
अकोल्यात एमआयएमचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी यांचं आगमन. अकोल्यातील हमजा प्लॉट भागात होत आहे असदुद्दीन ओवेसी यांची सभा. याआधी ओवेसी यांच्या सभेत गोंधळ झाल्याने सभास्थळी मोठा गोंधळ. अकोल्यात एमआयएमचे 32 उमेदवार. अकोल्यातील ओवेसीच्या सभेत अकोटमधील एमआयएमचे पाचही नगरसेवक उपस्थित.
कालंचं अकोट नगररालिकेत एमआयएमच्या 5 नगरसेवकांचा झाला होता स्वतंत्र गट. आधी एमआयएम सहभागी झाली होती भाजपच्या नेतृत्वाखालील 'अकोट विकास मंचा'त. मात्र, भाजपच्या स्थानिक नेतृत्वाच्या एमआयएम समावेशाच्या निर्णयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचंड नाराज. तर एमआयएमच्या नगरसेवकांच्या निर्णयावर पक्षाचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसीही रागावले होते. त्यानंतर एमआयएमच्या 5 नगरसेवकांनी भाजपच्या नेतृत्वाखालील 'अकोट विकास मंचा'तून बाहेर पडत 5 नगरसेवकांनी आपला स्वतंत्र गट निर्माण केला होता. त्यानंतर अकोला जिल्हाधिकार्यांनी एमआयएमच्या गटाला दिली होती मंजूरी. आज अकोल्यातील ओवेसीच्या सभेत अकोटमधील एमआयएमचे पाचही नगरसेवक उपस्थित.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रभाग क्रमांक 16 भारतीय जनता पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युतीचे उमेदवार धर्मपाल तंत्रपाळे दीपक भोंडवे संगीता भोंडवे श्रेया गायकवाड यांच्या प्रचारार्थ देहूरोड येथील एम बी कॅम्प येथे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची सभा आयोजित करण्यात आली होती.
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातदेशाचा विकास करण्यासाठी महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी पिंपरी चिंचवड मुंबई येथील सर्व लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी मी बीजेपी सोबत आहे "मला मंत्री पदाची हौस नाही परंतु मी ज्या पक्षासोबत युती करतो त्यांचं सरकार येतं त्यामुळे मला ऑटोमॅटिक मंत्रिपद मिळतं आणि त्यांचं मन जळतं अशी टिका विरोकांवर आठवले यांनी कवितेच्या माध्यमातून केली..
खऱ्या अर्थाने अमरावतीतील गुंडागिरी थांबवायची असेल तर तुम्ही सत्तेतून बाहेर पडल पाहिजे, अजितदादा सत्तेचा उपयोग घेता आणि बाहेर असं दाखवतो की तुम्ही भाजपच्या विरोधात आहे - यशोमती ठाकूर
राज्यात एकीकडे काँग्रेसला उतरती कळा लागलेली असतानाच दुसरीकडे ऐन जिल्हा परिषदेच्या तोंडावर लातूर ग्रामीण मध्ये भाजपाला मोठा फटका बसला आहे, लातूर ग्रामीणच्या पानगाव जिल्हा परिषद सर्कल मधून 100 भाजप कार्यकर्तासह पदाधिकाऱ्यांनी माजी आमदार धीरज देशमुख यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे, दरम्यान या पक्षप्रवेशामुळे लातूर ग्रामीणमध्ये भाजपाला मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे. आगामी जिल्हा परिषदेच्या अनुषंगाने लातूर ग्रामीण मध्ये काँग्रेस कडून जोरदार मोर्चे बांधणी सुरू झाली, अनेक इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात झाल्यात.
पुण्यात शिवसेनेचे शहराध्यक्ष नाना भानगिरे यांनी प्रचारादरम्यान क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. प्रभाग क्रमांक 41 ते शिवसेनेचे उमेदवार नाना भानगिरे वडाचीवाडी या ठिकाणी प्रचार करत आहेत. यावेळी त्यांना क्रिकेट खेळणारी मुले दिसली.
रस्ता सुरक्षा अंतर्गत वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईची मोहीम सुरू करण्यात आली आहे. मुंबई गोवा महामार्गावरील सर्विस रोडवर नियम मोडल्याने बरेच अपघात घडले आहेत त्यामुळे प्रामुख्याने एकेरी वाहतूक म्हणजे एकदिशा वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई सुरू करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस वाहतूक शाखेच्या वतीने ही कारवाईची मोहीम सुरू करण्यात आली आहे.
बहू प्रतिक्षित असा लाईट अँड साऊंड शो किल्ले रायगडावर येत्या काही दिवसात सुरु होत आहे.
रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांनी या लाईट अँड साऊंड शो बाबतच्या प्राथमिक तयारीची पहाणी केली.
360 अंशांमध्ये स्पॉट लाईटच्या माध्यमातुन रायगडाचा इतिहास या माध्यमातुन सांगितला जाणार आहे.
गडचिरोलीत कौटुंबिक कलहातून पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या
पत्नीची दगडावर डोके ठेवून हत्या केल्यानंतर पतीने विष प्राशन केले.
पतीपत्नी दोघांचाही जीव गेल्याने त्यांची चार निरागस मुले पोरकी झाली आहे
पुण्यातील बाणेर भागात पैसे वाटप करणं पडलं महागात
निवडणुकीच्या निमित्ताने पैसे वाटप प्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल
महिलेला एका गॅरेज मध्ये बोलवून पैसे दिल्याचा आरोपावरून गुन्हा दाखल
पुण्यातील प्रभाग ९ मध्ये पैसे वाटप केल्याचा व्हिडिओ काल आला समोर
मतदारांना आमिष दाखवल्याप्रकरणी गुन्हा दाखल
कलम १७१, १७३ आणि आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी बाणेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
ऋषिकेश बालवडकर, गणेश लिंगायत, रोहित उत्तेकर या तिघांवर गुन्हा दाखल
२ लाख ६३ हजार रुपये आले मिळून
प्रभाग ९ मध्ये पैसे वाटप आणि मतदारांना प्रभावित केल्याप्रकरणी बाणेर पोलिस ठाण्यात हा दुसरा गुन्हा
सांगली महापालिका निवडणुकीमध्ये भाजपाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनीसांगली मिरज आणि कुपवाड शहरात मॅरेथॉन बैठका घेतल्या, शहरातल्या प्रत्येक प्रभागात जाऊन चंद्रकांत पाटलांकडून उमेदवारांच्या प्रचारार्थ बैठका घेतल्या, त्याचबरोबर चंद्रकांत पाटलांकडून यावेळी नाराज असणाऱ्या नेत्यांबरोबर उमेदवारी डावलेल्या नाराजांची देखील भेट घेतली आहे. प्रत्येकाच्या घरी जाऊन चंद्रकांत पाटलांनी नाराजांची समजूत काढत,पक्षाचा प्रचार करण्यात आवाहन केले आहे.
भाजपा विरोधात काढणार मोर्चा
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी तुषार आपटेचे नगरसेवक पद रद्द करा
मनसेने केली मागणी
तुषार आपटे हा बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी
भाजपाच्या या नियुक्तीचा मनसेने केला निषेध
तुषार आपटेचे नगरसेवक पद रद्द नाही केले तर मनसे होणार आक्रमक
मनसे नेते अविनाश जाधव यांनी केली घोषणा
सांगली महापालिका निवडणुकीमध्ये भाजपाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनीसांगली मिरज आणि कुपवाड शहरात मॅरेथॉन बैठका घेतल्या, शहरातल्या प्रत्येक प्रभागात जाऊन चंद्रकांत पाटलांकडून उमेदवारांच्या प्रचारार्थ बैठका घेतल्या, त्याचबरोबर चंद्रकांत पाटलांकडून यावेळी नाराज असणाऱ्या नेत्यांबरोबर उमेदवारी डावलेल्या नाराजांची देखील भेट घेतली आहे. प्रत्येकाच्या घरी जाऊन चंद्रकांत पाटलांनी नाराजांची समजूत काढत,पक्षाचा प्रचार करण्यात आवाहन केले आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज मुंबईतील पूर्व उपनगरात प्रचार दौरा करणार आहेत. या प्रचार दौऱ्यात ते रोड शो आणि चौक सभा ही घेतील. मुंबईतील चेंबूर घाटला भागातून या दौऱ्याला सुरुवात होईल. अणुशक्ती नगर, घाटकोपर असा दौरा एकनाथ शिंदे करणार आहेत. काही वेळात या दौऱ्याला चेंबूर घाटला येथून सुरुवात होईल…
पुण्यात अजित पवारांचा आज पुन्हा रोड शो
पुण्यातील सेवन लव्ह चौकातून रोड शोला सुरुवात
आजही अजित पवारांकडून चार मतदारसंघांमध्ये केला जाणार रोडशो...
भाजप खासदार पुत्र घेणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत
कोल्हापुरात 12 जानेवारी ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा टॉक शो
टॉक शो दरम्यान कृष्णराज महाडिक आणि अभिनेते स्वप्नील राजशेखर घेणार मुख्यमंत्र्यांची मुलाखत
20 प्रभागात स्क्रीन द्वारे live दाखवली जाणार मुलाखत
कृष्णराज महाडिक भाजप कडून लढवणार होते महानगरपालिका निवडणूक
मात्र पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या आदेशा नंतर घेतली होती माघार
कांजूरमार्ग पूर्वेतील नेहरू नगर एस आर ए को. ओ. हौ. सो. या २१ मजली इमारतीला आग..
या इमारतीत शासनाची अंगणवाडी देखील आहे..
इमारतीच्या इलेक्ट्रिक मीटर केबिन मध्ये आग..
अग्निशमन दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी..
आगी पेक्षा प्रचंड धूर वर पर्यंत..
इमापतीतील रहिवाशांनी रिकामी केली इमारत..
उमरगा नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी काँग्रेसचे विजय वाघमारे यांची बिनविरोध निवड करण्यात आलीय.उमरगा नगरपालिका निवडणुकीत शिवसेना आणि काँग्रेसची युती राज्यभर चर्चेचा विषय ठरली होती. उमरगा नगरपालिकेत शिवसेनेचे किरण गायकवाड हे नगराध्यक्ष आहेत तर काँग्रेसचे विजय वाघमारे यांची उपनगराध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलीय.
लिहून ठेवा आणि एकमेकांशी पैज लावा,सांगली महापालिका निवडणुकीत 55 जागा भाजपाच्या येतील,असे भाकीत
सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी केलंय,सांगली महापालिका निवडणुकीत भाजपा स्वबळावर लढत असून यंदा 55 जागा भाजपाच्या स्वबळावर येतील,त्यामुळे
महापौर भाजपाचा होईल,त्यामुळे घटक पक्षांना सोबत का,घ्या असा माझा प्रश्न आहे..मात्र अंतीम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा असेल ,असे देखील मंत्री चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट केलं आहे.
पुण्यात काका पुतण्याचे एकत्रित लागले बॅनर
शरद पवार आणि अजित पवार एकाच फ्रेम मध्ये
दोन्ही राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचा आज संयुक्तिक जाहीरनामा घोषित होणार
त्या आधी जिथ जाहीरनामा प्रकाशित होणार त्या हॉटेल बाहेर काका पुतण्याचे एकत्र बॅनर झळकत आहेत
अष्टसुत्री प्रगतीची, अष्टावधानी नेतृत्वाची असा आशय लिहिण्यात आलाय
थोड्याच वेळात जाहीरनामा अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकत्रित करणार घोषित
पुणे महापालिकेसाठी दोन्ही राष्ट्रवादीचा आज संयुक्त जाहीरनामा होणार प्रसिद्ध
अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या हस्ते होणार जाहीरनामा चे प्रकाशन
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यावर अजित पवार सुप्रिया सुळे पहिल्यांदाच एकाच मंचावर
अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्यासह सुनेत्रा पवार आणि अमोल कोल्हे राहणार उपस्थित
प्रकाशन सोहळ्यादरम्यान भाऊ बहीण काय बोलणार याकडे साऱ्यांचे लक्ष
लातूर शहर महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचे माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत , राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला, तर सध्या प्रभाग ५ मधून विक्रांत गोजमुंडे निवडणूक लढवत आहेत. दरम्यान, याच प्रभागात काँग्रेस आमदार अमित देशमुख यांनी जाहीर सभा घेत, नाव न घेता विक्रांत भोजन मुंडे यांना थेट इशारा दिला... इथं जर कोणी दमबाजी करण्याचा प्रयत्न केला तर त्याला जशास तसे उत्तर दिले जाईल… संयमाला आव्हान देऊ नका.,असा थेट इशाराच अमित देशमुख यांनी दिला आहे...
वाशिम जिल्ह्यात घरकुल आणि सिंचन विहिरींच्या लाभार्थ्यांना दिलासा देणारा उपक्रम राबवण्यात आला आहे. कवठा जिल्हा परिषद सर्कलमध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत आयोजित तक्रार निवारण मेळाव्यात घरकुल व विहिरींच्या तक्रारींचा जागेवरच निपटारा करण्यात आला.
या मेळाव्यात तब्बल २४० लाभार्थ्यांच्या तक्रारी ऐकून घेत प्रलंबित अनुदान हप्ते, अतिक्रमित जागेच्या नियमनासह विविध समस्यांवर तात्काळ तोडगा काढण्यात आला. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी किरण कोवे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेला हा उपक्रम जिल्ह्यासाठी पहिलाच ठरला आहे.
अन्न आणि औषध प्रशासन मंत्र्यांच्या मतदारसंघातच झाली कारवाई
विशेष पथक व अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांची संयुक्त मोहीम
७ ते ९ जानेवारीदरम्यान नाशिक जिल्ह्यात व्यापक तपासणी
9 कोटींहून अधिक किमतीचा प्रतिबंधित माल जप्त
इगतपुरीत सिगारेट उत्पादक कंपनीवर कारवाई
सिगारेटमध्ये सुगंधित तंबाखू वापरल्याचा संशय
महाराष्ट्रात गुटखा व पानमसाला बंदी असतानाही बेकायदेशीर उत्पादन
मोठ्या प्रमाणात कच्चा माल, फ्लेवर, कलर, केमिकल्स जप्त
पॅकिंग मशीन, पॅकिंग रोल्स सील
अन्न सुरक्षा कायद्यानुसार संबंधितांवर कठोर कारवाई
प्रतिबंधित अन्नपदार्थ विक्री, उत्पादन, साठवणूक करणाऱ्यांना इशारा
नवी मुंबई महापालिका निवडणूक प्रभाग क्रमांक 17 अ मधून भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार निलेश भोजने यांना निवडणूक लढवण्यास मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी दिलेली आहे. यासंबंधीचा महत्त्वपूर्ण निकाल कोर्टाने दिला.
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अनधिकृत बांधकामाच्या मुद्द्यावर निलेश भोजने यांचा अर्ज पडताळणी दरम्यान रद्द केला होता. निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या या निर्णयाविरोधात श्री भोजने यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. त्यांच्या याचिकेवरील पहिली सुनावणी 8 जानेवारी 2026 रोजी पार पडली. या सुनावणी मध्ये प्रथमदर्शनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने अधिकार क्षेत्राच्या बाहेर जाऊन निर्णय घेतल्याचे उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आले.
नाशिक महापालिका निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात राज्यस्तरीय नेत्यांच्या सभांना वेग
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आज नाशकात जाहीर सभा
शिंदे सेनेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदेंची सभा
ठाकरे बंधूंची टीका आणि आरोपांना शिंदेंकडून जोरदार प्रत्युत्तर देण्याची शक्यता
सभेत नाशिककरांसाठी महत्त्वाच्या घोषणा होण्याची अपेक्षा
सभेला राष्ट्रवादी काँग्रेस ( AP ) चे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे देखील उपस्थित राहण्याची शक्यता
अंगणवाडी कर्मचारी संघटना, आशा व गटप्रवर्तक संघटना आणि अर्धवेळ स्त्री परिचारिका महासंघ जिल्हा बुलढाणाच्या जळगाव जामोद तहसील आणि पंचायत समिती कार्यालयात एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.... या आंदोलनामध्ये 23 महिन्याचा थकीत कोरोना भत्ता तत्काळ देण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली.... याचसोबत कामगार विरोधी मालक धार्जीनिया चार श्रमसंहिता ताबडतोब मागे घ्यावी, सर्व कामगार कायदे पुन्हा बहाल करावे, तसेच सार्वजनिक क्षेत्रातील स्थापना कंपन्या व सेवेचा खाजगीकरण ताबडतोब थांबविण्याची मागणी सुद्धा आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आली....अंगणवाडी सेविका,आशा कर्मचारी आणि शालेय पोषण आदी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्याची भारतीय श्रम परिषदेची शिफारस अमलात आणण्यासाठी प्रशासनाकडे निवेदन सादर करण्यात आले..... जळगाव जामोद येथील आंदोलनामध्ये संघटनेचे जिल्हाध्यक्ष पंजाबराव गायकवाड,जिल्हा सचिव प्रतिभा पाटील, सरला मिश्रा यांच्यासह तालुक्यातील अंगणवाडी सेविका आशा वर्कर मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या...
मतदारांना आपल्या पक्षाकडे आकर्षित करण्यासाठी चक्क पर राज्यातील विदेशी दारूच्या बाटल्या मोफत वितरित करण्यात आल्या आहेत.. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 21 मधील पिंपरी गावातील पवनेश्वर मंदिरा जवळ मतदारांना आपल्या पक्षाकडे आकर्षित करण्यासाठी चक्क मोफत विदेशी दारूच्या बाटल्या वितरित करण्यात आल्या आहेत. . या संदर्भात माहिती मिळताच प्रभाग क्रमांक 21 मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डब्बू आसवांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी चक्क मतदारांना मोफत विदेशी दारू वाटणाऱ्या कारचा पाठलाग करून कारला पोलिसांच्या स्वाधीन केला आहे. तर कार मध्ये मतदारांना मोफत विदेशी दारूच्या बाटल्या वाटणारे तीन जण पडून गेले आहेत. ज्या कारमध्ये मतदारांना मोफत विदेशी दारूच्या बाटल्या वितरित करण्यात येत होत्या त्या कारमध्ये मोठ्या प्रमाणात परराज्यातील विदेशी दारूच्या बाटल्याचे खोके भरून आढळले आहेत. डब्बू आसवांनी यांनी याबाबतची तक्रार पिंपरी पोलीस, राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि निवडणूक विभागाकडे केली आहे. पिंपरी पोलीस, राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि निवडणूक विभागाने रात्री उशिरा घटनास्थळी पोहचून पंचनामा केला आहे.
प्रभाग क्रमांक 21 मधील भाजप उमेदवाराच कार्यकर्त्यांनी मतदारांना मोफत दारू वितरित केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभाग 21 मधील उमेदवार डब्बू आसवांनी यांनी केला आहे. या प्रकरणातील दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी डब्बू आसवांनी यांनी केली आहे
भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात ईडीच्या पथकाने धडक कारवाई करत वाळू व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. डोंगरी बुद्रुक आणि लोभी येथील दोन बड्या वाळू व्यावसायिकांच्या घरावर सलग १२ तास छापेमारी करून ईडीने लाखो रुपयांची रोकड आणि महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत.
अकोल्यात काँग्रेसच्या प्रचारार्थ खासदार इम्रान प्रतापगढी यांची सभा झालीय. शहरातील गडंकी भागातील झुल्फिकार अली मैदानावरील ही सभा झालीय. या सभेत खासदार प्रतापगढी यांनी एमआयएमवर जोरदार टीका केलीय. भाजपाला मदत करण्यासाठीच एमआयएम काम करत असल्याचा आरोप त्यांनी केलाष. भाजप आणि एमआयएमच्या मैत्रीचं प्रात्यक्षिक देशाला आणि राज्याला अकोटमध्ये पाहायला मिळाल्याचं ते म्हणालेत यासोबतच एमआयएममुळेच भाजपला बिहार जिंकता आल्याचा आरोप त्यांनी केलाय.
ठाकरे गटाचे अकोला जिल्ह्यातील बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांनी गुवाहाटीवरून परत येतांना जिवावर उदार होऊन आल्याचं म्हटलंय. गुवाहाटीवरून जीवाचं रान करून परत आलो. कारण, आपण बाळासाहेब, उद्धव ठाकरे आणि शिवसेनेशी निष्ठावान होतोय असं ते म्हणालेत. 'बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंशी गद्दारी म्हणजे आपल्या आईच्या दुधाशी बेईमानी' असल्याचं ते म्हणालेत. यासोबतच शिवसेना वसाहत ही शिवसेनेने वसवली. त्यामूळे आता लोकांनी शिवसेनेला मतदान करीत कृतज्ञतेची साक्ष द्यावी, असं आवाहन त्यांनी शिवसेना वसाहत भागातील नागरिकांना केलंय.
अकोल्यातील ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुखांनी पुन्हा प्रचार सभेतून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधलाय. हिंदुत्वाच्या नावाखाली बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खूपसणाऱ्या मतदान करू नका. उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं म्हणून आम्ही हिंदुत्वासाठी बाहेर पडलो, असे सांगणारे शिंदें आज एमआयएम सोबत बसलेये. तर तिकडे अकोटमध्ये भाजपने 'एमआयएम'ला सोबत घेतलंय.. हेच तुमचं हिंदुत्व काय? असा सवाल नितीन देशमुख प्रचार सभेतून उपस्थित केलाय. दरम्यान, उद्धव ठाकरेंनी कधीच हिंदुत्व सोडलं नव्हतंये.. तर काँग्रेसने हिंदुत्व स्वीकारत उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केलं होतंये, असेही नितीन देशमुख म्हणालेये.
मतदारांना आपल्या पक्षाकडे आकर्षित करण्यासाठी चक्क पर राज्यातील विदेशी दारूच्या बाटल्या मोफत वितरित करण्यात आल्या आहेत.. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 21 मधील पिंपरी गावातील पवनेश्वर मंदिरा जवळ मतदारांना आपल्या पक्षाकडे आकर्षित करण्यासाठी चक्क मोफत विदेशी दारूच्या बाटल्या वितरित करण्यात आल्या आहेत. . या संदर्भात माहिती मिळताच प्रभाग क्रमांक 21 मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डब्बू आसवांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी चक्क मतदारांना मोफत विदेशी दारू वाटणाऱ्या कारचा पाठलाग करून कारला पोलिसांच्या स्वाधीन केला आहे. तर कार मध्ये मतदारांना मोफत विदेशी दारूच्या बाटल्या वाटणारे तीन जण पडून गेले आहेत. ज्या कारमध्ये मतदारांना मोफत विदेशी दारूच्या बाटल्या वितरित करण्यात येत होत्या त्या कारमध्ये मोठ्या प्रमाणात परराज्यातील विदेशी दारूच्या बाटल्याचे खोके भरून आढळले आहेत. डब्बू आसवांनी यांनी याबाबतची तक्रार पिंपरी पोलीस, राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि निवडणूक विभागाकडे केली आहे. पिंपरी पोलीस, राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि निवडणूक विभागाने रात्री उशिरा घटनास्थळी पोहचून पंचनामा केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज बीड, सोलापूर, पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. महापालिका निवडणुकीच्या प्रचरासाठी मुख्यमंत्री सभा घेणाऱ आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.