Pune Station: पुणे स्टेशनचं नाव बदलणार? 'ही' दोन नाव चर्चेत, नव्या नावावरून वाद होण्याची शक्यता

Pune Station Renamed: विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यातील पुणे स्टेशनचं नाव बदलण्यात येणार आहे. पुणे स्टेशनला आता नवीन नाव मिळणार आहे. पण या नाव बदलण्यावरून वाद होण्याची शक्यता आहे.
Pune Station
Pune Station Renamedsaam Tv
Published On

विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यातील पुणे स्टेशन आता राहणार नाही. पुणे शहरातील स्टेशनचं नाव बदलण्यात येणार आहे. मात्र पुणे स्टेशनला कोणतं नाव द्यावं यावरून वाद होण्याची शक्यता निर्माण झालीय. कारण, खासदार मेधा कुलकर्णी यांनी पुणे स्टेशनला थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव देण्याची मागणी केली. तर खासदार कुलकर्णी यांच्या मागणीला संभाजी ब्रिगेडनं याला विरोध केला आहे. बाजीराव पेशवे यांच्या नावाऐवजी संभाजी ब्रिगेडनं दुसरं नाव सुचवलंय.

पुणे रेल्वे स्टेशनला क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचे नाव दिले पाहिजे, अशी मागणी संभाजी बिग्रेडनं केलीय. त्यामुळे दोन्ही मागण्यामुळे नामकरणाचा वाद पेटणार असल्याची चित्र दिसत आहे. आज पुण्यात पुणे आणि सोलापूर रेल्वे विभागाची बैठक पार पडली.

या बैठकीला दोन्ही जिल्ह्यातील खासदार उपस्थित होते. यावेळी मेधा कुलकर्णी यांनी पुणे स्टेशनच्या नावाचा उपस्थित केला. त्यांनी श्रीमंत थोरले बाजीराव यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी केलीय. रेल्वेची बैठक पार पडल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत बैठकीची माहिती दिली.

आज झालेल्या बैठकीत खासदार मेधा कुलकर्णी यांनी पुणे रेल्वे स्टेशन आणि पुणे शहरासंबंधी अनेक प्रश्न उपस्थित केले. यातील एक मुद्दा स्टेशनला नाव देण्याचा होता.पुणे रेल्वे स्टेशनला श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी केली. दरम्यान अशा प्रकारची मागणी अनेक संघटनांनी वेळोवेळी केली असल्याचे कुलकर्णी म्हणाल्या.

काय म्हणाल्या खासदार मेधा कुलकर्णी?

कुठल्याही रेल्वे स्थानकाचा, विमानतळाचा भारतातील त्याच्या इतिहासाशी कनेक्शन जोडण्याचा प्रयत्न असतो. जेणेकरून नागरिकांनाही आपला दैदिप्यमान इतिहास कळाला पाहिजे. परंतु पुणे रेल्वे स्टेशन पाहिल्यानंतर असा कुठलाही इतिहास त्यातून प्रतिबिंबित होत नाही. पुणे शहर हे मोठे आहे, नावाजलेले आहे. राजधानीच्या शहरापेक्षा कमी नाही. शिक्षणाचे माहेरघर आहे सांस्कृतिक शहर आहे.

शैक्षणिक शहर आहे, आयटी हब आहे. त्यामुळे इतिहासाच्या संस्कृतीच्या पाऊलखुणा पुणे रेल्वे स्टेशनवर दिसल्या पाहिजेत. यासाठी पुणे रेल्वे स्टेशनला थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी खासदार मेधा कुलकर्णी यांनी केली.

बाजीराव पेशव्याचं नाव का द्यावं?

पुणे स्टेशनचं नाव थोरले बाजीराव पेशवे असं करावं अशी मागणी मेधा कुलकर्णी यांनी केली होती. त्यामागील कारण सांगताना त्या म्हणाल्या, इतिहासाच्या संस्कृतीच्या पाऊलखुणा पुणे रेल्वे स्टेशनवर दिसल्या पाहिजेत. पुणे शहर हे राजधानीच्या शहरापेक्षा कमी नाही. पण पुणे रेल्वे स्टेशन पाहिल्यानंतर कुठलाही इतिहास प्रतिबिंबित होत नाही.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी साम्राज्याचा विस्तार अटक ते कटक करण्याचे काम थोरले बाजीराव पेशवे यांनी केले आहे. शनिवार वाडादेखील त्याचेच प्रतीक आहे. हिंदवी साम्राज्याचा विस्तार, मराठा साम्राज्याचा विस्तार जसा छत्रपतींच्या काळात झाला तसाच कार्य थोरले बाजीराव पेशवे यांनी देखील केले आहे.

या कामात बाजीराव पेशवे यांची देखील योगदान मोठे आहे. छत्रपती शिवरायांचा वारसा यांनी चालवला. अटकेपार झेंडा ज्यांनी रोवला अशा थोरल्या बाजीराव पेशवे यांचे नाव पुणे रेल्वे स्थानकाला देण्यात यावे, अशी मागणी केली आहे.

आधुनिक पेशवाई अजिबात नको, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले नाव द्या.

पुणे रेल्वे स्टेशनला क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचे नाव दिले पाहिजे, अशी संभाजी ब्रिगेडने केलीय. आधीही त्यांनी अशी मागणी केली होती. पुणे हे जगामध्ये विद्येचे माहेरघर म्हणून ओळखलं जातं कुणामुळे? महात्मा फुले यांच्यामुळे.

आता आम्हाला आधुनिक पेशवाई अजिबात नको. पुण्याला महाराष्ट्राला आणि देशाला अभिमान वाटावा असंच क्रांतिकारी काम महात्मा फुले यांनी केलं आहे. त्यांचं नाव पुणे रेल्वे स्टेशनला दिलं पाहिजे. अशी मागणी करत संभाजी ब्रिगेडनं मेधा कुलकर्णी यांची मागणीला विरोध केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com