करत नव्या नावाची मागणी केलीय. इतिहास अभ्यासक कोकाटे यांनी राजमाता जिजाऊ यांचे नाव पुणए स्टेशनला द्यावं, अशी मागणी केलीय.

पुणे रेल्वे स्टेशनचे नामकरण करून थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव स्टेशनला दिले पाहिजे, अशी मागणी भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी केली. मात्र पुणे रेल्वे स्थानकाला राजमाता जिजाऊ यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी केलीय. तर संभाजी बिग्रेड यांनी पुणे स्टेशनला क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचे नाव द्यावे अशी मागणी केलीय.

Pune Station Rename
Pune Station: पुणे स्टेशनचं नाव बदलणार? 'ही' दोन नाव चर्चेत, नव्या नावावरून वाद होण्याची शक्यता

पुणे शहराची स्थापना राजमाता जिजाऊ यांनी केली आहे. आदिलशहाने पुणे शहर बेचिराख केले होतं. या ठिकाणी गाढवाचा नांगर फिरवला आणि पुन्हा येथे मानवी वस्ती होणार नाही, अशी घोषणा त्याने केली होती मात्र राजमाता जिजाऊ शिवरायांना घेऊन या ठिकाणी आल्या आणि त्यांनी हे शहर पुन्हा वसवण्याचे काम केले.

या ठिकाणी त्यांनी सोन्याचा नांगर फिरवला. परागंदा झालेल्या लोकांमध्ये त्यांनी आत्मविश्वास निर्माण केला. बेचिराक झालेले पुणे नव्याने वसवण्याची काम राजमाता जिजाऊ यांनी केले. यासाठी राजमाता जिजाऊ यांच्या नावाने पुणे रेल्वे स्टेशन ओळखले गेले पाहिजे, असं इतिहास अभ्यासक कोकाटे म्हणालेत. छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ राहिल्या नसत्या तर सरदार, पेशवे आले असते का?

आपण लढू शकतो, उत्तम प्रकारे शासन करून शकतो अशी प्रेरणा राजमाता जिजाऊ यांनी दिली होती. त्यांनी पुणे शहर वसवलंय, त्यामुळे त्यांचेच नाव द्यावे अशी मागणी श्रीमंत कोकाटे यांनी केली.

खासदार कुलकर्णी यांच्या मागणीला संभाजी ब्रिगेडनं याला विरोध केला आहे. बाजीराव पेशवे यांच्या नावावऐवजी संभाजी ब्रिगेडनं दुसरं नाव सुचवलंय. खासदार मेधा कुलकर्णी यांनी पुणे स्टेशनला थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव देण्याची मागणी केलीय. मात्र संभाजी ब्रिगेडनं खासदार कुलकर्णी यांच्या मागणीला विरोध केलाय.

पुणे रेल्वे स्टेशनला क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचे नाव दिले पाहिजे, अशी मागणी संभाजी बिग्रेडनं केलीय. त्यामुळे दोन्ही मागण्यामुळे नामकरणाचा वाद पेटणार असल्याची चित्र दिसत आहे. आज पुण्यात पुणे आणि सोलापूर रेल्वे विभागाची बैठक पार पडली. या बैठकीत कुलकर्णी यांनी ही मागणी केली. मात्र या मागणीला संभाजी ब्रिगेडचा विरोध आहे. आम्हाला आधुनिक पेशवाई अजिबात नको. पुण्याला महाराष्ट्राला आणि देशाला अभिमान वाटावा असंच क्रांतिकारी काम महात्मा फुले यांनी केलेला आहे त्यांचं नाव पुणे रेल्वे स्टेशनला दिलं पाहिजे, अशी मागणी त्यांनी केलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com